Blogroll

पायथागोरस पहिला गणिती

पायथागोरस  पहिला गणिती

पायथागोरस पहिला गणिती


गणिताची आवड आणि जाण असणार्‍या या शास्त्रज्ञाचे इतर विचार मात्र खूपच काल्पनिक आणि मजेशीर असल्याचे दिसून येते. असे असले तरी पायथागोरस यांनी गणिताला दिलेले योगदान हे चिरकाल टिकणारे आहे.
स्त पूर्व काळामध्ये जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यामध्ये पायथागोरस यांचे महत्त्वाचे स्थान आहे. पायथागोरस यांचे जीवन आणि कार्य हे अनेक अद्भुत, त्याचप्रमाणे विज्ञानविषयक घटनांनी भरलेले आहे. पायथागोरस हे शास्त्रज्ञ त्यांच्या त्रिकोणाविषयीच्या सिद्धांतामुळे सर्वांना परिचित आहेत. 'कर्ण वर्ग +पाया वर्ग = उंची 'वर्ग' हे सूत्र विद्यार्थ्यांना तोंडपाठ असते. हा सिद्धांत इसवी सन पूर्व ५00 वर्षांपूर्वी मांडला गेला. त्यामुळेच पायथागोरस यांना पहिला गणिती म्हणून संबोधले जाते. या सूत्राबरोबरच त्यांनी त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोनाएवढी असते, त्याचप्रमाणे बहुभूज आकृतीच्या आंतरकोनाची बेरीज ही दोन-चार काटकोन एवढी असते, असे प्रतिपादन केले.
पायथागोरस यांचा राजकीय घटनांमध्ये सहभाग होता. त्यासाठी त्यांना इजिप्तला जावे लागले. मात्र, संशोधन आणि अभ्यास करण्याची त्यांची इच्छा थोडीही कमी झाली नाही. त्या काळी अभ्यासकेंद्रे ही बहुधा मंदिरांमध्ये असत. मात्र, पायथागोरस यांना प्रयत्न करूनही मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. याचे कारण मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी विशिष्ट अटींचे पालन करावे लागे. खूप प्रयत्नानंतर त्यांना डायस कॉलीस येथील मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. मात्र, त्यासाठी मंदिराच्या सर्व अटी मान्य करून घ्याव्या लागल्या. आपल्या अस्तित्वाचे मूळ हे गणितावर आधारित आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांचा कल हा आध्यात्मिक बाबींकडे असल्यामुळे आत्म्याचे उत्थान करून दैवी शक्तींचे मीलन घडवून आणता येईल, अशी त्यांची धारणा होती.
पायथागोरस यांच्या निरनिराळ्या अंकांबाबत काही कल्पना होत्या. '१' अंक हा कार्यकारण भावाशी निगडित आहे, असे त्यांचे मत होते. '२' ही सम संख्या असून, हा स्त्रीत्वाशी संबंधित अंक आहे, अशी त्यांची धारणा होती. मत प्रदर्शनाशीही या अंकाचा संबंध त्यांनी लावला. '३' आकड्याचा संबंध पुरुषत्वाशी असून, तो साधम्र्यता दर्शवितो, असे त्यांचे मत होते. '४' अंक न्याय दर्शवितो. '५' अंकाचा विवाहाशी संबंध आहे.
'६' अंक निर्मितीशी संबंधित आहे, असे त्यांचे मत होते. त्याचप्रमाणे '१, ३, ६, १0 आणि १५' हे अंक त्रिकोणाशी संबंधित आहेत, तर १, ४, ९, १६ आणि २५ या अंकाचा संबंध चौरसाशी आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

व्हॅसलीन vaseline पेट्रोलियम जेली

व्हॅसलीन vaseline पेट्रोलियम जेली



पेट्रोलियम जेली, पांढरे पेट्रोलियम किंवा सॉफ्ट पॅराफिन असेही म्हटले जाते. पूर्वी व्हॅसलीनचा उपयोग त्वचाविकारांसाठी केला जात असे.
व्हॅसलीन हे तेलविहिरीतून सापडणार्‍या कच्च्या तेलाचे शुद्ध स्वरूप आहे. १८५९ मध्ये अमेरिकेतील पेन्सीलव्हिया राज्यातील टिटूसव्हिले या ठिकाणी तेलविहीर खणताना अनपेक्षित असा काळपट रंगाचा घट्टसर द्रव बाहेर आला. कामात अडथळा आणणारा तो द्रव कामगारांना आवडेनासा झाला होता; परंतु कामगारांच्या जखमांवर तो द्राव लावल्यावर जखमा भरून आल्या, तसेच वेदनाही कमी झाल्या. तेलावर संशोधन करणारे तरुण शास्त्रज्ञ रॉबर्ट चेसब्रफ यांनी कच्चे तेल शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. टिटूसव्हिले येथे सापडलेल्या या नवीन तेलात नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रॉबर्ट चेसब्रफ तेथे गेले व त्यांनी विहिरीत सापडलेला काळसर द्रव पदार्थशुद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत आणला. 
निर्वात ऊध्र्वपातन प्रक्रियेने काळपट द्रवाचे शुद्ध स्वरूपातील पांढर्‍या घट्ट जेलीत (तैलीय पदार्थ) रूपांतरित झाले. ती जेली त्यांनी हाडाच्या चुर्‍यातून गाळून घेतली. १८७0 मध्ये रॉबर्ट चेसब्रफ यांनी या जेलीचे पेटंट घेतले व जेलीच्या विक्रीसाठी न्यूयॉर्क शहरात जाहिरातीद्वारे प्रचारही केला; पण जेलीची फारशी विक्री झाली नाही.
रॉबर्ट यांनी मग स्वत:च्या हाताची त्वचा अँसिडने जाळली. ही जळलेली-भाजलेली त्वचा रॉबर्ट यांनी व्हॅसलीनने बरी केली. अशा प्रकारे रॉबर्ट यांनी लोकांना व्हॅसलीनकडे वळवले. त्यानंतर १८७२ मध्ये त्यांनी ब्रुकलीन येथे व्हॅसलीनचा पहिला कारखाना सुरू करून मोठय़ा प्रमाणात व्हॅसलीनचे उत्पादन सुरू केले.
विविध सौंदर्यप्रसाधनात, मलमांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जाणारे व्हॅसलीन हे हायड्रोकार्बनचे मिश्रण असून, त्याचा वितलन बिंदू हा मानवाच्या शरीर तापमानाएवढाच म्हणजे ३७ अंश से. इतका आहे. थोड्याशा उष्णतेतूनही या जेलीचे ज्वलन होऊन तिचे वाफेत रूपांतर होते. 
शुद्ध स्वरूपातील जेली ही रंगहीन व गंधहीन असते. हवेच्या किंवा कोणत्याही रसायनाच्या संपर्कात आल्यावर जेलीत कोणतीही प्रक्रिया घडून येत नाही. व्हॅसलीन पाण्यात विरघळत नसले, तरी डायक्लोरो मिथेन, क्लोरोफॉर्म, बेन्झीन, डायइथाईल, इथर, कार्बन डाय सल्फाइड आणि ऑईल ऑफ टर्पेन्टाइनमध्ये मात्र ते विरघळते.
व्हॅसलीन आणि ग्लिसरीन हे दर्शनी सारखे दिसत असले आणि दोन्हींचे कार्य त्वचेचा ओलावा टिकवणे हे असले, तरी त्यांचे मूलभूत गुणधर्म परस्परविरोधी आहेत. व्हॅसलीन हे हायड्रोकार्बन हायड्रोफोबिक असून, ते पाण्यात विरघळत नसून ते ध्रुवीयही नाही.
याउलट ग्लिसरीन मात्र हायड्रोकार्बन नसून, अल्कोहल आहे. तसेच, ते हायड्रोफिलिक म्हणजेच पाण्याला आकर्षित करणारे आहे. व्हॅसलीन हे पृष्ठभागाला घट्ट चिकटणारे असल्याने अजैविक पदार्थांपासून ते वेगळे करता येत नसले, तरी ते पेन्ट थीनर किंवा अँसिटोनमध्ये विरघळते.

भन्नाट गाड्या New Cars Technology

 भन्नाट गाड्या New Cars Technology



एका अनोख्या वाहनाचीदेखील प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती सुरू आहे. या वाहनाला 'म्युझिक कार' असे म्हणतात. गाडीमधील स्टिरिओवर चालक ज्या प्रकारचे संगीत वाजवेल, त्यानुसार या कारचा रंग बदलतो. तसेच, 'स्मार्ट की' च्या मदतीने ही कार सुरू करता येते. आणि 'स्मार्ट फोन' च्या साहाय्याने तिच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. 
याशिवायही आणखी बर्‍याच नवनवीन गोष्टी या कारमध्ये असतील. कार उत्पादक क्षेत्रातील अनेक अभियंते यावर काम करत आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे सध्याच अनेकविध प्रकारच्या गाड्या बाजारात येत आहेत. त्यात आता या प्रकारच्या नव्या गाड्यांची भर पडणार आहे. एका जागतिक कार उत्पादक कंपनीने चीनमधील नागरिकांकडून 'तुमच्या स्वप्नातली भविष्यातली कार कशी असावी आणि दिसावी?' या विषयावर कल्पक सूचना मागवल्या. त्यातील सर्वोत्कृष्ट कल्पनांवर सध्या एक कंपनी काम करत आहे. त्यातून काही नव्या व चमत्कारिक गाड्या लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. शेखर जोशी चाकांविना हवेत पळणारी हॉवर कार
चाके नसलेली ही गाडी हवेत साधारण एक ते दीड फूट उंचीवरून पळते. टायरच नसल्यामुळे रस्त्याशी होणारे घर्षण शून्य होते. त्यामुळे या कारची इंधन कार्यक्षमता खूपच वाढते. ही कार इलेक्ट्रिक मोटरवर चालत असल्यामुळे धुराचा त्रास होणार नाही. पर्यायाने पर्यावरणाची सुरक्षितता राखली जाईल. या कारमध्ये बसवलेल्या संवेदनशील उपकरणांमुळे गर्दीमध्ये धावणार्‍या इतर वाहनांची नोंददेखील ही गाडी घेऊ शकते. आकाराने छोटी असल्याने या गाडीच्या पार्किंगला थोडीशी जागा पुरते.
अशा गाड्यांसाठी विशिष्ट प्रकारचे रस्ते लागतात. रस्त्यांवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पट्टय़ा बसवाव्या लागतात. अन्यथा तांत्रिकदृष्ट्या ही कार पळू शकणार नाही. हे रस्ते कसे असावेत, यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन सुरू आहे. इलेक्ट्रिक हाय वे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर या संशोधनाचा भर आहे. मागील वर्षी बिजींग मोटार शोमध्ये या गाडीचे सादरीकरण केले गेले.
कंपनीने या गाडीला 'पीपल्स कार प्रोजेक्ट' असे नाव दिले आहे. लोकांच्या मनातील सध्या अस्तित्वात असलेल्या कारपेक्षा या कारचा आकार वेगळा आहे. तांत्रिकदृष्ट्या हे वाहन कारच्या व्याख्येत कुठेही कमी पडत नाही.
जगातील बर्‍याच प्रगत देशांत विद्युतचुंबकत्वावर आधारित हॉवरट्रेन म्हणजे जमिनीपासून वर उचललेल्या अवस्थेत हवेत अतिजलद वेगात धावणार्‍या रेल्वेगाड्यांचा अनेक वर्षांपासून लोकांच्या वाहतुकीसाठी वापर होत आहे. चाकांविना पळणारी हॉवर कार हे आज तरी स्वप्न वाटते आहे. तसेच या कारच्या निर्मितीत गुंतलेल्या तंत्रज्ञांना ही कार प्रत्यक्षात आणताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यांमधूनच आणखी नव्या सुधारणा सुचतील. या कारमध्ये नजीकच्या भविष्यात नवनवे बदल होत राहतील. अशा कारचा लोकांच्या वाहतुकीसाठी एक नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. ही गाडी विद्युतचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षणबलविरोधी कार्याच्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहे. विशेष प्रकारच्या पट्टय़ा बसवलेल्या रस्त्यांवरील प्रचंड विद्युतचुंबकीय बलामुळे ही कार हवेत वर ढकलली जाते. कार पुढे अथवा मागे जाण्यासाठी या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसविलेली असते. पूर्वनियोजित मार्गावरच ही कार पळू शकते.

क्लाऊड कॉम्प्युटिंग

क्लाऊड कॉम्प्युटिंग Cloud Computing Details in Marathi

क्लाऊड कॉम्प्युटिंग Cloud Computing Details in Marathi

 संगणकावरची माहिती (डाटा) जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा चांगला पर्याय आहे. तो महागडा वाटत असला, तरी डाटा रिकव्हरीची शाश्‍वती व त्याच्या किमतीपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. त्याचा वापरही सोयीस्कर व सहज करता येण्यासारखा आहे.
 संगणकावरची माहिती (डाटा) जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा चांगला पर्याय आहे. तो महागडा वाटत असला, तरी डाटा रिकव्हरीची शाश्‍वती व त्याच्या किमतीपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. त्याचा वापरही सोयीस्कर व सहज करता येण्यासारखा आहे.

ऊड कॉम्प्युटिंगची व्याख्या अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत करायची झाल्यास ती पुढीलप्रमाणे करता येईल. ' इंटरनेटवर आपली माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.' दिवसेंदिवस क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे सध्या आपण ईमेल तंत्रज्ञानाचा वापर पत्र लिहिणे, फोटो किंवा काही माहिती पाठवण्यासाठी नियमित करायला लागलो आहोत. तसेच, भविष्यात क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापरही नियमित होणार आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग कशासाठी?
पूर्वी विशिष्ट वह्यांमध्ये लिखापढी करून माहितीचे जतन करत असत. उदा. हिशोबासाठी रोजमेळ वापरली जात. पत्ते-फोन नंबर खिशातील वहीत (डायरी) लिहून ठेवत असत. फोटोची प्रिंट काढून ठेवत असत. आता या सर्व पद्धतींना वगळून सर्वसामान्य लोकही अशा गोष्टींसाठी संगणकाचा वापर करू लागले आहेत. अशी महत्त्वाची माहिती खराब किंवा नष्ट होऊ नये म्हणून ती दुसरीकडे जतन करणे महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची माहिती दुसरीकडे सहजरीत्या, खात्रीशीर जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा खूप चांगला पर्याय आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगचे फायदे व तोटे

क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर कसा करावा?
महत्त्वाची माहिती कोणती, हे प्रथम ठरवा.
• त्याची ं१्रं'>र्र९ी /ं१्रं'>(आकार) किती आहे, त्यानुसार ही माहिती जतन करण्यास किती जागा लागेल, ते ठरवा.
• काही ं१्रं'>¬ॅ'ी ऊ१्र५ी / ऊ१स्रु७ / ह्रल्ल६ि२ छ्र५ी र'८१्रि५ी/ं१्रं'> सारख्या कंपन्या ही सेवा मोफत देतात. हा पर्याय आपल्याला योग्य असल्यास त्याचा वापर करावा.
• वेळोवेळी आपण केलेली माहिती जतन होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. • महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या माहितीचे जतन होते. संगणक किंवा हार्डडिस्क खराब झाल्यास माहिती गेल्याने होणारे नुकसान किंवा डाटा रिकव्हरीचा खर्च वाचतो.
• या माहितीचा वापर आपण इंटरनेट असल्यास कुठूनही करू शकतो.
• अनेकांना ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणांहून वारंवार वापरता येऊ शकते.
• अनेकांना माहितीचे संकलन एकाच ठिकाणी करायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे.
• जास्त Size ची किंवा मोठी माहिती जर कोणाला पाठवायची असेल, तर ती ईमेलने पाठवणे शक्य नसते. अशा वेळीही हा पर्याय सोयीस्कर ठरतो.
• माहिती जतन करण्याच्या (ं१्रं'>ऊं३ं इूं'४स्र ऊी५्रूी२/ं१्रं'>) उपकरणाचा खर्च वाचतो.
• जर जतन करायची माहिती (डाटा) खूप जास्त असेल, तर क्लाऊड कॉम्प्युटिंग खूप महाग पर्याय होऊ शकतो.
• क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या बाबतीत सुरक्षितता ही एक महत्त्वाची बाब आहे. सेवा देणारी कंपनी खात्रीशीर असेल, तरी हॅकर्स (ं१्रं'>ूं'ी१२/ं१्रं'>) चा डोळा अशा कंपनीवर नेहमी असतो.

चतुर आणि चटक चांदणी

 चतुर आणि चटक चांदणी 



चतुरांचे संयुक्त डोळे डोक्याच्या वरील भागामध्ये एकमेकांच्या अगदी जवळ चिकटलेले दिसतात. चटक चांदणीचे डोळे एकमेकांपासून दूर असतात. चतुरांचे मागील पंख पुढल्या पंखापेक्षा बरेच रुंद असतात. चटक चांदण्यांचे दोन्ही पंख समान आकाराचे, निरुंद असून, ते देठासारख्या भागाने वक्षास जोडलेले. चतुरांचे पंख लाल, पिवळे आणि काळसर पट्टय़ांनी रंगलेले असतात. चतुर जमिनीवर अथवा झाडाच्या फांदीवर बसला, की त्याचे पंख वक्षाच्या डाव्या-उजव्या बाजूस जमिनीला समांतर पसरलेले असतात. चटक चांदणीचे अरुंद पंख फारसे रंगीत नसतात. चटक चांदणी झाडोर्‍याच्या फांदीवर विसावली, की पंख वक्षावर तिरकस कोनात किंवा पोटाच्या लांबसर बाजूंना समांतर राहतात. चटक चांदण्याच्या तुलनेत चतुर मोठे असल्याने ते डोळ्यांत चांगलेच भरतात. त्यांच्याकडे सहजपणे लक्ष जाते. हे दोन्ही कीटक 'भुईचर' असले, तरी त्यांना भुईवर चालता येत नाही. त्यांची अंडी आणि पिल्ले जलाशयामध्ये आढळतात.
जपानी लोकांमध्ये चतुरांना खूप महत्त्व दिले जाते. एके काळी जपानला चतुरांची बेटे म्हणून ओळखले जात होते. जपानी दागिन्यांमधील कलाकुसरीवर चतुरांची छाया दिसते. जपानी मुले लांबसर केसाच्या दोन्ही टोकांस लहान वजनाचे दगड बांधतात आणि तो केस उडणार्‍या चतुरांच्या थव्यामध्ये भिरकावतात. तो केस चतुरांच्या काटेरी पायांत अडकतो. साहजिकपणे स्वत:ला त्या जाळ्यातून सोडविण्याच्या प्रयत्नांत चतुराला जमिनीवर यावे लागते. जपानी मुलांचा हा खेळ आहे, की खाण्यासाठी चतुर पकडण्याचा तो सापळा आहे? तेच जाणोत. इंडोनेशिया, जपान इत्यादी देशांमध्ये चतुरांचा जेवणामध्ये वापर करतात, असे सांगितले जाते.

बुरशी आणि वनस्पती

बुरशी आणि वनस्पती



पृथ्वीतलावर अगदी प्रथम स्थापित झालेल्या वनस्पतींच्या मुळांची रचना मातीतील पोषकद्रव्ये शोषून घेण्याइतपत विकसित झाली नसावी. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बुरशीकरवी हे काम करवून घेण्यास वनस्पतींनी सुरुवात केली असावी. ही बुरशी वनस्पतींच्या मुळांबरोबरसुद्धा सहजीवन स्थापित करतात. त्यांना 'मायकोरायझा' असे म्हणतात. काही बुरशींच्या कवकजालाचे धागे वनस्पतींच्या मुळाच्या अंतर्भागात जाऊन पेशीमध्ये प्रवेश करतात, तर काही बुरशींचे बाह्यांगावरच आवरण तयार होते. बुरशीच्या कवकजालाचे धागे लांबपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे हे धागे वनस्पतीची मुळे पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणापर्यंत पोहोचून तेथील पोषकद्रव्ये जमिनीतून शोषून घेऊन त्याचा पुरवठा वनस्पतींच्या मुळांना करतात.
वनस्पतींना आवश्यक असणारी काही खनिजद्रव्ये मातीच्या कणांना घट्ट धरून बसल्याने सहज विरघळू शकत नाहीत व मुळांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी बुरशी त्यांच्या मदतीला धावतात. बुरशीद्वारे स्रवल्या जाणार्‍या काही रसायनांमुळे ती विरघळवली जातात. असा खनिजद्रव्यांना सहज शोषून घेऊन त्यांना थेट मुळापर्यंत पोहोचविण्याचे काम बुरशी करते. बुरशीबरोबरच्या या सहजीवनामुळे उपयुक्त गोष्टींचा खजिनाच वनस्पतींना गवसला आहे. बुरशींमुळे वनस्पतींमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा अतिशुष्क जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता वाढते. आम्लवर्षा किंवा प्रदूषणयुक्त प्रतिकूल वातावरणावर या वनस्पती मात करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या रोगाविरुद्धही त्यांची प्रतिकारप्रणाली विकसित होते. या सगळ्यांच्या बदल्यात बुरशींनाही आवश्यक असलेले अन्नघटक मिळतात. काही अभ्यासकांनी हे सहजीवन अस्तित्वास असलेल्या व नसलेल्या रोपांचे निरीक्षण केले असता हे सहजीवन प्रस्थापित झालेली रोपे इतर रोपांपेक्षा जास्त जोमाने वाढत असल्याचे दिसून आले. प्रयोगशाळेत मायकोरायझायुक्त रोपे वाढवून ती शेतकर्‍यांना पुरविण्याचे काम काही व्यावसायिक करतात. गहू, तांदूळ, सोयाबीन व इतर कडधान्ये यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..

 साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..


मानव वगळता बहुतेक प्राणिमात्रांचा साहचर्य हा नैसर्गिक गुणधर्म असल्याचे दिसते. काही जातींचे भुंगे हे बुरशीबरोबर सहजीवन जगत असतात. ते बुरशीला वाढवतात व बुरशीही त्यांच्या कायम उपयोगी पडत असते. गेंरे हा कीटकांचाच प्रकार आहे. त्यांचेही बुरशीबरोबर चांगले सहकार्य असते. किंबहुना काही जातीचे भुंगेरे तर बुरशीशिवाय दिसतच नाहीत. या भुंग्यांनी केलेल्या झाडाच्या खोडात बुरशीची शेतीच केलेली असते.
वाळवी आणि मुंग्यांप्रमाणे काही भुंगेरे किंवा बीटल्ससुद्धा बुरशींबरोबर सहजीवन जगतात. अम्ब्रोशिया नावाचे भुंगेरे त्याला उपयुक्त अशा मृत झाडाच्या खोडामध्येच बोगदा तयार करतात आणि त्यामध्ये बुरशीची शेती करतात. बोगदा तयार झाला, की त्यामधे बुरशीच्या बीजाणूंचे रोपण केले जाते. बुरशी काही विकरे स्रवून झाडांच्या पेशीमधील अन्नघटकांचे विघटन करतात आणि या तयार खाद्याचा आयताच नजराणा अम्ब्रोशिया भुंगेर्‍यांना मिळतो. बुरशींना भुंगेर्‍यांच्या नत्रयुक्त विष्ठेमधून पोषकद्रव्ये मिळतात.
बुरशीच्या वाढलेल्या कवकजालाच्या धाग्यांवर भुंगेर्‍यांची मादी अंडी घालते. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या भुंगेर्‍यांच्या अळीसदृश बाळाचे खाऊ-पिऊ घालून संगोपन व संरक्षण बुरशी करते. यामुळे निसर्गामध्ये अम्ब्रोशिया भुंगेरे आणि बुरशी एकमेकांशिवाय आढळूच शकत नाहीत. अशाच प्रकारचे सहजीवन गांधिलमाशींच्या काही प्रजाती आणि बुरशींमध्ये आढळते. बुरशीच्या अम्ब्रोशियाला या प्रजातीबरोबरच अनेक बुरशी या भुंगेर्‍यांबरोबर सहजीवन स्थापित करतात.
प्राचीन काळामध्ये जगात प्रचलित असलेली 'वस्तुविनिमय पद्धती' बुरशी आणि कीटकांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये दिसून येते. आपल्याकडे उपलब्ध असेल, ते दुसर्‍यास द्यावे व दुसर्‍याकडून आपणास हवे ते घ्यावे हा सरळ-सोपा मार्ग पुन्हा एकदा आपण यांच्याकडून शिकून आचरणात आणायला हवा. उत्क्रांतीच्या वाटेवर या दोन्ही प्रजातींनी एकमेकांना समजून-उमजून केलेली सहकार्याची भावना ही विज्ञान-संशोधनाच्याही पुढची आहे. का ? कसे ? याची उत्तरे मिळत राहतील; परंतु आजही अशा सहजीवनाकडून आपल्याला मात्र बरेच काही शिकण्यासारखे आहे.

व्होल्टा Volta Scientist

व्होल्टा Volta Scientist 

व्होल्टा Volta Scientist


कृत्रिमरीत्या वीजनिर्मितीमध्ये अनेक महान संशोधकांनी अपूर्व योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. या संशोधकांमध्ये व्होल्टा यांचे संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. खरेतर व्होल्टा यांनी आपले संशोधन मिथेन या वायूच्या शोधापासून सुरू केले. त्यांनी मिथेन हा वायू अलग करून त्याच्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना विजेविषयी संशोधन करण्यात रस वाटू लागला. सुरुवातीचे त्यांचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक ल्युॅगी गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्‍या विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्यांना तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्‍चय केला. रासायनिक द्रव्य वापरून वीजनिर्मिती कशी करता येईल, याविषयीचे संशोधन त्यांनी सुरू केले. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. 
हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. त्यामुळे विद्युतघटाच्या संशोधनाचे श्रेय यांना मिळते. पर्शियन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी अशा विद्युतघटाचा वापर केला होता, असे आढळून आले.
विद्युतघटाच्या निर्मितीमुळे कमी प्रमाणात होणार्‍या विजेच्या वापरासाठी एक चांगले साधन उपलब्ध झाले. त्यात साधनांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत गेली. आता रासायनिक द्रव्याच्या ऐवजी घनपदार्थांचा वापर करून विद्युतघट निर्माण करता येतात. मनगटी घड्याळ, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आता घन विद्युतघटाचा वापर आहे. व्होल्टा यांनी प्रथमच कॅपॅसिटरची रचना तयार केली. या रचनेचा वापर करून त्यांनी विद्युतदाब व विद्युतभार यांचा संबंध प्रस्थापित केला. मूलभूत विज्ञानामध्ये दिलेले हे त्यांचे मौलिक योगदान आहे. धातूच्या तारांचा वापर करून कोमो ते मिलान या ५0 कि. मी. अंतरावर असणार्‍या शहरामध्ये त्यांनी संबंध प्रस्थापित केला. त्यांनी एका शहरातून एक कळ दाबून विद्युतप्रवाहाच्या साहाय्याने दुसर्‍या शहरातील पिस्तूल उडवून दाखविले. त्यांच्या या प्रयोगाला खूपच महत्त्व आहे. कारण या प्रयोगामुळे पुढे टेलिग्राफची कल्पना प्रत्यक्षात निर्माण झाली. या कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. नेपालियन बोनापार्ट यांनी त्यांना काउंट ही पदवी दिली. इटालियन सरकारने त्यांच्या 'लिरे' या चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे विद्युतदाबाच्या परिमाणाला 'व्होल्ट' असे नाव देण्यात आले. 

ISON Comet आयसॉन धूमकेतू

ISON Comet आयसॉन धूमकेतू

ISON Comet आयसॉन धूमकेतू

धूमकेतू 'आयसॉन' हा नुकताच सूर्याच्या खूप जवळून गेला. या धूमकेतूचा शोध लागला होता तेव्हा तो खूप प्रखर होईल आणि भरदिवसासुद्धा दिसेल, असे वाटले होते; पण जेव्हा नवीन निरीक्षणे हाती आली तेव्हा हा धूमकेतू खूप प्रखर होणार नाही हे लक्षात आले.
या धूमकेतूबद्दलची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा सूर्याच्या इतक्या जवळून जाणार होता (आता तो गेला आहे), की त्याचे सूर्याच्या गुरुत्वीय बलाच्या लाटांमुळे आणि ऊर्जेमुळे तुकडे होतील का, ही शंका वर्तवण्यात आली होती. आजचे हे चित्र 'सोहो' या अवकाशातील वेधशाळेने घेतले आहे. ही वेधशाळा नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आहे. ही वेधशाळा सूर्याच्या वरच्या वातावरणाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आली आहे. यात सूयार्चा भाग एका काळ्या चकतीने झाकला आहे, जेणेकरून सूर्याच्या प्रखर तीव्रतेचा या कॅमेर्‍याला धोका पोहोचणार नाही.
या चित्रात डावीकडचा भाग आयसॉन स्रू्याच्या दिशेने जात असतानाचा आहे. यात आपण धूमकेतूची लांब शेपटी बघतो, तर चित्राच्या उजव्या भागात तो सूर्याच्या खूप जवळून गेल्यानंतर त्यावर झालेले परिणाम दिसून येत आहेत. धूमकेतूची तीव्रता मंद झाली आहे. काही शास्त्रज्ञांनी या चित्रांवरून धूमकेतू कदाचित नष्ट झाला असावा असे सांगितले, तर काहींचा कयास आहे, की सूर्याजवळून गेल्यानंतरही धूमकेतूचा गाभा अजून टिकून आहे. या चित्राच्या दोन्ही भागांची तुलना करून बघा. आपल्याला सूर्याभोवतीचे बदलते वातवरणही चांगल्या प्रकारे दिसत आहे. तसेच, या चित्रात काही तारेही आहेत. 

चहाच्या पेल्यातील वादळ

 चहाच्या पेल्यातील वादळ

चहाच्या पेल्यातील वादळ' या साध्या वाक्प्रचारावरून शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं व त्यातून निष्कर्ष काढले. विज्ञानात कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही, असं म्हणतात ते खरंच आहे. ल्लक गोष्टीसाठी विनाकारण झालेला वाद म्हणजे 'चहाच्या पेल्यातील वादळ' असं आपण म्हणतो. काही वैज्ञानिकांनी खरोखरच बंद किटलीत चहा उकळत असताना काय घडतं, याचा अभ्यास करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी 'टेंपेस्ट' (म्हणजे वादळ) नावाचा संगणकी कार्यक्रम वापरून चहाच्या किटलीत काय घडतं, ते बघायचा घाट घातला. त्यांना या प्रयोगासाठी बृहद्संगणकाची मदत घ्यावी लागली. किटलीत थंड पाणी ओतून ती तापविली की त्या पाण्यात प्रवाह सुरू होतात. बाष्प साठतं, त्याचा दाब वाढतो. इतरही काही घटक कार्यक्षम होतात, असे या प्रयोगात शास्त्रज्ञांना आढळलं. 
हा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मते या अभ्यासामुळे एखाद्या बंद प्रणालीमध्ये ट्रायू (फ्लूईड्स) कसे वागतात, हे सांगणं शक्य होणार आहे. आपलं शरीर अशीच एक ट्रायूयुक्त बंद प्रणाली आहे, त्यामुळे वैद्यकीय अभ्यासात या वादळी कार्यक्रमाची मदत होईल. विशेषत: शरीरांतर्गत अवयवांच्या कार्यप्रणालीचे बारकावे या प्रकारे अभ्यासता येतील आणि त्यामुळे काही नव्या उपाययोजनाही अमलात आणता येतील. भूशास्त्रज्ञांना भूजल आणि खनिज तेलाचे भूपृष्ठांतर्गत प्रवाह कसे वाहतात, याची माहिती यामुळे मिळू शकेल. त्याचबरोबर मान्सूनबाबतचे अंदाजही यातून काढता येणे शक्य होणार आहे.

हेलिक्स तेजोमेघातील गाठी

 हेलिक्स तेजोमेघातील गाठी


तेजोमेघ व त्याच्या केंद्रस्थानी असलेला तारा यांच्या पृष्ठभागावरून वायू फेकला जात असतो. या वायूंची एकमेकांबरोबर टक्कर झाल्यानंतर त्यातून निर्माण होणार्‍या दाबामुळे तेजोमेघात गाठी तयार होतात. वकाशात परिक्रमा करणार्‍या हबल दुर्बिणीतून कुंभ तारकासमूहातील हेलिक्स तेजोमेघाची चित्रे घेण्यात आली तेव्हा त्या या तेजोमेघात धूमकेतूसारख्या गाठी दिसून आल्या, त्यांना 'कॉमेटरी नॉट्स' म्हटले गेले. अशा प्रकारच्या गाठी प्रथमच दिसल्या होत्या. प्लॅनेटरी तेजोमेघांसंदर्भात हा नवीन शोध होता.
या तेजोमेघात शास्त्रज्ञांनी हजारो गाठींची नोंद केली. या गाठींचा आकार आपल्या सूर्यमालेच्या दुप्पट आहे आणि त्यांचे शेपूट सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरासरी अंतराच्या हजारपट लांब आहे. या गाठींचे वस्तुमान पृथ्वीइतके आहे. या गाठींची दिशा या तेजोमेघाच्या केंद्राच्या दिशेने आहे, जशा सायकलीच्या तारा असतात, पण तुटलेल्या.
नंतर अशा गाठी इतर प्लॅनेटरी तेजोमेघातही दिसून आल्या. या गाठींचे कोडे पूर्णपणे सुटलेलं नसलं तरी काही शास्त्रज्ञांचे मत आहे की, या तेजोमेघांच्या केंद्रस्थानी असलेल्या तार्‍यातून मोठय़ा प्रमाणात वायू बाहेर फेकला जातो. जेव्हा या वायूची टक्कर तेजोमेघातील वायूशी होते तेव्हा तार्‍यातील वायूच्या दाबामुळे तिथे अशा प्रकारच्या गाठी तयार होत असाव्यात.
असा वायू सूर्यातूनही फेकला जातो. हा वायू प्रकाशासारखा सतत फेकला जात नसतो तर तार्‍याच्या पृष्ठभागावर होणार्‍या बदलातून तो बाहेर फेकला जातो. या वायूची घनता खूपच कमी असते; पण त्याला वेग असतो, त्यामुळे त्यांची ऊर्जाही खूप जास्त असते.
या गाठींचा शोध अचानक लागला होता. २00२ मध्ये सिंहतारका समूहातील उल्कावर्षावावेळी हबल दुर्बिणीला उल्कावर्षावाच्या उगमस्थानाच्या बरोबर विरुद्ध दिशेला वळविण्यात आले होते. हा तेजोमेघ त्याच दिशेला होता. तेव्हा याची काही चित्रे घेऊन त्यांना जोडल्यावर त्यांचे हे स्वरूप पहिल्यांदा लक्षात आले होते.

ध्वनीचा वेग, Speed of Sound

 ध्वनीचा वेग, Speed of Sound

 ध्वनीचा वेग, Speed of Sound



आदिमानवाला स्वत:च्या संरक्षणासाठी आणि भक्ष्याचा शोध घेण्यासाठी ऐकू येणार्‍या आवाजाचा वेध घेत त्यावर आवश्यक ती कृती करणे भाग होते. त्यामुळे मानवाच्या कर्णेंद्रियांच्या गुणवत्तेत सुधारणा होत गेली. आदिमानवाला त्याच्या शोधक वृत्तीमुळे, त्या काळातील दैनंदिन वापरातील साधनांमुळे वेगवेगळ्या ध्वनींचा परिचय झाला असावा. नाला ऐकू येऊ शकतो तो आविष्कार म्हणजे 'ध्वनी' किंवा 'आवाज.' आवाज नेहमी एखाद्या वायू, द्रव किंवा घन माध्यमातील भौतिक प्रेरणांमुळे निर्माण होणार्‍या तरंगाच्या स्वरूपात असतो. हे तरंग स्थितीस्थापकतेमुळेच प्रस्थापित होतात म्हणूनच त्यांना 'ध्वनितरंग' असे म्हणतात. मानव श्रवणेंद्रियाला सुमारे १0 ते २0,000 हर्टस् या र्मयादांच्या तरंगांचाच बोध होऊ शकतो. या प्रकारच्या तरंगांना 'श्राव्यध्वनी' असे म्हणतात. 
त्यापेक्षा, म्हणजे १0 हर्टस्पेक्षा कमी कंप्रतेच्या तरंगांना अवश्राव्य ध्वनी तर २0,000 हर्टस्पेक्षा जास्त कंप्रतेच्या तरंगांना 'श्राव्यध्वनी' असे म्हणतात. प्रकाशतरंग निर्वातातून प्रसारित होतात. ध्वनितरंगाच्या प्रसारणासाठी मात्र कोणते तरी वास्तव किंवा पदार्थीय माध्यम आवश्यक असते. या माध्यमाच्या कणांमध्ये असलेल्या जडत्व आणि स्थितिस्थापकता या दोन गुणांमुळेच त्यातून ध्वनितरंगाचे प्रसारण होऊ शकते. निर्वातात ध्वनितरंग प्रस्थापित होऊ शकत नाहीत. सामान्यत: ध्वनीच्या प्रसारणाचे माध्यम 'हवा' हे आहे.
इ. स. १६३५ मध्ये पी गॉसदी यांनी दूरवर उडविलेल्या तोफेचा जाळ दिसणे आणि बार ऐकू येणे या दोन घटनांमधील कालखंड मोजून, त्यावरून ध्वनीच्या हवेतील वेगाचे मूल्य काढले. १७ व्या शतकात आयझ्ॉक न्यूटन यांनी ध्वनी हा तरंगमय आहे, हे गृहीत धरून ध्वनीच्या हवेतील वेगाचे समीकरण शोधून काढले. त्यातील त्रुटी लापलास यांनी दुरुस्त केल्या. कालांतराने पी गॉसदी यांच्या प्रयोगाच्या आधारावर पॅरिस अँकॅडमीच्या सभासदांनी १७३८ मध्ये ध्वनीचा वेग उघड्यावर मोजण्याचा प्रयोग केला.
या प्रयोगात एकमेकांपासून २८.८ कि. मी. अंतरावर असलेल्या दोन टेकड्यांवर निरीक्षक बसविण्यात आले होते. दोन्ही टेकड्यांवर आळीपाळीने तोफ डागण्यात आल्या. तोफ उडाल्यानंतर दिसणारा प्रकाश आणि आवाज निरीक्षकांनी अचूकपणे मोजला. त्यावरून ध्वनीचा वेग गणित मांडून काढला. या प्रयोगात प्रकाशवेग अर्मयाद आहे, असे गृहित धरले होते.
एच. रेनॉल्ट या शास्त्रज्ञाने या पद्धतीत वेळ मोजण्यासाठी विद्युत साधनांचा उपयोग करून सुधारणा केली. ई. एस. स्कलंगन यांनी रेनॉल्ट यांच्या पद्धतीत सुधारणा केली. त्यांनी १९१८ मध्ये वार्‍याच्या आणि हवेतील आद्र्रतेच्या प्रमाणात ध्वनीचा वेग निरनिराळा असतो, असा निष्कर्ष काढला. र्मयादित अंतर वापरून ध्वनीवेगाचे मापन या आधुनिक पद्धतीने केले आहे. या पद्धतीत ध्वनीला विशिष्ट अंतर तोडण्यासाठी किती वेळ लागला तो मोजून, त्यावरून ध्वनीवेग काढल्याने त्याला 'प्रत्यक्ष पद्धत' म्हणतात.
अप्रत्यक्ष पद्धतीचाही अवलंब शास्त्रज्ञांनी ध्वनीवेग काढण्यासाठी केला आहे. कोलॅडन आणि स्थ्यूर्न यांनी जिनिव्हा सरोवरात प्रयोग करून ध्वनीचा पाण्यातील वेग मोजला. १९१९ मध्ये मार्टी यांनी समुद्राच्या पाण्यात १३ कि. मी. खोल अंतरावर प्रयोग करून ध्वनीचा वेग निश्‍चित केला. 'नॅशनल ब्युरो स्टँडर्ड'ने जास्त विश्‍वासार्हता असलेल्या सामान्य खोलीच्या तापमानाला आवाजाचा वेग ३४४ मी/से. किंवा ७५८ मैल/से. ला मान्यता दिली आहे. आवाजाचा वेग हा तापमानावर अवलंबून असल्याने हिवाळय़ात दिवसा आवाजाचा वेग कमी असतो. म्हणजेच ३३0 मी/से. ला तर उन्हाळ्यात दिवसा आवाजाचा वेग जास्त असतो म्हणजे ३३५ मी/सें. एवढा असतो.

बुरशी आणि मुंग्या

 बुरशी आणि मुंग्या

 बुरशी आणि मुंग्या
मुंग्यांच्या वारूळात बुरशीची शेती असते व ती मुंग्यांनीच जाणीवपूर्वक केलेली असते. वनस्पतींच्या पानांचे विघटन करून बुरशी कामकरी मुंग्यांना खाद्य पुरवत असते. त्या बदल्यात मुंग्या बुरशीला सुरक्षित आश्रय देतात. ष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळणार्‍या अटाईन नावाच्या मुंग्यांच्या प्रजातीसुद्धा स्वत:चे खाद्य तयार करण्यासाठी बुरशींचा वापर करून घेतात. या विशिष्ट मुंग्यांच्या प्रजाती प्रदेशनिष्ठ, म्हणजे ठराविक प्रदेशात सिमीत असून दक्षिण, मध्य अमेरिका व मेक्सिकोतील काही जंगलांमध्येच आढळतात. 
मुंग्यांमधील पंख असलेली मादी तिच्या तोंडाच्या मागे असणार्‍या छोटयाशा खिशामध्ये (इन्फ्राबकल पाऊच) तिला हव्या असलेल्या बुरशींचे बिजाणू साठवते. आपली वसाहत स्थापन करण्याआधी ती सर्वात अगोदर तिला पोषकद्रव्ये पुरवू शकेल अशी वनस्पती शोधून काढते. निवडलेल्या वनस्पतींपासून, बुरशीसाठी काही धोका तर नाही ना हेही तपासून घेते. त्यानंतर मग मुंगीराणी जमिनीखाली तिचे घर बांधायला सुरुवात करते. या घरातील एक खोली तयार झाली की कामकरी मुंग्यांनी आणलेले
वनस्पतींच्या पानांचे तुकडे त्यामध्ये पसरते. मग त्यावर होते बुरशीच्या बिजाणुंचे रोपण. नको असलेल्या बुरशांना अटकाव करण्यासाठी या मुंग्या स्ट्रिप्टोमायसिस नावाचा प्रतिजैविके निर्माण करणारा बेक्टेरियाही पदरी बाळगत असल्याची नोंद सापडते. बिजाणुंचे कवकजालामधे रुपांतर व्हायला लागले की त्यावर मुंगी राणी रोज हजारो अंडी घालते. यातूनच कामकरी मुंग्यांची पुरेशी सेना तयार होते. काही अंडी ती स्वत: खातेही. मुंग्या त्यांनी तयार केलेल्या बुरशीच्या शेतीमध्ये वनस्पतींच्या पानांचे तुकडे ठेवतात. आणि या तुकडयांचे विघटन करून सुरक्षित आश्रयस्थानाच्या बदल्यात बुरश्या मुंग्यांना तयार खाद्य पुरवतात.
लेपिओटा, झायलेरिया, ऑरिक्युलारीया या बुरशांचे अटाईन मुंग्यांबरोबर सहजीवन आढळते. मुंग्या या मुळातच कष्टाळू, शिस्तबद्ध आणि सहकार्याची भावना ठेवून असणार्‍या समाजशील प्रजाती आहेत. परंतु बुरशांकडे मात्र प्रथमदर्शनी अपायकारक म्हणूनच पहिले जाते. एकमेकांना सहाय्य करून प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहाण्याचे शहाणपण निसर्गत: या दोन सजीवांना मिळत असावे. आणि यामुळे त्यांचे संवर्धन होण्यास आपोआपच मदत होते.