Japanese Encephalitis एनसिफलायटिस
दिवसेंदिवस नवनवीन आजारांमध्ये भर पडत असून, त्यांची व्याप्ती वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये एनसिफलायटिस या आजाराने थैमान घातले असून, या आजारामुळे नुकतेच आणखी १0 बळी गेले आहेत.. • भारताच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बातमी अशी, की पूर्णपणे स्वदेशी बनावटीची, भारतात आढळणार्या विषाणूंच्या वापराने बनवलेली लस तयार करण्यात आली आहे. तिला नुकतीच सरकारी पातळीवर मान्यता मिळाली असून ती सुरक्षित आहे. त्यामुळे JEV चे उच्चाटन आता दूर नाही! रखपूर जिल्ह्यामध्ये ज्या आजाराच्या साथीने सध्या जोर धरला आहे आणि रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळवले आहे, तो आजार म्हणजे ज्ॉपनीज एनसिफलायटिस (Japanese Encephaltis) यालाच पूर्वी Japanese B Encephalitis असे म्हणत असत.
यामधील विषाणुजन्य मेंदूदाहाच्या कारणांमध्ये JEV हा एक महत्त्वाचा विषाणू आहे. कारण, दर वर्षी ३0 ते ५0 हजार लोक याची शिकार होतात. आजारी व्यक्तीचे वय, भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार ३ ते ६0 टक्के पर्यंत लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात.
सहसा शहरी भागांमध्ये हा आजार होत नाही. भातशेतीची खाचरे पाण्याने भरली, की डासांची उत्पत्ती वाढते. अशा वेळी डास त्यांचे नेहमीचे खाद्य (डुक्कर, पक्षी) बदलतात आणि माणसांना चावायला सुरुवात करतात. डुकरांना हा जंतुसंसर्ग झाला, तरी ते सहसा दगावत नाहीत.
JEV चा विषाणू डासामार्फत मनुष्याच्या शरीरात शिरल्यावर सुरुवातीला ५ ते १५ दिवसांपर्यंत कोणत्याच स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत नाहीत. यामध्ये साधारण २५0 लोकांना या विषाणूची लागण झाली, तरी फक्त एकालाच आजार होतो.
थंडी वाजून हुडहुडी भरणे ही पहिली अवस्था असते. कालांतराने प्रचंड प्रमाणात ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि इतर अनेक तक्रारींची सुरुवात होते. त्यानंतर १ ते ६ दिवसांत मानेचा कणा कडक होणे, लकवा भरणे, भूक न लागणे, फिट्स येणे, परिस्थितीचे भान जाणे, बेशुद्धावस्था अशा तक्रारी वाढतात. साथीच्या तीव्रतेनुसार मृत्यूचे प्रमाण कमी- अधिक होते. पण, मुलांमध्ये ते खूपच अधिक प्रमाणात असते. जे रोगी यातून बचावतात, त्यांमध्येसुद्धा मेंदू व चेतासंस्थेशी निगडित बहिरेपणा, भावनिक असंतुलन, लकवा अशा तक्रारी दीर्घकाळ राहतात. काही जणांत ताप, उलट्या, डोकेदुखी, वृषणाला सूजही दीर्घकाळ राहते.
श्वसनाला त्रास होणे टाळणे, फिट्स येऊ न देणे व आहाराची काळजी घेणे यांबरोबरच योग्य ती शुश्रुषा इतकेच करता येते. शरीरात विषाणूंची संख्या रोखण्यासाठी वेगवेगळी प्रतिजैविके वापरून पाहिली असली, तरी त्यास अद्याप फारसे यश आलेले नाही. एका रोग्याकडून दुसर्यास हा आजार होऊ शकत नसल्याने रोग्यास वेगळे काढण्याची आवश्यकता नाही.
पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालणे, डासांना पळवून लावणारी मलमे अंगावर लावणे, मच्छरदाण्यांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
JEV मुळे प्रतिकारशक्ती जन्मभरासाठी येते. म्हणजे JEV चा एकदा संसर्ग झाला, तर पुन्हा आजार सहसा होत नाही. त्यामुळेच लसीकरण हा त्यावरचा १00 टक्के उपाय आहे; परंतु ती मोठय़ा प्रमाणात परवडण्यासारखी नाही.चीन, कोरिया, जपान, तैवान, थायलंड येथे मोठमोठय़ा प्रमाणात साथी आल्या. पण, लसीकरणामुळे तेथे लवकरच आवर घालता आला. भारत, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम येथेही अधूनमधून साथी उफाळून येतात आणि मनुष्यहानी होते.
(लेखक पुणे इंडियन मेडिकल असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, बालरोगतज्ज्ञ आहेत.) • हा आजार हेरॉनसारख्या पक्ष्यांमध्ये व डुकरामध्ये असलेल्या विषाणूंमधून क्युलेक्स जातीच्या डासांमार्फत पसरतो. दक्षिणपूर्व आशिया आणि अतिपूर्वेच्या देशांमध्ये हा आजार पसरला आहे.