Blogroll

किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

 किरणोत्सर्गी उपचार

आय.एम.आय.टी.- यामध्ये रुग्णाच्या कर्करोगग्रस्त अवयवावर सोडलेल्या प्रकाशझोताचे पुन्हा उपविभाग करून छोटे छोटे झोत बनवले जातात. या प्रत्येक उपविभागातून जाणारा किरणोत्सर्ग संगणकाद्वारे नियंत्रित केला जातो. यामुळे कर्करोगाच्या पेशीवर थोडा जास्त किरणोत्सर्गाचा मारा करता येतो आणि बाजूच्या निरोगी पेशींवर होणारा मारा सौम्य करता येऊ शकतो. यामध्ये बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार यंत्र किंवा टेलिथेरपी आजही अनेकदा वापरला जातो. यंत्नाची रचना

टेलिथेरपी यंत्र एकात एक गुंफलेल्या वर्तुळाकार भागांनी बनलेले असते.
१ शिशापासून बनलेले आंतरराष्ट्रीय मानकानुसार बनलेला किरणोत्सर्गी पदार्थांना पकडून ठेवणारा बाह्य भाग.
२ त्याच्या आतील एक लोखंडी वर्तुळाकृती पट्टी
३ किरणोत्सर्गाचा उगमस्रोत- एखाद्या डबीसारख्या दिसणार्‍या ३0 मि.मी. आकाराच्या या भागाच्या आत कोबाल्ट-६0 किंवा तत्सम किरणोत्सर्गी पदार्थ ठेवलेला असतो. त्यांच्या भोवती युरेनियम किंवा टंगस्टनने बनलेले एक संरक्षक कवच असते. या सर्व गोष्टींना सामावणारे स्टेनलेस स्टीलने बनलेले दुपदरी आवरण आणि तसेच दुपदरी झाकण असते.
४ एक विशेष मोजमाप वापरून बनवलेल्या क्ष-किरण यंत्राद्वारे उगमस्रोताच्या डबीतील किरणोत्सर्गी पदार्थामधून किरणोत्सर्गाचा झोत निर्माण केला जातो. शास्त्रीय तत्त्व
कर्करोगाच्या पेशीतील डी.एन.ए. किरणोत्सर्गी पदार्थांचा झोत त्यावर पाडून नष्ट करणे हे उपचाराचे मुख्य तत्त्व. डी.एन.ए. नष्ट करण्याचे कार्य या किरणोत्सर्गी प्रकाशझोतातील फोटॉन, बोरॉन, कार्बन, निऑन किंवा तत्सम किरणोत्सर्गाने प्रेरित कण करतात. हे कण कर्करोगाच्या डी.एन.ए.ला थेट नष्ट करतात किंवा कर्करोगाच्या पेशीतील पाण्याच्या कणांचे रूपांतर हायड्रोक्सील मुक्तरेणूमध्ये करतात. हे मुक्तरेणू त्या कर्करोगपेशीचे विघटन करून तिला नष्ट करतात. संशोधनाचा इतिहास
१८९५ मध्ये विल्हेम रॉन्टजेनने क्ष-किरणांचा शोध लावला. त्यानंतर वर्षभरातच अमेरिकेतल्या शिकागोमधील डॉ. एमिल ग्रब यांनी क्ष-किरणांचा वापर करून कर्करोगाचा इलाज करता येऊ शकेल असे प्रतिपादन केले. इ.स. १९00 मध्ये मादाम मेरी क्युरीने पोलोनियम आणि रेडियम या किरणोत्सर्गी संयुगांचा शोध लावला आणि या उपचारांसाठी एक नवे दालनच उघडले गेले. १९४0मध्ये कर्करोगाच्या इलाजासाठी कोबाल्ट आणि केझीयम या किरणोत्सर्गी पद्धती विकसित झाल्या. १९७0मध्ये सी.टी. स्कॅनचा शोध लावल्यावर त्या उपचारांची जागा लिनियर अँक्सिलरेटरने घेतली. तर १९८0 पर्यंत एम.आर.आय. आणि पेटस्कॅनचा वापर सुरू झाल्यावर आय.एम.आय.र्टी. आणि आय.जी.आय.टी. या अशा उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अस्तित्वात आल्या. प्रकार- किरणोत्सर्गी उपचारांचे तीन प्रकार आहेत
१. बाह्य प्रकाशझोत किरणोत्सर्गी उपचार- (एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी) किंवा टेलिथेरपी
२.बंदिस्त स्रोत किरणोत्सर्गी उपचार- (सील्ड सोर्स रेडिएशन थेरपी) किंवा ब्रेकिथेरपी
३. रक्ताद्वारे किरणोत्सर्गी संयुगे देऊन उपचार- (रेडिओ आयसोटोप थेरपी) र्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत त्याचे निदान झाले तर शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे हे शक्य झाले आहे; पण दुर्दैवाने आपल्या देशात बहुसंख्य रुग्ण हे आजार खूप वाढल्यानंतरच उपचारासाठी येतात. अशा वेळी डॉक्टर त्यांना 'लाईट घेण्याचा' उपाय सांगतात, यालाच क्ष-किरणांद्वारे केले जाणारे किरणोत्सर्गी उपचार म्हणतात. अशा अंतिम अवस्थेतील कर्करोगाचा इलाज करणार्‍या डॉक्टरांसाठी ते हार निश्‍चित असलेले एक प्रकारचे युद्ध असते; पण तरीही त्या रुग्णाचे आयुष्य काही वर्षांनी वाढविणे यामुळे शक्य होते. मानवी बुद्धिमत्तेनेही हात टेकलेला आजार म्हणजे कर्करोग. आजच्या आधुनिक काळातही मानवासाठी तो असाध्यच आहे, मात्र विविध प्रकारचे संशोधन, औषधे, उपकरणे यातून त्याची तीव्रता कमी करणे शक्य झाले आहे. रेडिओथेरपी ही अशीच उपचारपद्धती आहे. रुग्णाचे आयुष्य यामुळे वाढू शकते.

ख्रिसमस ट्री

ख्रिसमस ट्री


ख्रिसमस ट्री
डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरचा बारावा महिना. अखेरचा महिना असला, तरी वाच्यार्थाने तो ं१्रं'>ऊीूं /ं१्रं'>म्हणजे दहावा महिनाच आहे. २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस. त्यापूर्वीची रात्र ख्रिसमस म्हणून साजरी करतात. सगळे ख्रिश्‍चन बांधव उत्साहात असतात. घराघरांवर आकाशदिवे लावले जातात. चर्चमध्ये जमून प्रार्थना करतात. केक कापतात. त्याचे परस्परांना वाटप करतात. आनंद व्यक्त करतात. ख्रिसमस ट्रीच्या साक्षीने हे सगळे सुरू असते. ख्रिसमस ट्री हा नाताळ सणाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशिवाय हा सणसाजराच होऊ शकत नाही. या सणाचे हे प्रतीक होण्यामागे भलामोठा इतिहास आहे. नाताळबाबाच्या आगमनाबरोबरच ख्रिसमस ट्री दिसू लागतो. हिरव्यागार फांद्या व त्यावर लावलेले आकर्षक दिवे. टेबलवर ठेवता येईल इतक्या लहान आकारापासून ते घराच्या अंगणात मावणार नाही एवढा मोठा आकार असलेला हा ख्रिसमस ट्री म्हणजे नक्की काय? खरेच असा वृक्ष आहे का? असला तर तो कुठे असतो? कसा दिसतो? ख्रिसमसनिमित्त उलगडलेल्या या अनोख्या वृक्षाचा मनोरंजक इतिहास.

या वृक्षाच्या प्रजनन अवयवांना वानसशास्त्रज्ञ 'फुलं' म्हणत असले, तरी सामान्यजन त्यांना फुलं म्हणण्याचं धाडस करणार नाहीत. 'मा फलेषु कदाचन' हे वचन आरॉकॅरिया आणि त्याच्या जातकुळीची सर्वच मंडळी तंतोतंत पाळतात. त्यांना बिया येतात; पण फळं नाहीत. बिया अनावृत्त म्हणजे उघड्या. या बियांच्या गुच्छामुळे शंकू तयार होतो. त्यालाच फूल समजले जाते. सजवल्यावर देखणेपणात भर आरॉकॅरिया अत्यंत देखणा वृक्ष आहेच. पण, २५ डिसेंबरला तर त्याची शान अधिकच वाढते. कारण, त्या दिवशी तो ख्रिस्तजन्माचं प्रतीक आहे. त्याला सजवण्यासाठी त्यावर मेणबत्त्या लावण्याची प्रथाही आहे. आता मेणबत्त्यांची जागा रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांनी घेतली आहे. तसेच त्यावर रंगीत कागदात गुंडाळलेली चॉकलेट व लहान मुलांना नाताळबाबाकडून भेट मिळणार्‍या वस्तूही लावतात. त्यामुळेच या वृक्षाच्या देखणेपणात भरच पडते. देव आणि भक्तांमधील दुवा
आरॉकॅरिया 'ख्रिसमस ट्री' कसा झाला? हा तर दक्षिण गोलार्धात अस्तित्वात आला. ख्रिस्तायन घडलं उत्तर गोलार्धात. जेरुसलेमच्या आसपासच्या प्रदेशात. मग त्यासाठी आरॉकॅरिया दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात कसा पोहोचला? अर्थात, माणसामुळेच. आरंभीच्या काळात 'ओक' वृक्षाला 'ख्रिसमस ट्री'चा मान होता. ओक म्हणजे 'कॉर्क ट्री'. ज्याच्या सालीपासून बाटलीची बुचे तयार करतात, तो वृक्ष. १६0५पर्यंत ख्रिस्ती धर्म र्जमनीतही झाला होता. तिथे बॉनीफेस नावाचे धर्मोपदेशक होते. त्यांनी लोकांना असं पटवून दिलं, की ओकपेक्षाही आरॉकॅरिया हा अधिक योग्य. कारण, ओकचा फापटपसारा अधिक. आरॉकॅरिया एखाद्या अँटेनासारखा आकाशाकडे झेपावतो. दयाघन प्रभूकडे तुमच्या प्रार्थना, मागण्या पोहोचवतोच; पण त्याच्याकडून तुमच्यासाठी आशीर्वादही आणतो. खरं तर देवबाप्पा तुमच्या घरात आणि मनातच आहे. एका वृक्षाला घरी आणून देवाला त्यावर स्थानापन्न करा. म्हणून - ख्रिसमस वृक्षाला सजवतात. त्यावर दीप लावतात.पाह पानांचा आकार त्रिकोणी
मुख्य फांद्यांची रचना निश्‍चित घेरांमध्ये त्यावर छोट्या फांद्यांच्या दोन रांगा दोन्ही अंगावर. छोट्या फांद्यांची अग्रं वरती वळलेली, अथवा खाली झुकलेली. या फांद्यांवर काट्यांसारखी टोकदार त्रिकोणी पानं. या अशा वृक्षाच्या फांद्यांवर बागडणं र्मकट मंडळींनाही एकूण अवघडच. म्हणूनच की काय 'आरॉकारिया'ला मंकी पझल ट्री (माकडांनाही गोंधळात टाकणारे झाड) असं नाव आहे. उंची आणि फांद्यांची अशी रचना यांमुळे खरोखरच माकडांना या झाडांवर अवघडल्यासारखे होते. त्यामुळे सहसा ती याच्या वाटेला जात नाहीत, असे निरीक्षण आहे. दीपमाळेसारखे रूप
आरॉकारिया चिलीचा तर आरॉकारिया कुकी न्यू कॅलेडोनियाचा. आपल्या जन्मभूमीत हा जवळजवळ दोनशे फूट उंची गाठतो. रूप एखाद्या दीपमाळेसारखं. शेंडा गगनाला गवसणी घालण्यासाठी सज्ज. थेट आकाशाला भिडल्यासारखाच दिसत असल्यामुळेच प्रत्यक्ष देवाशी संवाद साधतोय की काय, असं वाटतं. पुढे एका धर्मगुरूने हेच प्रतीक वापरलं व या वृक्षाला ख्रिसमस ट्री बनवलं. त्याला लगेचच मान्यताही मिळाली. 


ओरांगउटान बुद्धिमान

ओरांगउटान बुद्धिमान


माणूस बुद्धिमान खरा; पण चिंपांझी, गोरिला आणि ओरांगउटान ही माणसाशी नातं सांगणारी महाकपी मंडळीही बुद्धिमान असतात. त्यांना प्रशिक्षित करता येतं, त्यांच्या बुद्धीचं मापन करता येतं आणि त्यातून दिसतं, की लाखो वर्षांपासून त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत गेली आहे.
पी वर्गातील एक प्राणी म्हणजे ओरांगउटान. १६ ते १९ दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत अस्तित्वात आलेलं मूळ पाँगिनी कुळातला हा प्राणी आशिया खंडात पसरला. चार लाख वर्षांपूर्वी त्यातून बोर्निओतली एक आणि सुमात्रामधील एक अशा दोन शाखा निर्माण झाल्या. मात्र, सुमात्रात त्यांचा अधिवास १५00 मीटरपर्यंत तर बोर्नियोत तो १000 मीटर उंचीवरच्या जंगलांपर्यंत सीमित राहिला. मैदानी गवताळ प्रदेश, पाणथळ मैदानी जंगलं, शेतं, बागा आणि उथळ तळी अशा ठिकाणीही त्यांचा वावर आढळतो.
जंगलातल्या उंच झाडांवरच त्यांचा निवास असतो. कधी कधी तर ही मंडळी दाट जंगलातल्या आसपासच्या फांद्यांना लटकत वरच्यावरच मैलोन्मैल प्रवास करतात. झाडात निवास करण्यासाठी फांद्या, पानं यांचा उपयोग करून ऐशआरामी घरट्यांची उभारणी ते दहा मिनिटांतच निष्णातपणे करतात. त्या घरट्यात खाली पानांचा बिछाना तयार करतात, उशा तयार करतात आणि पांघरुणसुद्धा बनवतात. पावसाळ्यात मोठाल्या पानांच्या छत्र्यांसारखा उपयोग करतात. मनुष्यवस्तीजवळच्या मोठाली घमेली, टब्स अशा साहित्याचाही वापर करून त्य खाली ते आश्रय घेतात. ही त्यांच्या बुद्धिमत्तेचीच लक्षणे होत. ही वांदरं थोराड अंगाची, रुंद मानेची आणि शरीराच्या उंचीपेक्षाही जास्त लांबीचे हातपाय असलेली असतात. माणसांसारखेच त्यांच्या हातांना बोटांच्या विरुद्ध बाजूचे, पकड घेता येण्यासारखे अंगठे असतात. शरीर खूप लांब आणि लाल तपकिरी रंगाच्या भरड दाट केसांनी झाकलेलं असतं. कातडी काळपट राखाडी रंगाची असते. डोकं खूप बोजड, मोठं असतं आणि तोंड खूप रुंद आणि मोठं असतं. चेहर्‍यावर केस नसतात; पण गालफडं खूप मोठी असतात. मात्र हे वैशिष्ट्य वयात आलेल्या नरातच दिसतं. त्यांच्या या मांसल गालफडांमुळे त्यांचा चेहरा क्रूर, कुद्ध दिसतो. प्रतिस्पध्र्यांवर किंवा शत्रूवर मात करायला त्यांचा उपयोग होतो. नरांच्या गालातल्या पोकळ पिशव्यांमुळे त्यांना मोठाले आवाज काढता येतात. त्यांच्या आरोळ्या एक दीड किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. नर थोराड असतात. त्यांचं वजन ११८ किलो भरतं, तर माद्यांचं वजन ४५ ते ५0 किलो असतं. नरांची उंची १७५ सेंमी आणि माद्यांची १२७ सें.मी. भरते. नराच्या हातापायांची लांबी २ मीटरपर्यंत असते. म्हणजे आजानबाहू माणसांचं वर्णनही त्यांच्या बाबतीत कमी पडतं. ही वांदरं बिनशेपटीची असतात.
या वांदरांच्या आहारात मुख्यत: हंगामी फळं ६५ ते ९0 टक्के असतात. फळांचा हंगाम नसेल तेव्हा पानं, झाडांची साल नाहीतर किडे, मध, पक्ष्यांची अंडीसुद्धा असतात. फळांमध्येही रसदार, गर असलेल्या गोड फळांना प्राधान्य मिळतं. त्यामुळे त्यांना दिवसाला ११,000 उष्माकांचा आहार मिळतो. इतर हंगामातल्या आहारातून दररोज २000 उष्मांक मिळतात. आहाराचं प्रजननक्षमतेशीचं नातं निगडित असतं. त्याचप्रमाणे माद्यांची दूधनिर्मितीही त्यावर अवलंबून असते. या प्रकारच्या आहारामुळे बीजप्रसारही मोठय़ा प्रमाणात होतो. गजरेनुसार अनेकदा मातीचाही समावेश आहारात होतो. त्यातून खनिजांची गरज भागते. त्यामुळे त्यांच्या खाण्यात विषारी फळं, किडे असे पदार्थ आल्यास त्यांना विषबाधा होत नाही. याबरोबरच कॉमेलिनासारख्या वनस्पतींची निवड करून पोटाचे विकार आणि अवयवांची सूज वा दु:ख दूर केलं जातं. इतर माकडांप्रमाणे यांच्यात टोळीजीवन नसतं. एकांडेपणा हा त्यांचा स्थायिभाव असतो. नरमादी मीलनापुरते काही काळ एकत्र राहातात. आई मात्र पोराचा सांभाळ पहिल्या दोन वर्षांपर्यंत करते. पहिले चार महिने तर पोराचा प्रवास आईच्या पोटाला चिकटूनच होतो. नर पंधराव्या वर्षी तर मादी ९ व्या वर्षी वयात येते. त्यांचं आयुर्मान ३0 वर्षांचं असतं. दोन वर्षांंत प्रशिक्षित ओरांगउटान ३0 ते ४0 प्रकारची चिन्हं वा वस्तू ओळखू शकतात. त्यांना प्रतिसाद देतात. टचस्क्रीन या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून तरुण ओरांगउटान खेळही खेळू शकतात, असं नव्या प्रयोगातून दिसलं. एकमेकांशी संवाद साधायला, वर्चस्व प्रस्थापित करायला आवाजांच्या भाषेचा उपयोग केला जातो. त्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमणं होऊ लागली. त्यांची विविध कारणांसाठी शिकार झाली म्हणून त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय.

एका तासाला ५ सेंटिमीटर अशा वेगाने वाढणारी वेल

एका तासाला ५ सेंटिमीटर अशा वेगाने वाढणारी वेल


झाडे-वेली वाढतात हे खरे; मात्र ते काही साध्या डोळ्यांना दिसत नाही. एका वेलीचे वाढणे मात्र याला अपवाद आहे. एका तासाला ५ सेंटिमीटर अशा वेगाने वाढणारी ही वेल सध्या अमेरिकेच्या काही भागाची डोकेदुखी झाली आहे.
ल्मीकी आणि च्यवन हे दोन महान साधक. एकाच जागी बसून त्यांनी अनेक वर्षे तपश्‍चर्या केली, किती वर्षे? उत्तर शोधणे अवघड आहे; पण त्यांच्या या निश्‍चल वृत्तीमुळे मुंग्यांच्या दृष्टीने ते मानवी शरीर नव्हतेच, म्हणून त्यांनी या दोन ऋषींच्या शरीराचा आधार वापरून त्यावर वारूळ तयार केली. केवळ महानयोगी म्हणूनच मुंग्यांचा त्रास त्यांनी सहज सहन केला. वारुळातून बाहेर आल्यामुळे वाल्मीकी नाव धारण करणार्‍या या तपस्व्यानी 'रामायणा'सारखे महाकाव्य रचले.
आज आपल्यापैकी कोणीही असे मुंग्यांचे वारूळ शरीराभोवती तयार होऊ देणार नाही. त्याला अनेक वर्षेही जावी लागतील. पण, तुम्ही मनात आणले तर एक वेल काही दिवसांतच फार तर थोड्याशा महिन्यात तुमच्याभोवती एक हिरवा बंगला म्हणा- वस्त्र म्हणा विणू शकेल. कोण आहे अशी वेल? तिचे जपानी नाव आहे कुड्झु 'ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'>'. अमेरिकेत आणि कॅनडाच्या काही भागात हिचे आक्रमण अतिशय जोराने सुरू आहे. 'ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'>' जपानहून अमेरिकेत आणली ती तिच्या जमिनीची धूप थांबविण्याच्या गुणधर्मामुळे. पण, 'आ. बैल, मुझे मार' असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. हिचा वाढीचा वेग तोंडात बोट घालायला लावेल, असा आहे. दर तासाला जवळजवळ पाच सेंटीमीटर. तुम्ही जर स्थिर उभे राहू शकलात तर तुम्हालाही वेढून ही वेल 'दशांगुळे' उरेलच. तुमचा हिरवा माणूस बनवेल. तूर्तास 'ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'>' वाटेत जे काही येईल त्याला कवेत घेऊन मार्गक्रमण करीत आहे. दक्षिणेकडील राज्यात, टेक्सासपासून फ्लॉरिडापर्यंत, पेन्सिल्व्हानियाच्या आग्नेय भागात ही अधिक चढाऊ वृत्तीने वाढते. या वेलीचे वानसशास्त्रीय नाव 'ं१्रं'>ढ४ी१ं१्रं ेल्ल३ल्लं. ढ४ी१ं१्र/ं१्रं'>'ं१्रं'> /ं१्रं'>या स्वीस वनस्पतीतज्ज्ञ व प्राध्यापक यांच्या गौरवार्थ हे प्रजातिवाचक नाव आणि डोंगराळ प्रदेशातील अधिवासामुळे 'ं१्रं'>टल्ल३ल्लं/ं१्रं'>' हे विशेषण. पश्‍चिम घाटात या वेलीची बहीण म्हणता येईल, अशी एक वेल आहे. ती आहे 'ं१्रं'>ढ४ी१ं१्रं ३४ुी१२/ं१्रं'>ं'. हिला जमिनीखाली प्रचंड मोठा कंद धरतो, म्हणून ही ं१्रं'>३४ुी१२/ं१्रं'>ं.
'ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'>' चे मूळ नाव 'ं१्रं'>ङ४९४/ं१्रं'>'. ही मूळ पूर्व आशियाची रहिवासी. १८७६ मध्ये सर्वप्रथम जपानमधून फिलाडेल्फिया येथे आणली. पण, तिच्या आक्रमक स्वभावाने आता तिच्या आयातीबद्दल डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे. पण, चित्र इतके काही निराशाजनक नाही, पण 'योजक स्तत्र दुर्लभ:' हेच खरं. 'ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'>' अतिशय गुणी आहे. ओसाड जमिनीवर ती आपला संसार फुलवते. शेंगावर्गीय असल्याने नायट्रोजन स्थिरीकरण करून जमिनीचा कस वाढविते. आपल्याकडच्या ं१्रं'>ढ४ी१ं१्रं ३४ुी१२ं/ं१्रं'> प्रमाणे हिच्या मांसल मुळापासून स्टार्च मिळतो. पूर्व आशिया व्हिएतनाममध्ये या स्टार्चपासून उन्हाळी पेय तयार करतात. त्यापासून हर्बल चहाही तयार करतात. गुरांसाठी चारा म्हणूनही ं१्रं'>ङ४९ि४/ं१्रं'> उपयुक्त. 'गवत' म्हणून गुरे आवडीने खातातच; पण ते पौष्टिक आहे ते त्यातील १५-१८ टक्के प्रथिनांमुळे आणि ६0 टक्के पचनशील घटकांमुळे.
चिनी औषध प्रणालीतील पन्नास औषधी घटकांपैकी एक म्हणजे - गे गेन (ं१्रं'>¬ी ॅील्ल/ं१्रं'>) अर्थात, कुडझु. आधुनिक वैद्यकशास्त्रातून या वेलीचा उपयोग अल्झायमर या व्याधीवर होऊ शकेल, असा संभव आहे. प्युरारिन डायझिन (ं१्रं'>ं्रि९ी्रल्ल/ं१्रं'>) हे घटक या वेलीच्या वेदनाशामक आणि प्रतिजैविकता या गुणधर्मास कारणीभूत आहेत.
तरीसुद्धा या वेलीचे समूळ उच्चाटन कसे करायचे ही समस्या अमेरिकेत आहेच. बकर्‍या हिचा फन्ना करतात, पण त्याबरोबर इतर उपयुक्त वनस्पतीही संपवतात. बुरशी तज्ज्ञांनी आता मायरोथेशिम् व्हेरुकारिया (ं१्रं'>ट८१३ँी्रू४े ५ी११४ूं१्रं/ं१्रं'>) या बुरशीमुळे या वेलीवर नियंत्रण करता येते असे सिद्ध केले आहे. या बुरशीचा द्रवरूप फवारा इतर वनस्पतींना बिनधोक आहे आणि कुडझुसाठी तत्काळ परिणाम देणारा. सकाळी फवारणी केली, तर दुपारी दृश्य स्वरूप दर्शविणारा!

डीएनए तंत्र

डीएनए तंत्र 

डॉ. रिसी यांनी २00३ मध्ये 'मायक्रोअँरे' या डीएनए तंत्राने सार्स विषाणूची निदान चाचणी प्रचारात आणली. त्या तुलनेत आताच्या आधुनिक चाचणीत अधिक सर्वसमावेशकता आहे. यात संसर्गाच्या डीएनएच्या उपप्रकारांची छाननीपण आहे. या तंत्रामुळे संसर्गाची नवी साथ आल्यास तिचा उगम शोधणे सोपे होणार आहे. डीएनए निदान तंत्राची पार्श्‍वभूमी तशी दहा वर्षांची आहे. डॉ. द रिसी या कॅलिफोर्निया विद्यापीठातीलच जैवशास्त्रज्ञाने हे तंत्र विकसित करायचे ठरवले. त्याला डॉक्टर विल्सन या चेताशास्त्रज्ञाने (न्यूरॉलॉजिस्ट) आणि डॉ. चिऊ या संगणकतज्ज्ञाने सहकार्य दिले. सूक्ष्मजंतूंबाबत जगभरात सतत संशोधन सुरू असते. बर्‍याच आजारांचे मूळ सूक्ष्मजंतूकडून होणार्‍या प्रादुर्भावात आहे; मात्र ते लवकर समजत नाही. आजार कोणत्या जंतूमुळे झाला, ते शोधून काढणारी एक नवी प्रणाली आता शास्त्रज्ञांनी शोधली आहे. द्यकीय क्षेत्रात निदानाला मोठे महत्त्व आहे. ते व्यवस्थित झाले, की उपचाराची निश्‍चिती करता येते; पण तेच अनिश्‍चित असेल, तर लक्षणानुसार उपचार सुरू करून सुधारणेची वाट पाहावी लागते. मेंदूज्वरासारख्या व्याधीत तापाबरोबर मेंदूलाही सूज आलेली असल्याने निदानात गफलत झाल्यास रुग्णाला ते प्राणघातक ठरू शकते. या व्याधीचे लवकर व अचूक निदान व्हावे, म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी डीएनए क्रमावर आधारित एक चाचणी नुकतीच विकसित केली आहे. तिच्या मदतीने मेंदूज्वराच्या संसर्गाचा उगम कशात आहे, उदाहरणार्थ, तो विषाणूत आहे का बॅक्टेरियात, का कुठल्या परजीवी जंतूत (पॅरासाइट) आहे, याची शहानिशा प्रथम होते. त्यानंतर विशिष्ट संसर्गाच्या उपप्रकाराची निश्‍चिती होते.
आपल्या शरीरातील रक्तात किंवा मज्जाद्रवात चयापचयाने तयार झालेल्या डीएनए तुकड्यांचे मिश्रण असते. अगदी लाखोंच्या संख्येत ते असतात. काही तुकडे शरीराच्या डीएनएचे, तर काही सूक्ष्मजंतूच्या डीएनएचे! वरच्या चाचणीत शरीरातील डीएनए तुकड्यांना संसर्गाच्या डीएनए तुकड्यांपासून वेगळे करून मग खास संसर्गाच्या डीएनए तुकड्यांची छाननी करण्याचे काम होते. आपण म्हणतो त्याप्रमाणे गवताच्या गंजीतून एखादी सुई शोधण्याइतके ते जटिल आहे. साधारणपणे तीस लाखांपर्यंत डीएनए तुकड्यांचे याप्रमाणे वर्गीकरण होते! सूक्ष्मजंतूंच्या डीएनए तुकड्यांची विविध संसर्ग डीएनए तुकड्यांच्या संग्रहातून जुळणी करून मग संसर्ग करणारा सूक्ष्मजंतू नक्की कोणता, हेही स्पष्ट होते.

संगणक आणि संस्कृती

 संगणक आणि संस्कृती

आइबेलोच्या अभ्यासगटाने यासाठी 'फ्लिकर' आणि 'अनोबिली' या दोन नेटवर्कवरील दीड लाख जोड्यांनी एकमेकांना पाठविलेल्या संदेशांचा अभ्यास केला. हे दहा लाखांपेक्षाही जास्त संदेश निवडून त्यांची विभागणी वर उल्लेखलेल्या तीन गटांमध्ये करण्याकरिता त्यांनी एका खास तयार केलेल्या 'अल्गोरिदम'चा (पदावली) वापर केला. त्याचबरोबर या संदेशांमधील एक हजार संदेश यादृच्छिक पद्धतीने (रँडम सँपलिंग) निवडून त्यांची विभागणी वरील तीन गटांमध्ये करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचेही साह्य घेतले.
आइबेलोंच्या दाव्यानुसार या दोन्ही पद्धतीने काढलेल्या निष्कर्षांमध्ये आश्‍चर्यकारक साम्य आहे. एवढेच नव्हे तर मानवी परस्पर संबंध आणि एकंदरीतच सामाजिक धारणेच्या सखोल अभ्यासासाठी कितीतरी नवे दुवे त्यामधून दिसून येतात. किंबहुना त्यांच्या मते हे विश्लेषण म्हणजे समाजाचे, समाजसंबंधाचे एक प्रकारचे नवे 'व्याकरण'च ठरू शकेल.. आणि मग संगणक तुमच्या-आमच्या आणि सर्वच समाजाच्या संबंधांचा 'कार्यकारणभाव' सांगू शकेल!

हे या बंध किंवा अणूंची विभागणी तीन प्रकारांमध्ये करता येते.
सामाजिक दर्जाविषयक बंध, सामाजिक पाठिंबा आणि माहितीची देवाण-घेवाण. बंध : सोशल नेटवर्कचे 'अणू'
आइबेलो यांच्या अभ्यासगटाचा दावा हा काही विशिष्ट निकष व गृहितांवर आधारित आहे. सोशल नेटवर्कमध्ये सहभागी होणार्‍या कोणत्याही दोघा व्यक्तींमधील संबंध हे एकाने दुसर्‍यास पाठविलेला संदेश किंवा एखाद्याने दुसर्‍याचा घेतलेला मागोवा अथवा एखाद्याने दुसर्‍याविषयी दाखविलेला लोभ, स्नेह इत्यादी किंवा अशा स्वरूपात असतात. दोन व्यक्तींमधील हे 'बंध' म्हणजेच सोशल नेटवर्क सामाजिक साखळीचे मूलभूत घटक अथवा 'अणू' सारखे मानता येतील. माणसांचे परस्परसंबंध हा कोणत्याही नियमांमध्ये बसू न शकणारा गहन, अथांग आणि क्लिष्ट विषय आहे. त्यामुळेच त्याला संगणकांच्या चौकटीमध्ये बांधता येणार नाही, असा समाजशास्त्रज्ञांचा दावा होता. नेमकी हीच बाब खोडून काढून मानवी आचार-विचार व संस्कृती यांना संगणकशास्त्रामध्ये बद्ध करणाच्या प्रयत्नात 'याहू' या विश्‍वविख्यात संगणकीय संस्थेमधील संशोधक आहेत आणि त्यांना त्यामध्ये बर्‍यापैकी यशसुद्धा मिळते आहे. 'याहू'मधील शास्त्रज्ञांचे यश
संगणक, इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाला 'याहू' हे संकेतस्थळ माहीत आहे. ई-मेलपासून बाजारभावापर्यंत आणि क्रीडाजगतापासून 'गॉसिप' गप्पांपर्यंत सार्‍या संगणकविश्‍वावर 'याहू'चा कब्जा आहे. इंटरनेट सेवा, सोशल मीडिया, नेटवर्किंग यांचा पसारा वाढवतानाच अधिकाधिक ग्राहक आपल्या 'जाळ्यामध्ये' कसे पकडता येतील, याच्या शास्त्रोक्त संशोधनामध्ये 'याहू'मधील तज्ज्ञ संशोधक अहोरात्र गढलेले असतात.
स्पेनमधील बर्सिलोना येथील 'याहू' प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ लुका मारिया आइबेलो व त्यांच्या संशोधनगटाने समाजघटकांच्या म्हणजेच माणसांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास सोशल मीडियाच्या संदर्भात केला आहे आणि त्यांच्या मते मानवी संबंध आणि संस्कृती यांच्याबाबतीमधील अनेक रहस्यांची उकल या परस्पर संपर्काच्या खोल अभ्यासाने करता येते.
ण्य नवाचे व्यवहार आणि सांस्कृतिक विनिमय हे घटकही संगणकशास्त्राच्या अखत्यारीमध्ये आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न हे संगणकाच्या शोधाइतकेच जुने आहेत. माणसांचे विचार, भावना, रागलोभादी विकार आणि त्या सर्वांचा कार्यकारणभाव म्हणजेच थोडक्यात मानवी मन व बुद्धी यांचा संगणकाद्वारे अभ्यास व अंदाज घेण्याच्या संशोधनावर मायक्रोसॉफ्टपासून आयबीएमपर्यंत जगातील सर्व अग्रगण्य कंपन्या तसेच विद्यापीठांमध्ये काम चालू आहे.
'इंटरनेट' म्हणजेच संगणकविश्‍वातील महाजालामधील फेसबुक, व्हॉट्सअँप, लिंक्ड-इन, ट्विटर या आणि अशासारख्या अनेक 'सोशल नेटवर्क'वर दररोज होत असलेल्या कोट्यवधी संदेशांच्या देवाण-घेवाणीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासामधून मानवी परस्परसंबंधांच्या गूढ विश्‍वाची उकल मोठय़ा प्रमाणामध्ये व प्रभावीपणे करता येऊ शकेल, असा या क्षेत्रांत काम करणार्‍या संगणकतज्ज्ञांचा विश्‍वास आहे.

कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे

कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे


कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे. प्रयोगाअंती ते सिद्धही झालं आहे. पाळण्याकरिता व खाण्याकरिताही होत असलेल्या त्यांच्या वापरावर निर्बंध घालण्याची गरज आहे.
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉबेरीचं. ती शिक्षित झाली का हे पाहण्यासाठीच्या काही कसोट्या होत्या. तरंगताना योग्य दिशा शोधणे, टच स्क्रिनपर्यंतचं अंतर कापणे, त्याला लागणारा वेळ, यशस्वीपणे टच स्क्रीनला केलेला स्पर्श व त्याची मोजदाद. कासवं शिकली. त्यासाठी कासवांच्या मेंदूतील ं१्रं'>टी्िरं' उ१३ी७/ं१्रं'> हा भाग उद्दिपीत झाल्याचा निष्कर्ष निघाला. पक्षी, कुत्रा वगैरे प्राण्यांच्या मेंदूचा ं१्रं'>्रस्रस्रूेंस्र४२ /ं१्रं'>भाग उद्दिपीत होतो; पण तो कासवात नसतोच.
ही रेड फुटेड प्रायोगिक कासवं होती मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या नदी खोर्‍यातली. मध्यम आकाराची ही कासवं वजनाने २८ किलो आणि शरीराच्या लांबीत ३0 ते ४0 सें.मी. भरतात. पाठीवर कवचांची काळपट गडद संरक्षक ढाल बनलेली असते. कवचावरच्या खवल्यांच्या मध्यभागी मोठाले फिकट पिवळे किंवा गडद लाल ठिपके असतात. भौगोलिक क्षेत्रांनुसार त्यात फरक दिसतो. या कासवांमध्ये दोन जाती आहेत. एकाच्या पायावर लाल ठिपके असतात, तर दुसर्‍याच्या पायावर पिवळे. अँमेझॉन नदीचं खोरं हा त्यांचा नैसर्गिक अधिवास. गवताळ प्रदेश हे त्यांचं वास्तव्याचं मुख्य ठिकाण.
ही कासवं सर्वभक्षी असतात. वनस्पती, गवत, पानं, फळं, फुलं, बुरशी आणि लहान-लहान प्राणी त्यांच्या आहारात असतात. ऋतुबदलांनुसार कडक कोरड्या उन्हाळ्यात ही कासवं पूर्णत: निष्क्रिय व सुप्त निद्रावस्थेत जातात. पाठीवरचं आणि पोटावरचं संरक्षक, कठीण कवच हे कासवाचं वैशिष्ट्य. कवचांच्या कडा जाड आणि कठीण असतात. या कवचात त्यांचं मऊ शरीर आणि आक्रसून घेतलेले पाय व डोकं हे भाग लपतात. डोकं चौरस असतं. वरचा भाग चपटा असतो. डोळे मोठे असतात. मध्यभागी काळं बुबूळ असतं. वरचा जबडा वरून खाली वळलेला असतो, तो खालच्या जबड्यावर चपखल बसतो. मध्यभागी त्याला खाच असते. डोक्यावर थोडे मोठे खवले असतात. ते मानेकडे बारीक होत जातात.
नराचं शरीर अधिक आकर्षक रंगाचं असतं. मान आक्रसल्यावर डोकं संरक्षक कवचाआड दडतं. पाय दंडगोलासारखे असतात. पुढच्या पायाला चार तर मागच्या पायाला पाच नख्या असतात. पुढच्या पायाची टोकं जास्त चपटी असतात. पोहायला व बिळं करायला ती उपयोगी पडतात. शरीराला मागे छोटसं मांसल शेपूट असतं. मादीचं शेपूट थोडं त्रिकोणी असतं. शेपटीची हालचाल दोन्ही बाजूला होते.
ही कासवं साधारणत: दुपारी तीननंतर जास्त प्रमाणात वावरू लागतात. उष्ण हवामानात फक्त सकाळी आणि संध्याकाळीच त्यांचा वावर दिसतो. अन्न कमी मिळायला लागलं, की ती सुप्तावस्थेत जातात. भरपेट खाणं झालं, की ती डॉ. क. कृ. क्षीरसागर
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉब

ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष

ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष


वृक्ष नित्यनेमाने वाढतात, फुलतात असा आपला नेहमीचा अनुभव आहे. मात्र, सृष्टीत काही वृक्ष असे आहेत, की ते त्यांच्या आयुष्यात एकदाच फुलतात. ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष त्यापैकीच एक.

युष्याचा हेतू काय?
असा खुळचट प्रश्न माणूस सोडून कुठल्याही सजीवाला भेडसावत नसतो. उगीचच मोक्षप्राप्ती, जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका इत्यादी तात्त्विक चर्चा नाही. जगण्याचे उद्देश दोन, एक म्हणजे स्वत: जगणं आणि आपला वंश जगवणं.
छायया सुखवन्त्यन्यां,
सहन्ते परमातपम्।
फलान्यपि परार्थाय
वृक्षा सत्पुरुषाइव।।
असे गोडवे माणूस गात असला तरी उद्या समजा वनस्पती बोलू लागल्या, तर त्या म्हणतील, ''आम्ही स्वत:साठी जगतो, आमचं वंशसातत्य टिकवण्यासाठी फुलतो आणि फळतो. तुम्ही केवळ तुमच्या फायद्यासाठी आम्हाला असे 'सद्गुण' चिकटवले आहेत.''
वनस्पतीमंडळीचं हे प्रतिपादन शंभर टक्के खरं आहे. त्या फुलतात, फळतात आणि फळांमधील बियांपासून वनस्पतीची पुढची पिढी अस्तित्वात येते. अनेक वनस्पती दरवर्षी नियमितपणे फुलतात, त्यांच्याजवळ त्यांचं स्वत:चं कॅलेंडर असतं. आंब्यासारखे वृक्ष आयुष्याची पहिली चार-पाच वर्षे नुसते वाढतात. नंतर त्यांना फुलं येतात आणि फळं धरतात. एकदा हे चक्र सुरू झालं, की हयातभर चालतं.
दोन-तीन महाभाग मात्र या आयुष्यपद्धतीला अपवाद. ते आयुष्यात एकदाच फुलतात. फुलणं ही क्रिया अतिशय महाग आहे. त्याला भरपूर अन्नसाठा हाताशी असावा लागतो. 'गदिमां'नी उगीच नाही म्हटलं, 'सोसता सोसेना संसाराचा ताप। त्याने मायबाप, होऊ नये।।' तेव्हा पुरेसा बँक बॅलन्स तयार झाला, की मगच फुलायचं.
'कॉरिफा अंब्राक्युलिफेरा' हा एक असाच महावृक्ष- आपल्या शब्दात तालवृक्ष. दक्षिण भारतात विशेषत: केरळमध्ये, तसेच कर्नाटकात काही भागांत हा वृक्ष आढळतो. श्रीलंकेत याला राष्ट्रीय वृक्षाचा मान आहे. कॉरिफा हे लॅटिन नाव, ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>या ग्रीक सं™ोपासून तयार झालं आहे. ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>याचा अर्थ डोकं, माथा. हा संदर्भ या वृक्षाच्या अजस्र फुलोर्‍याचा. तर अंब्राक्युलिफेराचा अर्थ विशाल छत्र. पूर्ण वाढलेला तालवृक्ष म्हणजे एक अवाढव्य छत्रीच. पण सांभाळून. कारण छत्रीचा दांडा काटेरी. हे काटे जवळ-जवळ एक सें.मी. लांब. गळून पडलेल्या पानांचे तळ खोडावर टिकून राहतात आणि बुंध्यावर चिलखत तयार करतात.
पानं पंख्यासारखी मोठय़ा आकारमानाची. जवळ-जवळ दोन ते चार मीटर रुंद. मात्र, हे पर्णपातं अखंड नसून त्यांच्या पर्णिका अग्रभागी स्वतंत्र तर नंतर जुळलेल्या असतात. या पानांपासून लांबलचक पट्ट्या काढून त्यांच्या मध्यशिरा बाजूला करतात. या पट्ट्या नंतर पाण्यात उकळून वाळवतात व त्यांना घासून पुसून झिलईयुक्त केलं जातं. दक्षिण भारतात प्रचलित असलेला ज्योतिष-भविष्य कथन करणारा 'नाडी'ग्रंथ याच पट्ट्यांवर लिहिलेला आहे, असं म्हटलं जातं. प्राचीन काळी म्हणजे कागदाचा शोध लागण्यापूर्वी याच तालपत्रावर पोथ्या लिहिल्या गेल्या. वयाची चाळिशी गाठली, की तालवृक्ष फुलतो. आयुष्यात एकदाच! अंदाजे पंचवीस ते तीस मीटर उंचीच्या खोडाच्या अग्रभागी सातआठ मीटर उंचीचा फुलोरा म्हणजे एक प्रचंड कारंजंच. फुलं अतिशय लहान आकारमानाची. ती मत्स्यगंधा असतात तशीच योजनगंधाही. या मत्स्यगंधांवर भाळणारे 'पराशर' कीटकही आहेतच. तालवृक्ष कधी फुलणार याचा सुगावा लागला, की स्थानिक लोक त्याचा शिरच्छेद करतात. कारण त्याच्या बुंध्यात स्टार्चचा प्रचंड साठा असतो. हाच साठा वापरून ताल आपली संतती-फळं वाढवणार असतो. त्याच्या शिरकाणामुळे सगळंच संपतं, तालवृक्ष पुन्हा उभा राहत नाही.
बुंध्यातील स्टार्चपासून साबुदाणा करतात. चुकून-माकून ताल फुलू दिला, तर त्याच्या फळांनाही व्यावहारिक मूल्य आहे. तालवर्गीय आणखी एक सदस्य म्हणजे ं१्रं'>ढँ८३ी'ीस्रँं२/ं१्रं'>; अर्थात वनस्पतींमधील हत्ती. याच्या बिया हस्तिदंतासारख्याच वापरता येतात. तसाच वापर तालवृक्षाच्या बियांचा होतो. यावर कोरीव काम करता येतं, त्याच्या गुंड्या करतात. रंगवून त्याला पोवळ्याचं रूप दिलं जातं. मुंबईच्या जिजामाता उद्यानात दोन तालवृक्ष होते. पैकी एकानं फुलून आणि फळूनही आपली जीवनगाथा नुकतीच संपवली. 

डिमोस उपग्रहा

डिमोस उपग्रहा


मंगळाच्या दुसर्‍या उपग्रहाचे नाव डिमोस - त्याचा अर्थ दहशत असा आहे. याचा शोध इसॉप हॉल यांनी फोबोसच्या शोधाच्या सहा दिवस आधी म्हणजे १२ ऑगस्ट १८७७ रोजी लावला. याचे एकूण गुणधर्म पाहता हा फोबोसचा जुळा भाऊच आहे. शास्त्रज्ञांचे असेही मत आहे, की कदाचित फोबोस आणि डिमोस एकाच मोठय़ा लघुग्रहाचे दोन तुकडे असावेत.
याचा आकार फोबोसच्या सुमारे निम्मा आहे. ओबडधोबड आकाराच्या या मंगळाच्या उपग्रहाचा आकार १५X१२.२X११ किलोमीटर आहे. याची घनता १.४६ ग्रॅम वर्ग सें.मी. निश्‍चित करण्यात आली आहे. याचा मुक्त वेग दर सेकंदाला ५.६ मीटर किंवा सुमारे तासाला २0 कि.मी. आहे.
डिमोस मंगळाच्या क्षितिजावर पूर्वेला उगवून पश्‍चिमेला मावळतो. मंगळ आपल्या अक्षावर एक फेरी २४.७ तासांत पूर्ण करतो, तर डिमोसला त्याची एक फेरी पूर्ण करण्याकरिता ३0.४ दिवस लागतात. यामुळे डिमोस मंगळाच्या क्षितिजावर जवळ जवळ २.७ दिवस असतो. पण, याची कक्षादेखील मंगळाच्या विषुववृत्ताच्याच पातळीत असल्यामुळे हा मंगळाच्या ८२.७ अंश रेखांशाच्या उत्तरेवरून किंवा उणे ८२.७ अंश रेखांशाच्या दक्षिणेतून दिसत नाही. हा सुमारे २३,४६३ किलोमीटर अंतरावरून मंगळाची परिक्रमा करतो; तर याचा आपल्या कक्षेत वेग १.३५ किलोमीटर दर सेकंद किंवा ४८00 किलोमीटर दर तासाला इतका आहे. फोबोससारखा याचादेखील सूर्याच्या बिंबावरून प्रवास होताना दिसतो. हा ग्रहणाचाच एक प्रकार आहे. याला अधिक्रमण असे म्हणतात. मंगळावरून बघताना डिमोसचा कोनीय व्यास सूर्याच्या कोनीय व्यासाच्या एक दशांश आहे. तसेच, याचे अधिक्रमण फक्त दोन मिनिटाचे असते. डिमोसवरती यान उतरवून तिथल्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याच्या एका मोहिमेची कल्पना मांडण्यात आली आहे. या मोहिमेला गलिव्हर असे नावही सुचवले आहे; पण सध्या ही फक्त कल्पनाच आहे.

सूर्य तेजोनिधी लोहगोल

सूर्य तेजोनिधी लोहगोल


समाजावर नेहमीच पौराणिक कथांचा प्रभाव राहिला आहे. आपणही रामायण, महाभारताच्या कथा ऐकूनच लहानाचे मोठे झालो आहोत. या विविध पौराणिक कथांमधूनच आपल्याला निसर्गातील अनेक घटकांची, ग्रह-तार्‍यांची ओळख देवीदेवतांच्या रूपाने होत असते. असाच एक तारा ज्याबद्दल पौराणिक कथांपासून ते आधुनिक विज्ञानयुगापर्यंत प्रत्येक मनुष्याला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे.
हा तारा म्हणजे सूर्य. ज्याला पुराणांमध्ये देवाची जागा मिळाली आहे. रामायणातील बाल हनुमानाची गोष्ट तुम्हाला आठवतच असेल. पृथ्वीवरून दिसणारा हा लाल गोळा बाल हनुमानाला आकर्षित करून गेला, तसाच तो प्रत्येकाला आकर्षित करत असतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सूर्याविषयी अनेक प्रश्न घर करून असतात. ज्याच्या उगविण्याने व मावळण्याने सृष्टीत अनेक बदल घडतात, त्या सूर्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
सजीवांच्या जगण्याचा अविभाज्य घटक
पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला सूर्य, आपल्या ग्रहमालेचा मध्यबिंदू आहे. सूर्यमालेचा जीव असणार्‍या या तार्‍याचा प्रभाव पृथ्वीसोबतच अन्य ग्रहांवरही असतो. सूर्याच्या उष्णतेच्या व शक्तीच्या प्रभावाशिवाय पृथ्वीवर जीवन असणे अशक्य आहे. या ब्रह्मंडात अनेक सूर्य व त्यांचा ग्रहमालिका अस्तित्वात आहेत.
सूर्य- एक तारा
सूर्य हा एक तारा आहे. ज्याला कुठलाही भरीव किंवा ठोस असा पृष्ठभाग नाही. हा एक वायूचा भला मोठा गोळा आहे, ज्यात ९३ टक्के हायड्रोजन आणि साधारण ७.८ टक्के हेलिअम वायू आहे.
सूर्य हा आपल्या सौर यंत्रणेचा मध्यबिंदू आहे. सूर्य हा एखादा दरवाजा समजले, तर पृथ्वी त्याची कडी भासेल इतकी ती सूर्याच्या तुलनेत लहान आहे. सूर्याला ठोस असा पृष्ठभाग नसल्याने सूर्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळी फिरण्याची गती सापडते. सूर्यावरील वातावरणाचा विचार केला, तर सूर्यावर अनेक ठिकाणी काळे डाग आढळतात. वातावरण तप्त असते.
स्ाूर्याच्या बाहेरचे वातावरण
कोरोना हा सगळ्यात छोटा ग्रह प्लुटोपर्यंत पसरलेला आहे. सूर्याच्या भोवताली ८ ग्रह फिरतात. यापैकी ५ ग्रह आकाराने अतिशय छोटे आहेत. याशिवाय हजारो लघुग्रह, लाखो धुमकेतू व अनेक उल्कापिंडे ही सूर्याभोवती फिरत असतात. सूर्याला कुठलेही कडे नाही. सूर्यावरून येणार्‍या वादळांचा अभ्यास करून अंतरिक्षातील याने व शास्त्रज्ञ सूर्याबद्द्ल अधिकाधिक माहिती जमा करीत असतात. जेनिसीस हे यान 'नासा'ने विशेष करून सूर्याचा अभ्यास करण्याकरिताच बनविलेले आहे.
सूर्याच्या मध्यभागात तापमान १५ दशलक्ष डिग्री सेल्सिअस (२७ दशलक्ष डिग्री फरेनाईट) आहे. सूर्यावरील भाग ५00 किलोमीटर जाड थराने तयार झाला आहे, ज्यावरून सूर्याची उष्णता उत्सर्जित होऊन बाहेरच्या वायुमंडळामध्ये दाखल होते. सूर्यप्रकाशाच्या एका किरणाला पृथ्वीवर पोहोचण्याकरिता ८ मिनिटे लागतात.

वनस्पतींनाही असतात चाके

 वनस्पतींनाही असतात चाके


वाहनांना चाके असतात, पण वनस्पतींना ती कशी असतील? ही निसर्गाची किमया आहे. वाळलेल्या वनस्पतींचा बिया असलेला भाग वार्‍याने तुटून पडतो व वार्‍याबरोबरच जमिनीवरून गोलगोल फिरत एखाद्या ठिकाणी जाऊन थांबतो व तिथेच रुजतो. के असलेल्या गाड्या वापरणे हे तंत्र इतके सोपे आणि सर्वमान्य आहे, की एखाद्या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाची हेटाळणी करावयाची असेल, तर त्याने 'चाकाचा नव्याने शोध लावलाय,' अशा शब्दांत त्याची चेष्टा केली जाते.
हवेतून संचार, परावर्तित लहरींचा वापर करून अंधारातून किंवा धुक्यातून मार्ग शोधणे, विजेचा वापर, कॅमेरा, रॉकेट इ. अनेक तंत्रे मानवाने शोधण्यापूर्वीपासून ती प्राणिजगतात वापरली जात होती; पण चाकासारखी अत्यंत सोपी आणि सोयिस्कर प्रणाली निसर्गाने भूचर प्राण्यांच्या बाबतीत का वापरली नसावी, असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की चाके वापरण्यासाठी रस्ते किंवा रूळ अशा टणक आणि गुळगुळीत पृष्ठभागाची गरज असते.
निसर्गात असे रस्ते कोठेच नसतात आणि दुसरे म्हणजे झाडावर चढणे, दगड-धोंड्यांमधून, कडेकपार्‍यांतून आणि चिखलातून वाट काढणे अशा क्रियांमध्ये निसर्गात वावरणार्‍या भूचर प्राण्यांना चाकांची मदत न होता उलट अडचणच होईल. आपण मानवही घराबाहेर चाके वापरतो; पण पायर्‍या आणि उंबरठे असलेल्या घरात चाके असलेल्या गाड्या किंवा चाके लावलेले बूट वापरत नाही. बंदिस्त अशा वास्तूत चाकांचा वापर हा अगदी अलीकडल्या काळात होऊ लागला आहे आणि तोही रुग्णालये, विमानतळ आणि शॉपिंग मॉल अशा अगदी मोजक्या ठिकाणीच.
या तिन्ही ठिकाणी चाके असलेल्या गाड्या वापरता येतील असे सपाट किंवा कमी उतार असलेले प्रतल मुद्दाम निर्माण केलेले असतात व त्यामुळेच तेथे चाके वापरणे शक्य होते; परंतु चाकासारखे गोल गोल फिरत जमिनीवरून प्रवास करावयाचा हा प्रकार प्राणिजगतात नसला, तरी वनस्पतिजगतात मात्र दिसून येतो. अनेक हंगामी द्विदल वनस्पती बीजोत्पत्तीनंतर वाळून जातात. एका कमकुवत वाळक्या खोडाच्या आधारे उभा राहिलेला त्यांचा डोलारा वार्‍याच्या जोराने खोडापासून तुटतो आणि अशा वनस्पती मग एखाद्या चेंडूप्रमाणे गोल-गोल फिरत आणि वाटेत आपले बी टाकीत वार्‍याने दूर दूर नेल्या जातात

सूक्ष्मजीवांचे विशाल जग

सूक्ष्मजीवांचे विशाल जग



डोळ्यांनाही दिसू न शकणारे अनेक जीव वातावरणात असतात. त्यांचेही एक जीवनचक्र असते. तसेच त्यांच्याकडून अनेक गोष्टीही होत असतात. हे जीव सूक्ष्म असले तरी त्यांचे जग मात्र विशाल आहे. 

क्ष्मजीव म्हणजे असे जीव की जे आपणांस उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. असे हे लहान जीव सर्वत्रच आढळतात. जमिनीवर, हवेत आणि पाण्यातही त्यांचे अस्तित्व असते. एवढेच नव्हे, तर त्यांच्यापैकी काही खारट वातावरणात, थंड व अतिउष्ण तापमानात आम्लयुक्त व आम्लारीयुक्त ठिकाणी आढळले आहेत. अगदी प्राणवायू म्हटल्या जाणार्‍या ऑक्सिजनशिवायही काही सूक्ष्मजीव जगतात अशी नोंद झालेली आहे.
निसर्गाशी जोडलेले असतात : म्ाुख्यत: त्यांचे वर्गीकरण जीवाणू, विषाणू, बुरशी (कवक), शैवाल आणि आदिजीवी असे केले आहे. हे जीव वेगवेगळ्या मार्गांनी निसर्गाशी जोडलेले आहेत. ते जैव-भू-रसायन चक्रात सक्रियरूपाने कार्यरत आहेत. ते आपणासाठी उपयुक्तही आहेत आणि हानिकारकही आहेत. या दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा विविध माध्यमांतून मानवाशी संबंध येतच असतो. 
मानवाला उपयुक्त सूक्ष्मजीव : आप्ाणांस फायदेशीर ठरणारे अनेक सूक्ष्मजीव आहेत. लॅक्टोबॅसिलस जातीचे जीव दुग्धजन्य पदार्थांत आढळतात, दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास ते मदत करतात, तसेच चीज, पनीर तयार करण्यासही यांचा उपयोग होतो. दुधावर अशी प्रक्रिया करण्यासाठी या जीवाणूंचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जात असतो. 
प्रोबायोटिक्स नावाचे सूक्ष्मजीवरूपी औषध पोटाच्या व पचनाच्या तक्रारींसाठी गुणकारी ठरले आहे. सॅखेरो मायसेस नावाच्या जातीचे सूक्ष्म जीव वाईन तयार करण्यासाठी तसेच खाण्याचा ब्रेड तयार करण्यासाठी वापरतात. याच तंत्रज्ञानाला फर्मेंटेंशन असे म्हणतात. 
याशिवाय अनेक सूक्ष्मजीव प्रतिजैविके व लस तयार करण्यासाठी वापरतात. पेनिसिलिन नावाचे अँटीबायोटिक पेनिसिलियम नावाच्या बुरशीपासून तयार केले गेले आहे. सूक्ष्मजीव पर्यावरणाच्या पुन:प्रस्थापिकरणात व स्वच्छतेतही कार्यरत असतात. कचर्‍याचे तसेच मृत अवशेषांचे विघटन सूक्ष्म जीवांपासूनच होत असते. यातून नैसर्गिकपणे स्वच्छता होत असते. रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याने त्यांचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. ट्रायकोडर्मा जातीची बुरशी जैविक बुरशीनाशक म्हणून वापरली जाते.
हानिकारक सूक्ष्मजीव : हान्िाकारक सूक्ष्मजीवांची यादीही फार मोठी आहे. त्यातील काही तर मानवाला मृत्युमुखीही नेतात. विविध प्रकारच्या रोगास कारणीभूत असणारेही सूक्ष्मजीव आहेत. मायक्रोबॅक्टेरियम हा सूक्ष्मजीव टीबीच्या (क्षय) आजारास कारणीभूत आहे. ह्युमन इम्युनो डेफिशियन्स व्हायरसमुळे एड्स होतो. काही प्रकारचे सूक्ष्मजीव प्राणी व वनस्पतींनाही संक्रमित करू शकतात. काही जीव अन्नपदार्थ व औषधे दूषित करण्याचे काम करतात. अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार यामुळेच घडत असतात.
अशा प्रकारे जैव तंत्रज्ञानाचा वापर करून अँटिबायोटिक्स, ऑरगॅनिक अँसिड्स, जीवनसत्त्वे, एकलकोशिका प्रथिने, बायोप्लास्टिक, बायोपिग्मेंट्स, बायोगॅस, जैविक खते, कीटकनाशके, विविध औषधे असे अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांपासून तयार केलेले आहेत आणि म्हणूनच यांचा आकार जरी लहान असला, तरी कार्य मात्र मोठे आहे. अशा या अँनिमल क्यूल्सचे अद्भुत विश्‍व अजूनही एक गुपितच आहे.

शक्तिकेंद्र किल्ले

शिवशाहीत शक्तिकेंद्र किल्ले 



शिवशाहीत व त्यापूर्वीही राज्यकर्त्यांसाठी किल्ले हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांच्या रचनेपासून सर्वच गोष्टींचा फार बारकाईने विचार केला जात असे. या विचारांना रामचंद्र अमात्य यांनी शब्दबद्ध करून ग्रंथरूप दिले. त्यातून किल्ल्यांची शास्त्रशुद्ध रचना प्रत्ययास येते. 

मचंद्रपंत अमात्य या शिवकालीन व्यक्तिमत्त्वाचा जन्म १६५0 सालचा. इ.स. १६७४ साली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. त्यांनी केवळ २४ वर्षांच्या या तरुणास अमात्यपदासारखे क्रमांक दोनचे पद द्यावे. यातच या व्यक्तीच्या उत्तुंग बुद्धिमत्तेची साक्ष पटते. आपल्या अखेरच्या काळात इ.स. १७१६ च्या सुमारास, रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले. जेमतेम सात प्रकरणे आहेत यात. मात्र प्रत्येक प्रकरण अनेक प्रबंधांचा विषय ठरावा अशा असामान्य योग्यतेचे आहे. यातील भाषा, वाक्ये असामान्य आहेत. आज्ञापत्र म्हणजे शिवछत्रपतींसारख्या अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाची शब्दबद्ध झालेली मानसिकता आहे. 
रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्राच्या 'दुर्ग' या विषयावरील प्रकरणात म्हटले आहे, ''संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! दुर्ग असता मोकळा देश प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावर राज्य तरी कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्‍वत करून घेतला. आले संकट त्या दुर्गाश्रयी परिहार केले.''
शिवछत्रपतींनीसुद्धा हे राज्य गडांचा योग्य असा उपयोग करूनच शुन्यातून निर्माण केले. जो जो भाग स्वत:च्या अधिपत्याखाली येत नव्हता, त्या त्या ठिकाणी त्यांनी नेमक्या जागा निवडल्या अन् गिरीदुर्ग वा जलदुर्ग बांधून ते ते भाग स्वत:च्या अधिपत्याखाली रुजू करून घेतले. याच पद्धतीचा अवलंब करत त्यांनी नाशिकच्या उत्तर सीमेवर असलेल्या साल्हेर व अहिवंतगडापासून दक्षिणेस कावेरीच्या तीरावर वसलेल्या जिंजीपर्यंत स्वायत्त स्वराज्याची प्रतिष्ठापना केली.
दुर्ग हे शक्तिकेंद्र अशी कल्पना करून त्या भोवताली विणलेले हे राज्य सर्वच दृष्टीने इतके बलिष्ठ अन् त्याचसवे चिवटही ठरले, की उत्तरकाळात औरंग्यासारख्या सर्वशक्तिमान अशा पातशहाने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेवर आक्रमण केले. इदलशाही, कुतुबशाहीसारखी साम्राज्यं एका फटकार्‍यानिशी त्याने धुळीस मिळविली. त्याच्या लेखी अतक्र्य, अशक्य असे काहीच नव्हते, मात्र शिवछत्रपतींनी रचलेल्या या दुर्गांच्या जाळ्यात तो पुरता अडकला. पूर्ण पंचवीस वर्षे तो मुघल सम्राट या जाळ्यातून सुटण्यासाठी तडफडत राहिला. पण ते त्यास त्याच्या मृत्यूपर्यंत शक्य झाले नाही. शिवछत्रपतींच्या राज्यात दुर्ग होते म्हणूनच हे राज्य शिल्लक राहिले. त्या वादळातून नव्या जोमाने उठून उभे राहिले! म्हणून स्वये शिवछत्रपतींचे व त्यांच्या पदरीच्या विचारवंत मुत्सद्यांचे मत असे, की राज्यकर्त्याने सदोदित मनी बाळगायला हवे, की दुर्ग म्हणजेच राज्य, दुर्ग म्हणजे राज्याचा पाया, दुर्ग म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था, दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, दुर्गम्हणजेच सैन्याचे बळ, दुर्ग हीच आपली आश्रयस्थाने, दुर्ग हेच सुखनिद्रागार, किंबहुना दुर्ग हेच स्वत:च्या व राज्याच्या प्राणसंरक्षणाचे एकमेव साधन आहे. म्हणून मग याविषयी कुणाच्याही भरवशावर विसंबून राहू नये. आहेत त्या दुर्गांच्या निगराणीचा अन् संरक्षणाचा व नवीन दुर्गाच्या निर्मितीचा ध्यास राजाने स्वत:च बाळगावा. कुणावरही विश्‍वास न ठेवता या बाबी स्वत:च्या अखत्यारित ठेवाव्यात. शिवछत्रपतींची त्यांच्या दुर्गांकडे वा दुर्गांच्या राज्य उभारणीतील सहभागाकडे पाहण्याची दृष्टी ही अशी होती. दृष्टी नव्हेच ती द्रष्टी नजर म्हणायचे तिला. याच नजरेने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: शुन्यामधून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पराक्रमाचा डिंडिम दशदिशांत गर्जविला.
अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दुर्गांची व्यवस्था सुद्धा शिवकाळात अतिशय नेटकी अन् आखीवरेखीव होती. दुर्गांचा वेगळा विभाग नव्हता कारण तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता! 

पाणी, मासे आणि माणूस

पाणी, मासे आणि माणूस

स्पाँजमधील विहार करणारे छोटे आकर्षक रंगाचे मासे ते शार्कसारखे महाकाय मासे असे माशांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची शरीररचना वेगळी, रंग वेगळे, खाण्याच्या सवयी वेगळ्या, विणीचे हंगाम आणि अधिवास वेगळे. तसेच, पालकत्वाची भूमिका निभावण्याची पद्धतीसुद्धा वेगळी.
पृथ्वीवर खारे पाणी आहे. तसेच, अगदी अल्प प्रमाणात गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्याचे स्रोत नैसर्गिक आहेत. नद्या, नाले, तलाव, विहिरी, तळी, कॅनॉल, पाट अगदी डोंगर-दर्‍यांतून झिरपणारे झरे, छोटे ओहोळ ते महाकाय नद्या या सर्वांवर आपले जीवन अवलंबून आहे. गोड पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच, ते औद्योगीकरणासाठी, शेतीसाठी, वीजनिर्मितीसाठी, घरच्या दैनंदिन वापरासाठीही वापरतात.
या कारखान्यातून निघणारे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे अलीकडे आपल्या नद्या, नद्या न राहता सांडपाण्याच्या वाहक झाल्या आहेत. या सर्व नद्या सरतेशेवटी समुद्रात जाऊन मिळतात. भारतासारख्या विकसनशील देशाला लाभलेला समुद्रकिनारा आणि समुद्रात जाऊन मिळणार्‍या नद्या ही मोठी देणगी आहे. या दोन्ही ठिकाणी मासेमारी केली जाते. मासेमारीतून रोजगार निर्मिती होते, त्याबरोबरच परकीय चलन मिळण्यासाठीसुद्धा उपयोग होत असतो.
प्रगत तंत्रज्ञानामुळे, संशोधनामुळे औद्योगीकरण झाले, मात्र त्यातूनच प्रदूषणही वाढले. हवा, पाणी यांचे प्रदूषण होत आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी बाजारात खूप प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर केला जातो. यातील काही अंश पिकांमध्ये साठून राहतो, काही जमिनीवर पडतो.
जमिनीवरील ही रसायने पावसात पाण्याबरोबर नदीत आणि पुढे समुद्रात येतात. कागद बनविण्याचा कारखाना, कातडी कमाविण्याचा कारखाना, रंग बनविणारे कारखाने, फटाके बनविणारे कारखाने, वाहने धुणे त्यातील ऑईल, लाँड्रीमधून येणारे सांडपाणी, अणुभट्टीमधून निघणारे सांडपाणी, किंबहुना कोणत्याही उत्पादनाचे सांडपाणी हे दूषित असते. या पाण्यामध्ये रोग पसरविणार्‍या अतिसूक्ष्म विषाणूंबरोबरच अत्यंत धोकादायक 'हेवी मेटल' (घन पदार्थ) असतात.
देशातील मोठय़ा बहुतांशी नद्या म्हणजे गटारगंगा आहेत. यामध्ये खूप प्रमाणात हेवी मेटल्स आहेत. काही हेवी मेटल्स पाण्यामध्ये विरघळतात किंवा पाण्यातील एखाद्या दुसर्‍या पदार्थांबरोबर बांधले जातात आणि जलचर प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. यांना झेनाबायोटिक्स असे म्हणतात. जलचर प्राण्यांमध्ये मेटाबायोथोन हे प्रथिन असते. ते हेवी मेटल्सबरोबर बांधले जाते आणि शरीरात साठवले जाते. त्यातील काही हेवी त्रासदायक ठरत असतात. उदा. कॅडमियम, अर्सेनिक, शिसे, मक्यरुरी, क्रोमिअम, कॉपर इत्यादी.
माशांचे कल्ले, किडनी, लिव्हर आणि मासपेशीमध्ये हेवी मेटल्स साठत राहतात; तेव्हा माशांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. शरीरावर जखमांसारखे व्रण दिसतात, कल्ल्यांवर श्‍वसनासाठीची असणारी जागा कमी होते. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रक्त घटकांवर परिणाम होऊन मासे मरतात.
माणसांमध्ये हेवी मेटल्स अन्न-साखळीतून जात असतात. हवेतील अतिसूक्ष्म कणांमध्येसुद्धा हेवी मेटल्स असतात. ते प्रथमत: फुफ्फुसामध्ये जाऊन श्‍वसन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. काही हेवी मेटल्समुळे कॅन्सर होऊ शकतो.
प्रत्येक हेवी मेटल्सचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम किंवा लक्षणेही वेगळी आहेत. कॅडमिअममुळे किडनी खराब होते. शरीराची हाडे ठिसूळ होतात, दुखावतात, असह्य वेदना होतात. हा प्रकार प्रथम जपानमध्ये दिसून आला. या रोगाला 'इटाई इटाई', असे म्हणतात. शिसे किंवा लिडमुळे अशक्तपणा, किडनी खराब होणे, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार होतात.
आर्सेनिकसारख्या हेवी मेटल्समुळे पचनाचे आजार, रक्ताभिसरण संस्थेचा रोग किंबहुना मृत्यूसुद्धा होतो. मक्यरुरीसारख्या हेवी मेटल्समुळे होणारा आणि मुख्यत्वे करून मक्यरुरीने प्रदूषित झालेल्या पाण्यातील माशांचे सेवन केल्यामुळे माशातील साठलेल्या मक्यरुरीने मानवी शरीरात जाऊन झालेले आजार म्हणजे 'मिनामाटा डीसीज.' या रोगामध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे अस्वस्थपणा, निद्रानाश, चिडचिडेपणा, डिप्रेशन, मानसिक ताण, स्मरणशक्ती कमी होणे, अंधुक दिसणे, डोकेदुखी, श्रवण क्षमतेवर परिणाम होणे, किडनी खराब होणे इत्यादी. १९५0 मध्ये जपानमध्ये या रोगाने तेथील लोकांमध्ये भीती निर्माण केली होती.
थोडक्यात, आपण विकासाच्या नावाखाली खूप प्रदूषण करीत आहोत. 

सावध ऐका, निसर्गाच्या हाका

सावध ऐका, निसर्गाच्या हाका


५ जून - दर वर्षी नियमितपणे साजरा होणारा 'पर्यावरण दिन.' या दिवसापुरतंच पर्यावरणाचं महत्त्व, उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पर्यावरण 'दीन'च! या दीन अनाथाचा वाली कोण? कारण, एक अनोखी लढाई सध्या सुरू आहे. मानव जात विरुद्ध निसर्ग असा लढा सुरू आहे. कारखाने, गृहसंकुल, रस्ते, महामार्ग, धरणं, विद्युतप्रकल्प, शेती, खेरीज अण्वस्त्र ही सगळी आयुधं वापरून आपण पर्यावरणाचा पाडाव करायला सज्ज झालो आहोत. आपण त्याला जवळ-जवळ संपवतच आणलं आहे.
पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, जमीन-माती, खनिजं, जंगलं आणि जंगलातले सर्व प्राणीसुद्धा. आपले हे नैसर्गिक स्रोत, आपण वापरतो; पण नुसता वापरच करत गेलो, तर ही नैसर्गिक साधनसंपत्ती संपेल. आज ज्या वेगाने तिचा उपयोग होत आहे, त्या गतीनं केवळ काही शतकंच ती पुरू शकेल.
आपण जर निसर्गातून काही घेतलं, तर त्याबद्दल मोबदला द्यायला नको का? पण, आपण जे परत करतो, ते अनेकदा अनैसर्गिक घटक असतात. प्लॅस्टिक आणि तद्जन्य वस्तू, अनेक रसायनं शेतीसाठी लागणारी, आपल्या चैनीसाठी, क्वचितच गरजेसाठी लागणारी उपकरणं या सगळ्यांपासून आपण निसर्गाला जे परत करतो, ते त्याला पचत नाही. म्हणजे ग्राहक म्हणून निसर्गापासून काही घेतो, त्याबद्दल त्याला 'खोटे पैसे' एका अर्थी देतो. म्हणजे जर जमा-खर्च मांडला, तर निसर्ग तोट्यात आहे. यात ग्राहक-विक्रेता असं नातंही खरं तर मांडता येणार नाही. कारण, निसर्गाची शुद्ध लूटच चालू आहे.
आपले पूर्वज पर्यावरणस्नेही होते. मुळात ते पर्यावरणाचा र्मयादित वापर करत होते आणि निसर्गाला जे परत करत होते, ते विघटनशील घटक होते. त्यांची संख्या म्हणजे पूर्वजांची आणि जो परतावा निसर्गाला दिला जात होता, त्याची मात्राही अल्प होती.
आज औद्योगिक क्रांती आणि वैद्यकीय क्षेत्रात लागलेले जीवनरक्षक शोध यांमुळे लोकसंख्या अर्मयाद वाढली आहे. त्यामुळेही पर्यावरणावर ताण आहेच. 

आखूड शिंगी Giraffe

आखूड शिंगी Giraffe

लांब मान्या, लंबू टांग जिराफ. मोकळा फिरताना सारखी मान वेळावत कुठे तरी दूरवर न्याहळत असतो. त्याचे कुतूहलपूर्वक पाहणारे डोळे जमिनीपासून ५ ते ६ मीटर उंचीवरून परिसराचा वेध घेतात. मान चारही दिशांना फिरते. त्यामुळे त्याच्या दृश्य क्षेत्राचा विस्तार खूपच मोठा असतो. त्याची उंची भरते ५ ते ६ मीटर. नर जास्त उंच असतात. नराचं वजन सुमारे २000 किलो आणि मादीचं १000 किलोपर्यंत असतं. मान सोडून उरलं शरीर आखूड असतं. जिराफाची श्रवणक्षमता खूप असते. त्याचप्रमाणे घ्राणेंद्रियंही संवेदनक्षम असतात. जिराफाला दीर्घ काळ नाकपुड्या बंद करता येतात. त्यामुळे गरम वाळूची वादळं आणि मुंग्यांसारखे उपद्रवी कीटक यांच्यापासून रक्षण करता येतं. जीभ खूप लांब असते. ती उंच काटेरी फांद्यांवरचा पाला खाताना छोट्या फांद्यांना विळखा घालू शकते. नाक साफ करायला तिचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अंग स्वच्छ करायलाही ती उपयोगी पडते. जिभेचा रंग गर्द तपकिरी काळपट असतो. त्यामुळे सूर्य तपासून तिचं रक्षण होऊ शकतं.
जिभेप्रमाणेच वरचा ओठ थोडा लांब व खूप लवचिक असल्याने तो पाला तोडायला मदत करतो. शिवाय, जिभेवर, ओठात आणि तोंडाच्या त्वचेवर निबर उंचवटे असतात. त्यामुळे झाडांच्या टोकदार काट्यांपासून संरक्षण मिळतं.
मोठाले नारिंगी, तपकिरी किंवा काळपट ठिपके आणि त्याभोवतालचे फिके पिवळे आणि पांढरे मऊ केस यांमुळे जिराफ खूप आकर्षक दिसतो. ठिपक्यांखालच्या त्वचेत रक्तवाहिन्यांचं दाट जाळं असतं. त्यामुळे शारीरिक तापमान संतुलित ठेवता येतं. मोठय़ा धर्मग्रंथीही त्यासाठी मदत करतात. अंगाच्या विशिष्ट तीव्र वासामुळे कृमिकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्वचेतून एकूण अकरा रासायनिक द्रव स्रवतात. त्यात इंडोल व इ-मेथिलींडोल यांचा मोठा भाग असतो. नरांचा शरीरगंध जास्त तीव्र असतो. लैंगिक मिलनासाठी तो आकर्षक ठरतो. जिराफाचं शेपूट साधारण एक मीटर लांब असते. त्यामुळे माश्यांसारखे उपद्रवी कीटक मारता येतात. डोक्यावर दोन आखूड शिंगं असतात. लढाईसाठी लांब मांसल दणकट मान खूप उपयोगी पडते. झुंजीत मानेचा जोरदार रेटा महत्त्वाचा ठरतो. त्यात कधी मान दुखावतेसुद्धा. मृत्यूही ओढवतो.
लांबलचक पायांचा उपयोग झेपा घेत वेगाने पळण्यासाठी होतो. पळताना मागचे पाय पुढच्या पायांपुढे आधी टेकतात. मग पुढचे पाय जागा सोडतात. त्या वेळी तोल सांभाळायला लांब मानेचे लयीतले झोके उपयोगी पडतात. धावताना वेग एका क्षणात वाढवता येतो. तासाला साठ कि. मी. अशी गती पकडता येते. घोड्यांप्रमाणेच जिराफ उभ्यानेच झोपू शकतो; पण जमिनीवर लोळण घेऊन तो ४-६ तास झोप काढतो. पाणी पिण्यासाठी त्याला पाणवठय़ाजवळ पाय फाकून, मान वाकवून पाणी प्यावं लागतं. मानेची लांबी दोन मीटर असली, तरी मणक्यांची संख्या आठच असते. मात्र, प्रत्येकाची लांबी सुमारे २८ सेंटिमीटरपर्यंत भरते. मानेची लांबी वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. मानेसाठी जिराफाला जादाचा आठवा मणकाही लाभलाय.
मान वाकवली, की डोक्यातला रक्तदाब वाढू नये आणि एरवी उंचीवरच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा व्हावा, अशी झडपांची व्यवस्था हे जिराफाचं वैशिष्ट्य आहे. हृदयाचे स्नायूही खूप बळकट असतात. त्यामुळेच लांब मान्या, लंबू टांग जिराफाचा पळतानाही निभाव लागतो. रक्तदाबाचं नियंत्रण होतं.

खग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहण

एप्रिल महिन्यात १५ एप्रिल रोजी खग्रास चंद्रग्रहण झाले. हे ग्रहण भारतातून दिसले नव्हते. ते दिसले होते उत्तर अमेरिकेतून. त्यांच्यासाठी ही एक पर्वर्णीच होती. कारण २0११ नंतरचे हे पहिले चंद्रग्रहण होते जे बघण्याची संधी मिळाली होती.
चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. पृथ्वीच्या सावलीत चंद्र गेल्यामुळे काही काळ आपल्याला तो दिसत नाही किंवा फारच मंद दिसतो. चंद्रग्रहणाची मजा म्हणजे चंद्रग्रहण होत असेल तर पृथ्वीच्या ज्या भागातून चंद्र दिसत असेल, त्या सर्व भागातल्या लोकांना ते ग्रहण बघण्याची संधी असते. असेही अनेकदा होते, की संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जात नाही. पण जेव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा आपल्याला रंगांचा एक वेगळा आविष्कार दिसतो. खग्रास चंद्रग्रहण जेव्हा त्याच्या बरोबर मध्य कालावधीच्या जवळ असते, तेव्हा आपल्याला तो तांबडा तपकिरी रंगाचा दिसतो. होते काय, की जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो, तेव्हा एकतर त्यातील विविध रंगांची प्रकाशकिरणे विखुरली जातात. तसेच प्रकाशाचे वक्रीभवन होते. निळा रंग सर्वांत जास्त विखुरला जातो, तर लाल सर्वांत कमी. त्यामुळेच आपल्याला उगवता सूर्य किंवा चंद्र हा लालसर दिसतो. तसेच लाल प्रकाशाचे वक्रीभवन होऊन तो पृथ्वीच्या वातावरणातूनसुद्धा बाहेर पडतो आणि खग्रास ग्रहणाच्या वेळी याच तांबूस-लाल प्रकाशातून चंद्र गेल्यामुळे तो आपल्याला लाल तपकिरी रंगाचा दिसतो.

टपर वेअर लॅस्टिक

टपर वेअर लॅस्टिक


बाजारातून श्रीखंड, दही, गुलाबजामसह अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या भांड्यातून आणतो. त्या वस्तू संपल्या की ही प्लॅस्टिकची भांडी अथवा डबे घरात वापरू लागतो. याचं कारण त्यांची झाकणं घट्ट बसतात हे आहेच, पण त्याचबरोबर हे डबे चांगले टिकाऊ, पण वजनाला हलके असतात. ते गंजत नाहीत. लोणच्याच्या खाराचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. यामुळे अशा प्रकारच्या भांड्यांना महिलावर्गाची चांगलीच पसंती असते.
या प्रकारच्या प्लॅस्टिक भांड्यांचा शोध अर्ल सायलाय टपर याने लावला म्हणून यांना 'टपर वेअर' असं म्हणतात. हा टपर खरं तर व्यवसायानं झाडांचा डॉक्टर होता. झाडांवरची कीड नाहीशी करणे, एका ठिकाणचं झाड अडथळा होऊ लागले, तर ते मुळासकट काढून दुसरीकडे लावून जगवणे हा त्याचा व्यवसाय.
अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळात त्यानं द्यू पाँट कंपनीत नोकरी धरली. त्या काळात काचेच्या, तसंच चिनी मातीच्या बरण्या आणि पत्र्याचे डबे पदार्थ साठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरले जात. टपर कचर्‍यापासून प्लॅस्टिक बनवण्याच्या संशोधन प्रकल्पावर काम करीत होता. प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो. ते लवचिक असलं तरी टिकाऊ असतं. तसंच खाद्य पदार्थातील रसायनांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
टपरच्या हे लक्षात येताच बराच पुढचा विचार करून त्यानं द्यू पाँटची नोकरी सोडली. मग त्यानं टपर प्लॅस्टिक कंपनीची स्थापना केली. सुरूवातीस त्यानं बुटाच्या टाचा बनवून विकल्या; पण युद्ध समाप्तीनंतर त्यानं घरगुती वापरासाठी प्लॅस्टिकचे डबे तयार करणे सुरू केले.
या डब्यांचं झाकण विशिष्ट प्रकारे दाबून बसवलं, की डब्यातील हवा बाहेर पडते, हे त्याच्या प्रतिनिधींनी दारोदार हिंडून सिद्ध केलं. त्यामुळे या डब्यांना मिळणारा प्रतिसाद वाढला. खाद्यपदार्थांसाठी अशी भांडी उपयोगी पडतात, हे समजल्यावर तर त्याच्या वापरात कितीतरी वाढ झाली व टपरचा कोट्यधीश बनवायचा मार्ग मोकळा झाला.

कस्तुरी मृग

कस्तुरी मृग

कस्तुरी मृग
कुठे मिळते ही कस्तुरी? ती मिळते कस्तुरी मृगाच्या नाभीजवळच्या गंध गं्रथीतून. हरीण कुळाशी नातं सांगणार्‍या पाच प्रजातींमधील कस्तुरी मृग हा आशिया खंडातल्या भारताच्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये, त्याचप्रमाणे दक्षिण चीन, रशिया, नेपाळ, कोरिया, म्यानमार या देशांत सापडतो. पॅलिआर्कट्रीक आणि पौर्वात्य भागात त्यांचं अस्तित्व आहे. पर्वतीय डोंगररांगांत साधारणत: १६00 मीटर उंचीपर्यंत त्यांचा वावर असतो. थंडीच्या मोसमात ते तीव्र उताराच्या सूचिपर्णी जंगलात जातात. डोंगर-कपार्‍या हे त्यांचं आवडतं आश्रयस्थान. उन्हाळ्यात नद्या, ओढे, झरे यांच्या जवळपास कुरणात किंवा शेतात ते बागडताना दिसतात. पाणथळ दलदलीचा भाग मात्र त्यांना अगदी वज्र्य असतो. स्तुरी' या सुगंधी द्रव्याने अवघ्या जगाला आकर्षित केलंय. आपल्या देवांना सुगंधी कस्तुरीचा टिळा कपाळाला लावून प्रसन्न करता येतं. फार प्राचीन काळापासून ही प्रथा प्रचलित आहे. कस्तुरी म्हणजे फक्त सुगंधी गुणधर्म असलेलंच मौलिक द्रव्य नाही, तर त्यात औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेद आणि गंधशास्त्रविषयक प्राचीन वाड्मयात त्यांची वर्णनं आढळतात. त्याचप्रमाणे चीन व कोरियातल्या चारशेहून अधिक पारंपरिक औषधोपचारांत कस्तुरीचा वापर केला जातो. याला ५000 वर्षांची परंपरा आहे. पेशवेकाळात 'लाडाचे कारंजे' या गावच्या सावकाराने आपल्या वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी आपल्या वाड्याच्या मातीच्या गिलाव्याच्या भिंती कस्तुरीने सुगंधित करून टाकल्या. त्याने गिलाव्याच्या मातीतच कस्तुरी कालवली. पुढच्या विपरीत काळात लोकांनी त्याच्या पडक्या भिंतींची माती लुटून नेल्याची कथा प्रचलित आहे.
हरणासारख्या या प्राण्यांचं वर्णन हरणांशी जुळतं. पुढचे निमुळते आखूड पाय आणि मागचे लांब पुष्ट पाय त्यांना खडकाळ उतार-चढ करायला व पळायला उपयोगी पडतात. पाठ कमानदार असते. मागच्या पायावरची शरीराची उंची सर्वाधिक असते. लांब-लांब झेपा घेतच ते पळतात. नरांचं वजन माद्यांपेक्षा जास्त असतं. ते १५ ते १७ किलो भरतं. दोघांनाही शिंग नसतात.
कस्तुरी मृग ओळखण्याची ठळक खूण म्हणजे त्याच्या वरच्या जबड्यातून बाहेर डोकावणारे, दोन वळणदार आणि टोकदार सुळे. ते खाली विळ्याच्या पात्यासारखे उलटे वळलेले असतात. वयस्कर नराचे सुळे खालच्या जबड्याच्याही बाहेर खाली गेलेले दिसतात. त्यांचा उपयोग प्रतिस्पध्र्याशी लढायला होतो. पूर्ण वाढीच्या दातांची लांबी दहा सेंटिमीटरपर्यंत भरते.
नवीन जन्मलेल्या पाडसाच्या अंगावर मऊ, आखूड, गडद तपकिरी केस असतात. त्यावर पिवळे किंवा पांढरे ठिपके असतात. थंडीच्या प्रारंभी त्या केसांची जागा प्रौढ वयातले भरड, लांब, दाट केस घेतात. ठिपके पुसट होतात किंवा पूर्णपणे नाहीसे होतात. कान सशासारखे किंचित गोलाकार असतात. पायांचे खूर लांब, तळाला जास्त रुंद, पण थोडे टोकदार असतात. त्यामुळे ते मऊ भुसभुशीत मातीत किंवा बर्फात रुतत नाहीत.
गंध ग्रंथी हे नराचं वैशिष्ट्य. त्या तीन प्रकारच्या असतात. खुरांवर, शेपटीखाली व जननेंद्रिय आणि नाभीच्या मधल्या भागात त्या आढळतात. नाभीजवळच्या साधारण तीन सेंटिमीटर रुंद आकाराच्या ग्रंथीतून कस्तुरी स्रवते. त्यातून सुमारे २८ ग्रॅम कस्तुरी मिळते. ती मेणचट आणि गडद लाल रंगाची असते. कस्तुरीचा वास खूप लांबून ओळखता येतो. तीन हजार भाग द्रवात एक भाग कस्तुरी असली, तरीही त्याचा वास आपण ओळखू शकतो. मोहवून टाकणारा असा हा गंध आहे. कस्तुरी हे सोन्याच्या तिप्पट भावाने विकलं जाणारं मौलिक द्रव्य आहे. रशियात वर्षाला १७ ते २0 हजार प्राणी त्यासाठी बेकायदा मारले जातात. या प्राण्यांचं जतन करणं हे निसर्गाचं रक्षण आणि व्यापार या दोन्ही दृष्टींनी फार महत्त्वाचं आहे.

एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula

 एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula 

 एबल ३३ तेजोमेघ, Abell 33 nebula
लग्नाचे दिवस आले म्हणजे अंगठय़ा आल्याच आणि आजची ही अंगठी खरोखरच आकाशातून आलेली आहे. हा तेजोमेघ आहे एबल ३३. हा तेजोमेघही ग्रहसदृश तेजोमेघांपैकी आहे. हा हायड्रा तारकासमूहातील अल्फराड तार्‍याच्या किंचित उत्तरेला आहे.
सूर्यासारख्या तार्‍यांचा अंत एका कृष्णबटू तार्‍यात होतो. त्यापूर्वी हे तारे प्रसरण पावू लागतात. त्यांचा आकार इतका वाढतो, की ते त्यांच्या ग्रहमालेतील ग्रहांच्या कक्षेपेक्षाही मोठे होतात. कालांतराने हे प्रसरण थांबतं आणि त्या तार्‍याचे बाह्यआवरण थंड होऊ लागतं. आता त्या तार्‍याचं आकुंचन होऊ लागतं. या आकुंचनाच्या वेळी थंड झालेला बाह्यभाग तसाच राहतो. त्या तार्‍याभोवती त्याचे एक प्रकारचे आच्छादन तयार झाल्यासारखे होते. असा हा खगोलीय पदार्थ आपल्याला ग्रहांसारखा दिसतो.
सहसा हे तेजोमेघ अगदी अचूक वतरुळाकार नसतात. तार्‍याच्या आकुंचनाच्या वेळी काही घडमोडी होत असतात; पण हा तेजोमेघ फारच सुंदर असा गोलाकार तेजोमेघ आहे. गंमत म्हणजे या तेजोमेघात आणि आपल्यात एक तारा असा आला आहे, की तो याच्या बाह्यआवरणाच्या जवळ आहे, त्यामुळे याला एक हिरा जडविलेल्या अंगठीचे रूप आले आहे. हा तेजोमेघ खुद्द आपल्यापासून २५00 प्रकाशवर्ष अंतरावर आहे, तर हा तारा आपल्यापासून सुमारे ७८0 प्रकाशवर्ष दूर आहे. एकूण काय तर 'हिरा कुठे तर अंगठी कुठे' अशी परिस्थिती आहे; पण तरीही हे एकूण दृश्य मात्र फारच सुंदर आहे. हे चित्र युरोपियन सदर्न ऑब्जरवेटरीचा व्हेरी लार्ज टेलिस्कोप वापरून घेतले आहे.

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake how it works??

न्यूमॅटिक ब्रेक, pneumatic brake


एक आगगाडी रुळावरून घसरलेली पाहून अशा घसरलेल्या रेल्वेचे डबे उचलून परत रुळावर ठेवणारे यंत्र त्याने बनवले. त्याचे पेटंट घेतले आणि वडिलांच्या कारखान्याशेजारीच त्याने स्वत:चा कारखाना उभारला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. र्ज वेस्टिंग हाऊस (धाकटा) हा जॉर्ज वेस्टिंग हाऊस यांचा मुलगा. वडिलांच्या नावावर तब्बल ३00 शोधांची एकाधिकार पत्रे होती. धाकटा जॉर्ज वडिलांच्या कारखान्यातच वाढला आणि तिथेच लुडबुड करता-करता त्याने यांत्रिकीचे पहिले धडे घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी तो पळून अमेरिकी उत्तरी सैन्यात दाखल झाला. यादवी संपल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव तो न्यूयॉर्क येथे महाविद्यालयात दाखल झाला. काही काळातच प्राचार्यांनी धाकट्या जॉर्जची हुशारी पाहून थोरल्या वेस्टिंग हाऊसना 'त्याला तुमच्या यंत्रशाळेत काम करू द्या' असा सल्ला दिला व तो लगेचच अमलात आणण्यास सांगितले.
दरम्यान, एक आगगाडी रुळावरून घसरलेली पाहून अशा घसरलेल्या रेल्वेचे डबे उचलून परत रुळावर ठेवणारे यंत्र त्याने बनवले. त्याचे पेटंट घेतले आणि वडिलांच्या कारखान्याशेजारीच त्याने स्वत:चा कारखाना उभारला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही वर्षांनंतर दोन आगगाड्यांची समोरासमोर झालेली टक्कर त्याला पाहायला मिळाली. त्या काळात प्रत्येक डब्यात आणि इंजिनात एक-एक 'ब्रेकमन' असे. त्यातल्या एकाने ब्रेक दाबला तरी बाकी ब्रेकमन्स बरोबर नेमके त्याच वेळी ब्रेक दाबू शकत नसत. त्यांच्यातील या विसंवादामुळे गाड्यांचे डबे रुळावरून घसरत असत.
त्या काळात स्वित्झर्लंडमध्ये खूप दाबाखालची हवा झोत स्वरूपात वापरून बोगदे खणल्याचे धाकट्या वेस्टिंग हाऊसच्या वाचनात आले. याच तत्त्वाचा वापर करून ड्रायव्हरनं एक खटका ओढताच सर्व डब्यातले ब्रेक या हवेच्या झोताने एकदमच कार्यरत करता येतील, असा विचार त्याच्या मनात डोकावला. त्यावर संशोधन करत त्याने आपला विचार प्रत्यक्षात उतरवला. यामुळे आता गाड्या हळू चालवायचं कारण उरलं नव्हतं. याचं कारण वेस्टिंग हाऊसची नवी हवा दाब प्रणाली चाकांची गती थांबवायला उपयुक्त ठरू लागली होती. पुढे या धाकट्या वेस्टिंग हाऊसने सुमारे ४00 शोधांचं पेटंट घेतले आणि बापसे बेटा सवाई हे सिद्ध केले. न्यूमॅटिक ब्रेक ही त्याने रेल्वेला दिलेली मोठीच देणगी आहे. काही काळानंतर आता ब्रेकच्या प्रणालीत सुधारणा होऊन त्यात अत्याधुनिकता आली, तरी जॉर्ज वेस्टिंग हाऊस (धाकटा) यांच्या शोधाचे महत्त्व अद्यापही कमी झालेले नाही.

फेंगडे मासे

फेंगडे मासे 

फेंगडे मासे

सप्टेंबर महिन्यांमध्ये सगळी पृथ्वी हिरवा शालू पांघरून बसलेली असते. या कालावधीमध्ये निसर्गात भटकंती म्हणजे मन प्रसन्न आणि तृप्त तर होतेच; पण निसर्गात काय बघू न काय नको, अशी अवस्था होते. सगळं अद्भुत आणि रमणीय. एकदा असाच ताम्हिणी परिसरामध्ये फिरत असताना हिरव्यागार भातखाचरातून खळखळणार्‍या पाण्याचे धबधबे बघत होतो. धबधब्याचे पाणी ज्या उत्साहाने आणि जोमाने पडत असते, ते बघून आपल्यालासुद्धा खूप उत्साह वाटतो. अशाच भातखाचरातून जात असताना गमतीशीर बाब दिसली.
भातखाचराच्या ज्या कोपर्‍यातून पाण्याचा प्रवाह पुढे जात होता, त्या चिंचोळ्या प्रवाहामध्ये कॉटनची साडी सोडली होती. साहजिकच सर्व पाणी त्या साडीवरून पुढे जात होते. एका ठिकाणी साडीवर खूप मासे एकत्र काही तरी खाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटले म्हणून जवळून निरीक्षण केले. ज्या ठिकाणी मासे एकत्र जमा होत होते, तेथे साडीच्या खाली एक मोठय़ा तोंडाचे मडके ठेवलेले होते आणि साडीला खालच्या बाजूने गव्हाचे पीठ लावलेले होते. साहजिकच, त्या वासाने सगळे मासे तेथे जमा होत होते व साडीला असलेल्या छिद्रातून खाली मडक्यात पडत होते. मासेमारीची ही पद्धत पावसाळ्यात बर्‍याच ठिकाणी वापरली जाते. उत्सुकता म्हणून पाहिले, तर हे सगळे मासे फेंगडे मासे होते. मुरे, फेंगडे असे एकत्र वावरताना दिसतात. हा मासा शास्त्रीयदृष्ट्या खूप अलीकडे अभ्यासला गेला आहे. हा मासा फक्त पश्‍चिम घाटातच सापडतो. या माशाचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या अधिवासावर होणारे आक्रमण. डोंगरकपारीतील छोटे-छोटे ओहोळ हा यांचा मुख्य अधिवास; परंतु बेसुमार जंगलतोडीमुळे पाण्याचे प्रवाह बदलतात, माती वाहून जाते. याचा परिणाम अन्यही अनेक माशांच्या अधिवासावर होत असतो.
जसजसे पाण्याचे प्रवाह सुकायला लागतात, तसा फेंगडा मासा नदी, तलाव यासारख्या मुख्य पाण्यामध्ये येऊन स्थिरावतो आणि पुनरुत्पादन कालावधीमध्ये पुन्हा तो प्रवाहाच्या उलट दिशेने टेकडी, डोंगर, दरी यांतील स्वच्छ पाण्याच्या प्रवाहामध्ये जातो. ज्या पाण्याला खूप वेग आहे, अशा ठिकाणी राहणे ते पसंत करतात. पाण्याच्या प्रवाहाशी सामावून घेण्यासाठी या माशाच्या तोंडाचा आकार विशिष्ट पद्धतीमध्ये विकसित झालेला असतो. तोंडाच्या साह्याने पाण्याच्या तळाशी हे मासे चिकटून राहतात. या माशाचा जीवशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. मात्र, त्यासाठी प्रथम त्यांची संख्या कशी वाढेल, याचा विचार करायला हवा. नदीनाल्यांचे प्रदूषण थांबविल्याशिवाय ते शक्य नाही.

स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त बुद्धिमान असतात?

स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त बुद्धिमान असतात?


युवक - माकडांपेक्षा मानवाच्या मेंदूचं वजन जास्त असल्यानं मानव माकडांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे. पुरुषांच्या मेंदूचं वजन स्त्रियांच्या मेंदूपेक्षा साधारण शंभर ग्रॅम जास्त असतं. त्यामुळे साहजिकच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात!
युवती - (हसून) मेंदूच्या वजनाप्रमाणे बुद्धिमत्ता ठरली, तर देवमासा माणसाच्या सहा पट बुद्धिमान ठरेल! प्रत्यक्षात मेंदू किती परिपक्व (मॅच्युअर) झाला आहे, यावर बुद्धिमत्ता ठरते. तुम्हा युवकांपेक्षा आम्हा युवतींचाच मेंदू अधिक परिपक्व असतो, असं विज्ञानानं दाखवून दिलं आहे. इंग्लंडमधल्या न्युकॅसल विद्यापीठातले मार्कस कैसर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 'चुंबकीय अनुनाद चित्रीकरण' (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) वापरून मेंदूंचा तुलनात्मक अभ्यास केला. त्याआधारे, समान वयाच्या युवकांपेक्षा युवतींचा मेंदू अधिक परिपक्व असतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यांना असं आढळलं, की मेंदूची पुनर्रचना करण्याचं काम युवतींमध्ये युवकांच्या आधी सुरू होतं.
युवक - मेंदूची पुनर्रचना?
युवती - आपण शिकतो तेव्हा मेंदूतल्या चेतापेशींमध्ये अनुबंधनं (सिनॅप्स) निर्माण होतात. मेंदूतल्या चेतापेशी आणि अनुबंधनांची संख्या जसजशी वाढत जाते, तसतशी मेंदूत त्यांची पुनर्रचना केली जाते. हे काम युवतींच्या मेंदूमध्ये लवकर सुरू होतं, असं या शास्त्रज्ञांना आढळलं.
युवक - पण, या पुनर्रचनेची गरजच काय?
युवती - वाढत्या वयाबरोबर बदलणार्‍या आपल्या गरजांनुसार आपली कामं अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी ही पुनर्रचना केली जाते. या पुनर्रचनेत फारसा वापर न होणारी अनुबंधनं काढून टाकली जातात, तर महत्त्वाच्या कार्यांसाठी संबंधित चेतापेशींमध्ये अधिक कार्यक्षम अनुबंधनं निर्माण केली जातात. उदाहरणार्थ, आपल्याला दिसणार्‍या दृश्याची ऐकलेल्या ध्वनींशी सांगड घालण्याचं काम करणारी अनुबंधनं सातत्यानं लागतात. यासाठी दृश्य आणि ध्वनी संदेशांवर प्रक्रिया करणार्‍या चेतापेशींमध्ये वेगवान संदेशवहनासाठी विशेष अनुबंधन-मार्गाची निमिर्ती केली जाते. अशा सुधारणांमुळे आपला मेंदू त्याचं कामं अधिक झपाट्यानं आणि कार्यक्षमतेनं करू शकतो. युवतींच्या मेंदूत ही विकासप्रक्रिया लवकर सुरू होते. म्हणूनच मेंदूच्या वजनाच्या बढाया मारण्याऐवजी युवती अधिक परिपूर्ण विचारानं परिपक्वतेचं माहात्म्य पटवून देतात!

बचनाग आणि अतिविष

 बचनाग आणि अतिविष


देवतात्मा हिमालय अनेक औषधी वनस्पतींचं माहेरघर आहे. अस्सल ब्रह्मकमळ, अस्सल कुटकी, खुरासनी ओवा दारूहळद, जटामासी आणि बचनाग. स्सल बचनाग काश्मीरपासून नेपाळ, हिमालयात वाढतो. त्याचं अस्सल नाव 'वत्सनाभ', अपभ्रंशानं 'बचनाग.' 'वत्सनाभ' या संस्कृत नामानं त्याचं व्यवच्छेदक लक्षण स्पष्ट होतं. या वर्षायू वनस्पतीला जमिनीत कंदांची जोडी असते. हे दोन्ही कंद एकमेकांना जुळलेले असतात. त्यांची आकृती दिसते वासराच्या अर्थात गाईंच्या वासराच्या बेंबीसारखी. नाभीसारखी दिसते म्हणून ही वनस्पती 'वत्सनाभ.'
वत्सनाभचा भाईबंद आहे अतिविष. अतिविषही हिमालयाचाच रहिवासी. नावावरूनच स्पष्ट होतं, की ही वनस्पती विषारी आहे. वत्सनाभ, त्याचाच भाऊ म्हणजे विषारीच. वत्सनाभाची पर्यायी आयुर्वेदीय नावे आहेत ती त्याच्या विषारी स्वभावावरूनच. विष, गरल आणि प्राणहर. याचबरोबर वत्सनाभ अमृत म्हणूनही ओळखला जातो. विष आणि अमृत! दोन्ही जन्माला आली ती अमृतमंथनातून. आयुर्वेदात एक प्रसिद्ध श्लोक आहे तो असा,
'योगादपि विषं तीक्ष्णं उत्तमौषधं भवेत्।
भैषजं काऽपि दुयरुक्तं तीक्ष्णं संभाव्यते विषम्।।

'योग्य प्रमाणात वापरल्यास विष हे उत्तम औषध ठरतं, तर प्रमाणाबाहेर मात्रेत दिल्यास औषध-भैषजही विषच ठरूशकतं,' याच न्यायाने थोड्या प्रमाणात वापरलेला वत्सनाभ आणि अतिविष गुणकारी ठरतात. बाळगुटीत अतिविष समाविष्ट आहे, ते सर्वच बालविकारांवरचा इलाज म्हणून, यामुळेच अतिविषाला 'महौषधी' आणि 'शिशुभैषज' म्हटलं जातं! अकोनिटम् किंवा अकोनाईट नावाचं औषध होमिओपॅथी पद्धतीत तापावरचा उपचार म्हणून वापरलं जातं, तसंच 'त्रिभुवनकीर्ती' या आयुर्वेदीय ज्वरनाशकात बचनाग आहे. बचनाग आणि अतिविष या दोन्ही वनस्पती औषधी गुणांच्या. या दोन्हीची प्रजाती अँकोनिटम्. अँकोनिटम् फेरॉक्स. फेरॉक्स म्हणजे 'भयप्रद.' बचनाग तर अँकोनिटम् हेटेरोफायलम्. हेटेरोफायनमचा अर्थ भिन्न पानं असणारा, म्हणजे 'अतिविष.' वनस्पतीशास्त्रातील या दोन्हीचं आणखी एक नाव म्हणजे 'माँक्स् हूड.' साधारण एक मीटरपर्यंत उंची, पानांची तर्‍हा जातीप्रमाणे, फुलांचा रंगही जातीनुसार, पांढरा, पिवळा; पण सर्वांत देखणी गडद निळ्या-जांभळ्या वर्णाची. त्यांच्यात निदलं, दलं म्हणजे पाकळ्या असा भेदभाव नाही. सगळीच एका वर्णाची, त्यातील एक घटक अतिशय मोठा, उरलेल्या सर्वांना आपल्या अंतरंगात वेढून टाकणारा, त्याची आकृती ख्रिस्ती धर्मगुरूंच्या टोपीसारखी म्हणून याचं नाव मॉक्स् हूड-फणा.
अँकोनिटम् - ग्रीक शब्द 'अकोनिटॉन' हे अँकोनिटम्चं मूळ. 'अँकोन'चा अर्थ 'बाण.' प्राचीन काळापासून अँकोनिटम्चा विषारी स्वभाव ज्ञात होता, त्यामुळे याचे कंद वापरून बाणाची टोकं विषारी केली जात. प्लिनीच्या मते काळ्या समुद्राजवळ 'अँकोन' नावाचं स्थान होतं. हे स्थान म्हणजे अँकोनिटम्ची जन्मभूमी आणि म्हणून नाव अँकोनिटम्. दुसर्‍या एका ग्रीक दंतकथेनुसार 'अँकोनिटस्' नावाचा एक पर्वत होता. 'हक्यरुलस' म्हणजे ग्रीक पुराणकथेतील भीमाचा अवतार. त्याचं आणि सेरबेरस नावाच्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचं तुंबळ युद्ध अँकोनिटस् पर्वतावर झालं. हा तीन डोक्यांचा कुत्रा इकिड्ना ही सर्पकन्या व टायफोन यांचा मुलगा. या कुत्र्याची विषारी लाळ अँकोनिटस् पर्वतावर पडली. ती जिथे पडली तिथे अँकोनिटम् ही वनस्पती जन्माला आली व तिने लाळेचा विषारीपणा आत्मसात केला, त्यामुळेच 'अँकोनिटम् फेरॉक्स' म्हणजे भयावह विष.

ZIP Chains , झिप चेन

ZIP Chains , झिप चेन


सवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात नवनव्या प्रकारचे कपडे अस्तित्वात आले. त्यामुळे हे कपडे अंगावर नीट बसावेत आणि अंगावरून झटपट काढता यावेत, अशा सोयींचे बरेच शोध लागले.
आपल्याकडे जशी बाराबंदी असायची, तसेच अनेक बंद बांधायचे कपडे युरोपातही वापरले जात. अगदी श्रीमंत व्यक्ती शिंपले आणि त्यापेक्षाही धनिक असलेले लोक हस्तिदंताची बटणे सतराव्या शतकात वापरत असत. त्याचं प्रमाण अर्थातच फार कमी होतं.
पुढं लाकडी बटणे आणि काजांचा जमाना आला. आकडी म्हणजे हुक आणि अडणी म्हणजे लूप, हे स्त्रियांचे कपडे बंद करण्यासाठीचे साधन मानले जाऊ लागले. धातुशास्त्रात जशी प्रगती झाली, तशी धातूंची बटणे आली. त्याचबरोबर एकमेकांत अडकणारे दाते तयार केले गेले. दाबून बसवायची 'टिच' बटणे आली. पण, ही एक एक करून लावावी लागत असत. त्यामुळे थोडी त्रासदायक वाटत.
व्हिटकोंब जुडसन या अमेरिकनाने बुटांसाठी सर्वप्रथम एकात एक घट्ट बसणार्‍या दात्यांचे क्लास्प लॉकर बनवले; पण थोडा ताण पडताच हे सुटत असत. १९१३मध्ये गिडीअन सुंडस्टॉर्म याने या दात्यांना एका झटक्यात एकत्र आणून एकमेकांत अडकवणारी सरक चावीची सोय बनवली. या चेनचे दाते एका पट्टीवर बसवले होते. चेनची सरक चावी सरकवताना होणार्‍या आवाजामुळं या सुविधेला झिप चेन किंवा झिप फासनर असं म्हणण्यात येऊ लागलं. प्लॅस्टिकच्या जमान्यात धातूच्या ऐवजी प्लॅस्टिक झिप अवतरल्या. त्या स्वस्त असल्यामुळे लोकप्रिय झाल्या. आता तर या चेन कपड्यांशिवाय पिशव्या, बूट, बॅगा, लहान लहान मनीपर्स यांसाठीही वापरल्या जातात. 

फूलपाखरांचे अद्भुत स्थलांतर

फूलपाखरांचे  अद्भुत स्थलांतर


वर्षी पानगळीच्या ऋतूमध्ये कोट्यवधी मोनार्क फूलपाखरे कॅनडा आणि अमेरिकेच्या ग्रेट लेक्स भागातून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ती ३,२00 किलोमीटर प्रवास करून हिवाळ्यात मध्य मेक्सिकोत पोहोचतात. हे एक नैसर्गिक आश्‍चर्य आहे; कारण आदल्या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या फूलपाखरांमध्ये ५ पिढय़ांचे अंतर असते. तरीही ही फूलपाखरे ठराविक ठिकाणी वास्तव्यास जातातच; पण ती वर्षानुवर्षे खरे म्हणजे हजारो वर्षे ठाराविक मार्गानेच जातात. ठराविक झाडांवरच वाटेत वास्तव्यास उतरतात. त्यांच्यामुळे आकाश काळवंडून जाते, असे त्यांचे ढग विहरत असतात. ठराविक तारखेला ती ठराविक ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे आता त्यांचा मार्ग पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.

Computer Hackers हॅकरचे उद्देश

Computer Hackers  हॅकरचे उद्देश


बर्‍याचदा हॅकरना आपले ज्ञान किती प्रगत झाले आहे, किती अवघड आणि मोठय़ा सर्व्हरमध्ये आपण शिरू शकतो, याचा अंदाज घ्यायचा असतो. आपले ज्ञान आणि बुद्धी अशा प्रकारे अजमावून पाहण्याची, त्यातून थ्रिलिंग व समाधान मिळविण्याची त्यांची इच्छा असते. मात्र, यासाठी संगणकशास्त्राचे चांगले ज्ञान, भरपूर वेळ आणि कमालीचा संयम त्यांना ठेवावा लागतो.
हॅकरचा इतिहास पाहिला, तर त्यात शाळकरी मुले व कोवळे तरुण यांचा भरणा दिसतो. किती तरी शाळकरी वयाचे हॅकर वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडल्याची, तुरुंगात संशयास्पद स्थितीत मरण पावल्याची उदाहरणे आहेत.
जॉन द रीपरसारखी टुल्स आता कालबाह्य झाली आहेत. ती वापरून पासवर्ड क्रॅक होण्याची शक्यता आता फारच दुरापास्त आहे. बर्‍याचदा तीनदा चुकीचा पासवर्ड टाइप केल्यानंतर तुमचा पासवर्ड लॉक करण्याची पद्धत बँका किंवा तत्सम संस्थांच्या वेबसाईटवर आजकाल दिसते. यामागील कारणही सुरक्षा हेच आहे.
आता अनेक बुद्धिमान हॅकर हे सरकारच्या वा मोठय़ा कंपन्यांच्या सेवेत सल्लागार म्हणून गेलेले दिसतात. एके काळी एफबीआयच्या टेन मोस्ट वाँटेड लीस्टमध्ये असलेला भारी हॅकर केविन मिटनीकदेखील आता सल्लागारी पेशात आहे.  

असा होतो पासवर्डहॅक | Computers Password Hacking

असा होतो पासवर्डहॅक | Computers Password Hacking 

जगातील संपूर्ण संगणकीय व्यवस्था 'पासवर्ड' पद्धतीवर आधारलेली आहे. डेबिट कार्डाचा पिन क्रमांक हादेखील एक प्रकारचा पासवर्डच असतो. ऐतिहासिक काळात किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठीचा परवलीचा शब्द शत्रूच्या हातात पडणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली जात असे. शत्रूने परवलीचा शब्द मिळविला आणि बेकायदेशीरपणे किल्ल्यावर प्रवेश केला, असे उदाहरण इतिहासात फारसे सापडत नाही.
आज मात्र अगदी सर्रास पासवर्ड पळविला जातो. याचे कारण तंत्रज्ञानाचा ज्याला गंधही नाही, प्रोग्रॅमिंग कशाशी खातात, हे ज्याला कणभरही माहीत नाही असा माणूसही तुमचा पासवर्ड मिळवू शकतो. त्यासाठी त्याने कॉम्प्युटर सायन्स शिकलेले असण्याची किंवा तो बुद्धिमान असण्याची गरज नाही.
जगातला सर्वांत गाजलेला अमेरिकन हॅकर म्हणजे केविन मिटनीक. एफबीआयच्या तपास यंत्रणेला जे पहिले १0 मोस्ट वाँटेड गुन्हेगार होते, त्यांत केविन मिटनीक हा होता. १९९४-९५च्या सुमारास त्याने काही टेलिफोन कंपन्यांच्या संगणकीय सिस्टीमचे पासवर्ड हॅक करून त्यांचा दुरुपयोग करून शेकडो टेलिफोन (नंतर मोबाईल सेवेचीही) कनेक्शन दिली होती. अनेक महिने केविन मिटनीक फरारी होता. नंतर तो पकडला गेला. त्याची शिक्षा पूर्ण होऊन जेव्हा तो बाहेर पडला, तेव्हा त्याने ं१्रं'>अ१३ ा ीिूीस्र३्रल्ल /ं१्रं'>नावाचे पुस्तक लिहिले. या आणि त्याच्या इतर पुस्तकांमध्ये केविनने मुद्दा मांडला, की बहुतेक वेळा त्याने तंत्रज्ञानापेक्षा मानवी कौशल्यांचा उपयोग करूनच पासवर्ड मिळविले होते. एका टेलिफोन कंपनीच्या ऑपरेटर तरुणीशी त्याने सूत जमविले आणि तिने आपल्या प्रियकराला (म्हणजे केविनला) कंपनीचा पासवर्ड 'प्रेमपूर्वक' अर्पण केला.
पासवर्डच्या बाबतीत आता खूपच जागरूकता आली आहे; पण तरीही आजदेखील विशेषत: अशा लाखो महिला आहेत, की ज्यांचा पासवर्ड म्हणजे त्यांच्या मुलाचे नाव असते; फार तर मुलाचे नाव आणि त्याचे जन्मवर्ष असते. हॅकरगिरी करण्याची हौस असणारा कुणीही बिनडोक माणूस हे नावांचे पासवर्ड 'ट्राय' करून पाहत असतो. काही जण आपला फोन नंबर पासवर्ड म्हणून ठेवतात. असे साधे पासवर्ड मिळविण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे लागत नाही.
खूपदा 'ं१्रं'>ऋ१ॅ३३ील्ल ढं२२६१ि/ं१्रं'>'साठी 'सिक्रेट क्वेश्‍चन'ची व्यवस्था असते. या गुप्त प्रश्नाचे अचूक उत्तर दिले, की आपण विसरलेला पासवर्ड आपल्याला परत मिळतो. बर्‍याचदा असे घडते, की ं१्रं'>हँं३ ्र२ ८४१ े३ँी१२ ें्रीिल्ल ल्लेंी?/ं१्रं'> असा प्रश्न असतो. समजा त्या प्रश्नाचे उत्तर ं१्रं'>ं२ँ िं/ं१्रं'>हे असेल, तर ते मिळविणे फारसे अवघड नसते. एकाने चक्क आजीलाच तिचे माहेरचे नाव विचारले आणि तिच्या मुलाचा ई-मेल पासवर्ड 'ं१्रं'>ऋ१ॅी३ ढं२२६१ि/ं१्रं'>' सुविधा वापरून मिळविल्याचे उदाहरण घडलेले आहे.
पण, आता पासवर्डच्या बाबतीत जागरूकता असल्याने मोठे पासवर्ड, त्यात अप्पर-लोअर केस अक्षरे, आकडे, काही सांकेतिक खुणा वगैरे यांनी युक्त असे पासवर्ड असतात. असे पासवर्ड कोणी कितीही संगणकतज्ज्ञ असला, तरी तोडू शकत नाही. त्यामुळेच पासवर्ड हॅकिंगची उदाहरणे आता खूपच कमी झाली आहेत. भारतातील एका फार मोठय़ा युद्धविषयक शासकीय यंत्रणेचा पासवर्ड होता अठं१्रं'>रक. /ं१्रं'>हा पासवर्ड एका किशोरवयीन अमेरिकन मुलाने तंत्रज्ञानाचा वापर करून तोडला. या मुलाने 'जॉन द रीपर' नावाचे मोफत उपलब्ध असलेले एक सॉफ्टवेअर त्यासाठी वापरले. पासवर्ड क्रॅकिंगसाठी हे सॉफ्टवेअर त्या काळात लोकप्रिय होते. हे सॉफ्टवेअर तो पासवर्ड म्हणजे एखादा शब्दकोशातला शब्द आहे का, हे तपासून पाहते. समजा जर पासवर्ड म्हणून इीं१्रं'>ं४३्रा४' ह/ं१्रं'>ा शब्द असेल, तर सॉफ्टवेअरला तो सापडत असे. पासवर्ड क्रॅकिंगची ही डिक्शनरी पद्धत वापरात असल्याचे समजल्यानंतर लोकांमध्ये जागरूकता आली आणि डिक्शनरीतले शब्द पासवर्डसाठी वापरणे खूपच कमी झाले.
सॉफ्टवेअर वापरून पासवर्ड तोडण्याची दुसरी पद्धत म्हणजे इ१४३ं१्रं'>ी ा१ूी. य/ं१्रं'>ात पासवर्डमधील प्रत्येक अक्षर कोणते आहे, हे तांत्रिक पद्धतीने तपासले जाते. वर उल्लेख केलेला अठरकं१्रं'> हा /ं१्रं'>पासवर्ड याच ब्रुट फोर्स पद्धतीने तोडण्यात आला होता. ब्रुट फोर्स पद्धत फार सरळ आणि साधी आहे. इंग्रजीत २६ कॅपिटल अक्षरे आणि २६ लोअर केस अक्षरे आहेत. याखेरीज, साधारणत: पासवर्डमध्ये वापरली जातील अशी , ं१्रं'>, वगै/ं१्रं'>रे आणखी काही चिन्हे व १0 अंक आहेत. त्यांच्याबाहेर पासवर्डमध्ये इतर काहीही नसते. अठरकं१्रं'> या /ं१्रं'>चार अक्षरी पासवर्डचे पहिले अक्षर अ आं१्रं'>ह/ं१्रं'>े की आणखी काही, हे तपासण्यासाठी त्या शाळकरी मुलाला फक्त काही मिनिटे लागली. काही तास जॉन द रीपर सॉफ्टवेअर नेटाने चालू ठेवल्यानंतर त्याला अठरकं१्रं'> हा /ं१्रं'>पासवर्ड मिळाला. तो वापरून भारताच्या एका फार मोठय़ा शासकीय यंत्रणेच्या सर्व्हरमध्ये त्याला शिरता आले. या निष्पाप मुलाने तो पासवर्ड पुढे एका फोरमवर प्रसिद्ध केला. यातूनच पुढे त्या शासकीय यंत्रणेची वेबसाईट इतर हॅकरनी हॅक केली आणि त्यावर भारताविरुद्ध संदेश प्रकाशित केला.
अशा घटनांमधूनच शिकता येते. त्यामुळेच आता पासवर्ड केवळ ३-४ अक्षरांचा न ठेवता तो किमान ८-१0 अक्षरांचा ठेवला जातो. त्यातही डिक्शनरीतील शब्द न वापरता काही तरी वेगळी अक्षररचना केली जाते. त्यात आकडे, ं१्रं'> यास्/ं१्रं'>ारखी चिन्हे, तसेच अप्पर-लोअर अक्षरांचा अंतर्भाव करतात. असे मोठे पासवर्ड जॉन द रीपर (खँल्लं१्रं'> ३ँी १्रस्रस्री१) सार/ं१्रं'>खी पासवर्ड क्रॅकिंग टुल्स वापरून तोडणे निव्वळ अशक्य असते. कित्येक दिवस प्रयत्न करीत राहूनही असे मोठे पासवर्ड क्रॅक होत नाहीत.
पासवर्ड मिळविण्यासाठी वापरली जाणारी आणखी एक पद्धत म्हणजे कीस्ट्रोक लॉगिंग. पासवर्ड जेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावर टाइप करता, तेव्हा तुम्ही अर्थातच काही बटणे दाबता. तुम्ही कोणती बटणे दाबलीयत, याचे रेकॉर्ड गुप्तपणे नोंदवणारी स्पायवेअर असतात. त्यांना 'स्पाय' वेअर असे म्हटले जाते ते अगदी अर्थपूर्ण आहे. अशी स्पायवेअर आपले पासवर्ड, पिन नंबर चोरू शकतात. त्यासाठीच आपला संगणक किंवा मोबाईल हा चांगल्या अँटि-व्हायरस व अँटी-स्पायवेअर सॉफ्टवेअरने युक्त असायला हवा.

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती Bluetooth Details in Marathi

ब्लू टूथचा शोध एरिक्सन कंपनीने सन १९९४मध्ये लावला. आता ब्लू टूथमध्ये सुधारणा करण्याचे काम ब्लू टूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप करीत आहे. एरिक्सन, इंटेल, आयबीएम, मोटोरोला, नोकिया, लेनिवो, मायक्रोसॉफ्ट, तोशिबा या कंपन्या या ग्रुपच्या सदस्य आहेत. ब्लू टूथ आता नवीन व वेगवान जनरेशनमध्ये येत आहे. त्याचा वापर त्यामुळे आता अधिक प्रमाणात होऊ लागेल. ब्लू टूथबद्दल मजेदार माहिती 'ब्लू टूथ' या तंत्रज्ञानाचे नाव डेन्मार्कच्या 'हेरल्ड ब्लू टूथ' नावाच्या मध्ययुगीन राजाच्या नावावरून दिले गेले. तो सत्तेवर येण्यापूर्वी डेन्मार्कमधील सर्व लहान राज्यांचे आपापसातील संबध बिघडले होते. हेरल्डच्या कर्तबगारीमुळे या लहान राज्यांचे संबंध चांगले झाले व सगळे एकत्रित आले. संबंध जुळवण्याच्या व वाढवण्याच्या हेरल्डच्या या वैशिष्ट्यामुळे या तंत्रज्ञानाला त्याचे नाव बहाल केले. तेच आता सर्वत्र रूढ झाले आहे.
र्ट मोबाईलचा अविभाज्य भाग म्हणजे ब्लू टूथ. स्मार्ट फोनमध्ये असलेली गाणी, चित्र व माहिती मित्रांना देताना ब्लू टूथचा उपयोग होतो. ब्लू टूथच्या प्रसिद्धीचे मुख्य कारण म्हणजे ते वायरलेस असते व माहितीची देवाणघेवाण करताना कसलाही आर्थिक भार पडत नाही.
ब्लू टूथ यंत्र १ ते ३ मिलिवॉट इतक्या कमी क्षमतेचे संकेत एकमेकांना पाठवतात. त्यामुळे १0 मीटरच्या क्षेत्रफळापर्यंत ते दुसर्‍या यंत्राशी बोलू शकतात. यातून एका मोबाईलद्वारे दुसर्‍या मोबाईलबरोबरच संपर्क साधता येतो असे नाही, तर एका मोबाईलमधून दुसर्‍या स्पीकर किंवा अन्य यंत्रांबरोबरही संपर्क साधता येतो. यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपत नाही व दुसरे असे, की १0 मीटरपर्यंत तिसर्‍या यंत्राशी चुकूनही कनेक्ट होत नाही.
आता नव्या प्रकारात ब्लू टूथ यंत्र किंवा आपला मोबाईल एका वेळी इतर ८ यंत्रांशी कनेक्ट होऊ शकतो. हे 'स्पेशल स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी होपिंग' या तंत्रामुळे होते. यात मोबाईल दुसर्‍या यंत्रांना पाठविण्यात येणार्‍या फ्रिक्वेन्सी दर सेकंदाला १,६00 वेळा बदलतो. ब्लू टूथच्या सॉफ्टवेअरमुळे हे शक्य होते. हे सॉफ्टवेअर एका ब्लू टूथ चीपला चालवते. ही चीप म्हणजे एक रेडिओ ट्रान्समीटर असते. ही चीप वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींच्या द्वारे माहितीचे रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करून या लहरी १0 मीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या दुसर्‍या मोबाईल किंवा अन्य यंत्रापर्यंत पोहोचवते. त्या यंत्राने या लहरी समजून त्यातून माहिती काढायची असते. तसे सॉफ्टवेअर म्हणजे ब्लू टूथ त्या यंत्राला असतेच. या लहरींचे त्या यंत्रांकडून माहितीत अथवा चित्रात रूपांतर होते. या प्रकारे गाणी व चित्र एका मोबाईलमधून दुसर्‍या मोबाईलला पाठवू शकतो.
मोबाईलमध्ये कॅमेरा, स्पीकर, नोटपॅड अशा अनेक सुविधा आहेत. ब्लू टूथ त्यांपैकीच एक आहे. यामुळे एका मोबाईलवरून दुसर्‍या मोबाईलवर विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करता येते. 3 2 1 ब्लू टूथची तीन वैशिष्ट्ये आहेत.
वायरलेस - ब्लू टूथमुळे कसल्याही तारा, वायर न वापरता लांबपर्यंत माहिती पोहोचविता येते.
वेग - ब्लू टूथ २.४५ गेगाबाईट्सच्या फ्रिक्वेन्सीने माहिती पाठवू शकते.

मुरा मासे (MURA Fish)

मुरा मासे  (MURA Fish)

मुरा मासे  (MURA Fish)
मुरा जातीचे मासे पूर्वी मुळा, मुठा नदीत शहराचा भाग सोडला, तर सर्वत्र मिळत असत. विशेषत: कातकरी जमातीचे स्त्री-पुरुष नदी-ओढय़ामध्ये उभे राहून दोन्ही बाजूने एक पातळ कापड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धरून एकदम उचलतात. या कापडामध्ये झिंगे, मुरे, वाम, माशांची छोटी पिले इत्यादी सापडतात. कातकर्‍यांच्या या मासेमारीच्या पद्धतीमुळे बर्‍याचदा हे मासे कापडाच्या झोळीत जिवंत सापडतात आणि हे मासे  अँक्वारियममध्येसुद्धा व्यवस्थित राहतात. मुरा हा मासा सध्या मात्र मुळा, मुठा नदीत सापडत नाही, तो केवळ वाढलेल्या प्रदूषणामुळे.
मुरा माशाचे शरीर लांबट, दोन्ही बाजूला टोकदार, तोंड वतरुळाकाराचे असते. दोन्ही ओठ एकमेकांशी जोडून हा विशिष्ट वतरुळाकार तयार होतो. त्याचा उपयोग पाण्याच्या तळाशी असलेल्या दगड, खडकावरील शेवाळ खरवडून काढण्यासाठी होत असावा. या माशाच्या वरच्या ओठावर छोटे-छोटे फुगवटे दिसतात आणि खालील ओठ मध्यभागी विभागल्यासारखा दिसल्यामुळे खालील ओठाचे दोन जाडसर भाग दिसतात. या माशाला चार छोट्या मिशा असतात. नाकावरील मिशी तुलनेने छोटी असते. या माशाचे पर विशिष्ट पद्धतीचे आहेत. पाठीवरील पर शरीराच्या मध्यभागी असण्याऐवजी ते तुलनेने डोक्याच्या जवळ असते. खांद्यावरील पर, पोटावरील पर आणि शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीचे काळे ठसे असतात.
पूर्ण वाढ झालेला हा मासा ५.५ ते ६.५ सेंमीपर्यंत लांबीला भरला, तरी वजनाला ३.५ ग्रॅमपर्यंत भरतो. हा अत्यंत छोटा मासा असला, तरी कातकर्‍यांकडे या माशांसाठी खूप मागणी असते. या माशाच्या विणीचा हंगाम मुख्यत्वेकरून ऑगस्ट-सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च असे वर्षातून दोनदा असला, तरी हा मासा वर्षभर अंडी देत असतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. हा मासा २५0 ते १२00पर्यंत अंडी देतो. मुरा मासा मुख्यत्वेकरून अळी, कृमी, कीटक, झुप्लॅक्टन आणि फायटोप्लॅक्टनवर आपली उपजीविका करत असतो. शरीराच्या खालील बाजूकडील परांच्या वर काळ्या रंगाचे ठिपके विशिष्ट पद्धतीने असतात. शरीराचा रंग पिवळसर राखाडी असतो. बिबट्याच्या अंगावर जसे काळे ठसे असतात, तसे या माशाच्या अंगावर विशिष्ट पद्धतीने काळे ठसे असतात. पुण्याजवळच्या बहुतेक नदीनाल्यांमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत विविध प्रकारचे मासे सापडत असत. आता मात्र शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्याने या माशांवर संक्रांत आली आहे. 

कृष्णकमळ

कृष्णकमळ

कृष्णकमळ

ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूने क्रूसावर स्वीकारलेले मरण समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट.
पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य. पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे. संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे अनेक वनस्पती तसेच फुलांना संस्कृतप्रचुर नावे मिळाली आहेत. कृष्णकमळ त्यापैकीच एक आहे. मुळातील ही परदेशी वेल आता पक्की भारतीय झाली आहे. ष्णकमळ! ऊर्फ पॅशन फ्लॉवर. सौंदर्याचा परिपूर्ण आविष्कार. केवळ सौंदर्याचाच नव्हे, तर सुगंधाचा आणि नाजुकपणाचाही! तसं पाहिलं तर कृष्णकमळ हे नामाभिधान जरी अस्सल भारतीय असलं, तरी ही वेल निवासी अ-भारतीय आहे. हिची जन्मभूमी ब्राझील. तिथून भारतात ती कधी पोहोचली? कशी पोहोचली? कुणी आणली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असले, तरी भारतभूमीनं तिला नुसतंच स्वीकारलं नाही, तर थेट भगवंताचं प्रतीकच केलं! कृष्णकमळ ही एक बहुवर्षीय वेल; पण ती एकटीच नाही, तर पॅशन फ्लॉवर-वानसशास्त्रीय नाव पॅसीफ्लोरा या प्रजातीच्या कमीत-कमी चार जाती आपल्या आसपास वाढतात.
कृष्णकमळाची वेल बहुवर्षायू! एकदा कुंपणावर चढली, की अनेक वर्षे सुखानं नांदते, पावसाळ्यात भरभरून फुलते आणि परिसरावर सुगंधाचं साम्राज्य पसरतं. डंख नसलेली, मधमाशीची एक जाती या गंधावर आकर्षित होते. खेरीज फुलामध्ये मकरंदाचा ठेवाही असतोच. म्हणजेच आनंदयज्ञाचं जोरदार आमंत्रण! या वेलीची पानं त्रिखंडी, पानाच्या बेचक्यातून फुटणार्‍या ताणांना आधाराचा स्पर्श झाला, की त्यांची गुंडाळी होऊन आधाराला घट्ट पकडण्याचं काम झालंच. पानांच्या लांब देठाच्या टोकाशी असणार्‍या दोन ग्रंथी हे पानाचं आणखी एक वैशिष्ट्य! प्रत्येक कृष्णकमळाच्या लांब देठाच्या अग्राशी तीन छदांचं वलय असतं. प्रत्येक छद ठसठशीत आकारमानाचा. पाच निदलांचा तळाशी एक पेला आणि नंतर तलम फिकट जांभळ्या पाच पाकळ्या या पाकळ्यांपासून निघतात. असंख्य जांभळे धागे, फुलाचा सर्वांत देखणा भाग-किरीट. नंतर एका चिमुकल्या दांड्यावर पाच पिवळे अधोमुख पुकेसर, त्यांच्या अग्रावर बीजांडकोष. त्यापासून निघणारा आखूड कुक्षीवृंत आणि त्याला फुटलेल्या तीन लांबलचक कुक्षी.
आपण या फुलाला कौरव, पांडव आणि कृष्णाचं प्रतीक समजतो. जांभळ्या धाग्यांचा किरीट म्हणजे कौरव, पाच पुकेसर म्हणजे पांडव आणि बीजांडकोष अर्थात्च कृष्ण.
ख्रिस्ती बांधव याच फुलाला भगवान येशूचं क्रूसावर लटकणं समजतात. वेलाचे ताण म्हणजे येशूवर उगारलेला आसूड, किरीट म्हणजे येशूच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट; पाच निदले आणि पाच दले म्हणजे येशूचे दहा शिष्य पीटर आणि ज्युडास या दोघांनी अखेरीस येशूला नाकारले होते. पाच पुकेसर म्हणजे पाच जखमा आणि तीन कुक्षी म्हणजे मस्तकावर मारलेले तीन खिळे.
आपल्याकडच्या कृष्णकमळाचं आयुष्य एकाच दिवसाचं; पण काही कृष्णकमळं तीन दिवस टिकतात. येशूला क्रूसावर लटकवलं शुक्रवारी, तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, त्याचं पुनरुत्थान झालं 'ईस्टर डे'ला म्हणजे रविवारी, तीन दिवस टिकणारं कृष्णकमळ म्हणूनच येशूचही प्रतीक आहे.

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन


'पहिली ते आठवी परीक्षा बंद' असा नियम निघाला आणि विविध शिक्षणतज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली.. काहींनी त्यावर प्रखर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी (बळजबरीने) स्वागत केले. जागतिकीकरणाच्या बदलांमध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. 'शालेय पातळीवर परीक्षा नको' हा त्यापैकीच एक बदल. प्रचलित परीक्षा पद्धत खरंच सर्वोत्कृष्ट आहे की नाही, वा त्याला उपलब्ध असलेले पर्याय यांवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.

माझ्या मते, 'विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट परीक्षा पद्धतीतून क्वचितच सफल होते. परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्‍यात बदाबदा माहिती ओतणे म्हणजेच 'शिकवणे' आणि ती माहिती जशीच्या तशी परीक्षेमध्ये उतरवणे म्हणजे 'ज्ञानप्राप्ती'! यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीत विधाने, व्याख्या, नियम यांची घोकंपट्टी रुजली. विज्ञानात प्रयोगांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही प्रयोगांना विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनविण्याची गरज वाटली नाही.

सर्वसाधारणत:, 60 संख्या असलेल्या आपल्या वर्गांमध्ये एक-दोन विद्यार्थी उत्तम आकडेमोड अथवा स्मरणशक्तीच्या जोरावर परीक्षेत गुण मिळवित असतील, तर त्यांना आपल्याकडे 'हुशार' मानले जाते आणि इतर विद्यार्थी 'सर्वसाधारण' किंवा 'ढ' म्हणून विभागले जातात. स्मरणशक्ती किंवा उत्तम आकडेमोडीच्या आधारावर केलेली विभागणी 'सर्वसाधारण' व 'ढ' समजल्या गेलेल्या मुलांसाठी धोकादायक होऊ शकते. 'तारें जमीन पर'मधली 'एव्हरी चाईल्ड इज स्पेशन' ही आमीर खानने मांडलेली संकल्पना आपल्या प्रचलित परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये कुठेच समाविष्ट होत नाही.

चाकोरीबद्ध, शिस्तीच्या बडग्याखालची आणि परीक्षाकेंद्रीत पद्धत विद्यार्थ्यांची खरी जिज्ञासा वाढविते का? विद्यार्थी हे खरंच जिज्ञासू असतात. सलग पाच वर्षे परदेशात शालेय शिक्षक म्हणून काम केल्यावर मला आपली विज्ञान शिक्षण पद्धती आणि आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला. आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी फक्त परीक्षा हेच एक माध्यम नाही. परीक्षा पद्धतीला पर्याय काय आणि कसा, याचा उहापोह करण्यासाठीच हा लेख..

दहावी, बारावी बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई याप्रमाणेच शिक्षणक्षेत्रात 'आयबी' (International Baccalaureate) हे नवीन बोर्ड उदयास आले आहे. त्याची सुरवात स्वित्झर्लंडमध्ये झाला. सध्या भारतामध्येही पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्लीमध्ये काही प्रमाणात या 'आयबी' शाळा आहेत. या 'आयबी' शाळा आणि त्यांच्या विज्ञान शिक्षण पद्धतीची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ.

'प्रचलित परीक्षा पद्धतीला पर्याय' या विचारातून 'आयबी'ची सुरवात 1982 च्या दरम्यान झाली. गेल्या 30 वर्षांत चीन, मलेशिया, जपान आणि आफ्रिकेतील देशांत 'आयबी' शाळांची संख्या वाढत आहे. 'आयबी'मध्ये विज्ञान शिक्षणाची एक विशिष्ट चाकोरी आढळून येत नाही. शिक्षकांना इतर विषयांतील आंतरसंबंध जाणीवपूर्वक साधावा लागतो. 'इतिहासातील विज्ञानाची परिस्थिती' यावर मुलांना खोलवर संशोधन करण्याची मुक्तता आहे. उदाहरणार्थ, '15 व्या शतकातील महिला मासिक पाळीत आपल्या शरीराची वैज्ञानिक पद्धतीने कशी काळजी घेत होत्या' ही इयत्ता सातवीच्या वर्गासाठी संशोधनांतर्गत परीक्षा होती. वर्गातील विद्यार्थ्यांच्या गटाने इंटरनेटच्या मदतीने विविध स्रोतांद्वारे माहिती संकलित केली आणि त्याचे सविस्तर विश्‍लेषण करून त्याचे दिलेल्या वेळेत उत्कृष्ट सादरीकरण केले. गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला काहीतरी काम आले पाहिजे, ही त्या परीक्षेमधील सर्वांत महत्त्वाची अट होती. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नियोजन, कामाची विभागणी, तर्कशुद्ध विचार करणे, सृजनशीलता ही आणि इतर अनेक मूल्ये अप्रत्यक्षरित्या विज्ञान विषयातून शिकविली जातात. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाच्या कामाचे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांनी केलेले कामाचे नियोजन, सादरीकरण, तर्कशुद्ध विचार, कामाची विभागणी आणि सृजनशीलता या पातळ्यांवर केले गेले.

विज्ञान शिक्षणात प्रयोगाचे महत्त्व असल्याने 'आयबी' शिक्षणात प्रयोगाला फारच वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येते. आमच्या शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून प्रयोगाची आखणी करतात, निरीक्षणाची खातरजमा करतात व चर्चाही करतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्रयोगवहीत छापलेले प्रयोग करून घेण्याचा अट्टाहास या 'आयबी' शाळांमध्ये मुळीच नसतो. उदाहरणार्थ, इयत्ता सहावीच्या वर्गात सूक्ष्मजीव शिकवताना आम्ही चक्क 'यीस्ट' सूक्ष्मजीव वापरून ब्रेड बनविण्याचाच प्रयोग करण्याचा बेत आखला. प्रत्येक गटाने वेगवेगळी गृहितके मांडली आणि त्याप्रमाणे काम केले. काम संपल्यानंतर, म्हणजेच प्रयोग झाल्यानंतर आपापले निष्कर्ष तपासून पाहिले. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाने मांडलेली गृहितके, कामाची विभागणी, ब्रेडचा दर्जा आणि प्रत्येक गटाला आलेले निष्कर्ष या पातळ्यांवर मूल्यमापन केले गेले. या परीक्षेमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट झाली, ती विद्यार्थ्यांनी शेवटी आपण स्वत:च तयार केलेले ब्रेड खाल्ले. हे सारे करताना साहजिकच विज्ञान विषय आव्हानात्मक, जिवंत आणि सृजनात्मक आनंद देणारा ठरतो.

'आयबी' शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एखादे मत स्वीकारण्याची व नाकारण्याची रीत यांच्याशीही ओळख करून दिली जाते. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी तयार होते. यासाठीच 'आयबी' शाळांमध्ये मूल्यशिक्षण आणि त्यासाठी स्वतंत्र तास नसतात. 'आयबी' शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठरविलेल्या व्यक्तिमत्वामधून वाढविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. ही ठरविलेली व्यक्तिमत्वे किंवा 'प्रोफाईल्स' पुढीलप्रमाणे :

(Caring) जाणीव, (knowledgeable) ज्ञानात्मक, (Thinker) विचारवंत, (Principled) तत्ववादी,(Responsible) जबाबदार, (Communicator) संवाद साधणारा.

प्रत्येक विषयातील विविध प्रकारच्या परीक्षांमधून (ज्यात आपल्यासारख्या प्रचलित परीक्षा अभावानेच असतात) वर नमूद केलेल्या 'प्रोफाईल्स' साधण्याचे एक रंजक आव्हान शिक्षकासमोर असते. 'आयबी' शिक्षणाची सर्वांत महत्त्वाची आणि जमेची बाब म्हणजे विद्यार्थ्याला 'ग्लोबल नागरिक' बनविण्याचा प्रयत्न. प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा हा जागतिक पातळीचा विचार करून शिकवावा लागतो. हेदेखील 'आयबी' शिक्षकांसमोर एक मोठे आव्हान असते.

भविष्यकाळ हा नेहमीच आजच्या लहान मुलांचा असतो. कारण, आज शिकणारी मुले दहा-पंधरा वर्षांनी मोठी होणार आहेत. ती स्वबळावर शिकू शकली नाहीत, तर नजरेपलीकडच्या भावी प्रश्‍नांना समर्थपणे कशी भिडू शकतील? त्यांच्याबाबत आपुलकी असेल, तर त्यांना शिकवणाऱ्या आणि त्यांची जिज्ञासा चेतावणाऱ्या वेगळ्या विज्ञान शिक्षणाला पर्याय नाही. अशी जिज्ञासा चेतावणाऱ्या आणि परीक्षा-विरहीत शिक्षणपद्धतीत मला परदेशातील विद्यार्थ्यांनी आजवर विचारलेले प्रश्‍न खरंच मजेशीर होते. उदाहरणार्थ :

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात गुरुत्वाकर्षणशक्ती नसताना अन्ननलिकेतून अन्न पोटाकडे कसे जाते? (धडा : पचनसंस्था)

दुसऱ्या गुदगुल्या केल्या, की हसू येते; पण स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या, तर हसू येत नाही का? (धडा : ज्ञानेंद्रिये)

स्वत:चा रेकॉर्ड केलेला आवाज इतरांना योग्य वाटतो; पण स्वत:ला नाही. असे का? (धडा : ध्वनी)

एखाद्या 'एचआयव्ही'ग्रस्त रुग्णाला डास चावला, तर डासाला 'एचआयव्ही'ची लागण होते का? नसेल, तर का नाही? (धडा : रोग)

अशा पद्धतीने रंजक विज्ञान शिक्षण देण्याचा प्रयत्न 'आयबी' करत आहे. वर नमूद केलेले प्रयोग व मूल्यमापनाच्या पद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला निश्‍चितच आत्मविश्‍वासू बनवितात. परीक्षा पद्धत नसल्याने सर्वसामान्य विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नाराज होत नाही आणि शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो. त्यामुळे मला माझ्या 'आयबी' शाळांमध्ये आजवर आलेल्या अनुभवांमुळे विज्ञान शिक्षणात बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा भाग बनल्याचा थोडा अभिमान वाटत आहे.