Blogroll

पायथागोरस पहिला गणिती

पायथागोरस  पहिला गणिती

पायथागोरस पहिला गणिती


गणिताची आवड आणि जाण असणार्‍या या शास्त्रज्ञाचे इतर विचार मात्र खूपच काल्पनिक आणि मजेशीर असल्याचे दिसून येते. असे असले तरी पायथागोरस यांनी गणिताला दिलेले योगदान हे चिरकाल टिकणारे आहे.
स्त पूर्व काळामध्ये जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यामध्ये पायथागोरस यांचे महत्त्वाचे स्थान आहे. पायथागोरस यांचे जीवन आणि कार्य हे अनेक अद्भुत, त्याचप्रमाणे विज्ञानविषयक घटनांनी भरलेले आहे. पायथागोरस हे शास्त्रज्ञ त्यांच्या त्रिकोणाविषयीच्या सिद्धांतामुळे सर्वांना परिचित आहेत. 'कर्ण वर्ग +पाया वर्ग = उंची 'वर्ग' हे सूत्र विद्यार्थ्यांना तोंडपाठ असते. हा सिद्धांत इसवी सन पूर्व ५00 वर्षांपूर्वी मांडला गेला. त्यामुळेच पायथागोरस यांना पहिला गणिती म्हणून संबोधले जाते. या सूत्राबरोबरच त्यांनी त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोनाएवढी असते, त्याचप्रमाणे बहुभूज आकृतीच्या आंतरकोनाची बेरीज ही दोन-चार काटकोन एवढी असते, असे प्रतिपादन केले.
पायथागोरस यांचा राजकीय घटनांमध्ये सहभाग होता. त्यासाठी त्यांना इजिप्तला जावे लागले. मात्र, संशोधन आणि अभ्यास करण्याची त्यांची इच्छा थोडीही कमी झाली नाही. त्या काळी अभ्यासकेंद्रे ही बहुधा मंदिरांमध्ये असत. मात्र, पायथागोरस यांना प्रयत्न करूनही मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. याचे कारण मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी विशिष्ट अटींचे पालन करावे लागे. खूप प्रयत्नानंतर त्यांना डायस कॉलीस येथील मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. मात्र, त्यासाठी मंदिराच्या सर्व अटी मान्य करून घ्याव्या लागल्या. आपल्या अस्तित्वाचे मूळ हे गणितावर आधारित आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांचा कल हा आध्यात्मिक बाबींकडे असल्यामुळे आत्म्याचे उत्थान करून दैवी शक्तींचे मीलन घडवून आणता येईल, अशी त्यांची धारणा होती.
पायथागोरस यांच्या निरनिराळ्या अंकांबाबत काही कल्पना होत्या. '१' अंक हा कार्यकारण भावाशी निगडित आहे, असे त्यांचे मत होते. '२' ही सम संख्या असून, हा स्त्रीत्वाशी संबंधित अंक आहे, अशी त्यांची धारणा होती. मत प्रदर्शनाशीही या अंकाचा संबंध त्यांनी लावला. '३' आकड्याचा संबंध पुरुषत्वाशी असून, तो साधम्र्यता दर्शवितो, असे त्यांचे मत होते. '४' अंक न्याय दर्शवितो. '५' अंकाचा विवाहाशी संबंध आहे.
'६' अंक निर्मितीशी संबंधित आहे, असे त्यांचे मत होते. त्याचप्रमाणे '१, ३, ६, १0 आणि १५' हे अंक त्रिकोणाशी संबंधित आहेत, तर १, ४, ९, १६ आणि २५ या अंकाचा संबंध चौरसाशी आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

व्हॅसलीन vaseline पेट्रोलियम जेली

व्हॅसलीन vaseline पेट्रोलियम जेली



पेट्रोलियम जेली, पांढरे पेट्रोलियम किंवा सॉफ्ट पॅराफिन असेही म्हटले जाते. पूर्वी व्हॅसलीनचा उपयोग त्वचाविकारांसाठी केला जात असे.
व्हॅसलीन हे तेलविहिरीतून सापडणार्‍या कच्च्या तेलाचे शुद्ध स्वरूप आहे. १८५९ मध्ये अमेरिकेतील पेन्सीलव्हिया राज्यातील टिटूसव्हिले या ठिकाणी तेलविहीर खणताना अनपेक्षित असा काळपट रंगाचा घट्टसर द्रव बाहेर आला. कामात अडथळा आणणारा तो द्रव कामगारांना आवडेनासा झाला होता; परंतु कामगारांच्या जखमांवर तो द्राव लावल्यावर जखमा भरून आल्या, तसेच वेदनाही कमी झाल्या. तेलावर संशोधन करणारे तरुण शास्त्रज्ञ रॉबर्ट चेसब्रफ यांनी कच्चे तेल शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. टिटूसव्हिले येथे सापडलेल्या या नवीन तेलात नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रॉबर्ट चेसब्रफ तेथे गेले व त्यांनी विहिरीत सापडलेला काळसर द्रव पदार्थशुद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत आणला. 
निर्वात ऊध्र्वपातन प्रक्रियेने काळपट द्रवाचे शुद्ध स्वरूपातील पांढर्‍या घट्ट जेलीत (तैलीय पदार्थ) रूपांतरित झाले. ती जेली त्यांनी हाडाच्या चुर्‍यातून गाळून घेतली. १८७0 मध्ये रॉबर्ट चेसब्रफ यांनी या जेलीचे पेटंट घेतले व जेलीच्या विक्रीसाठी न्यूयॉर्क शहरात जाहिरातीद्वारे प्रचारही केला; पण जेलीची फारशी विक्री झाली नाही.
रॉबर्ट यांनी मग स्वत:च्या हाताची त्वचा अँसिडने जाळली. ही जळलेली-भाजलेली त्वचा रॉबर्ट यांनी व्हॅसलीनने बरी केली. अशा प्रकारे रॉबर्ट यांनी लोकांना व्हॅसलीनकडे वळवले. त्यानंतर १८७२ मध्ये त्यांनी ब्रुकलीन येथे व्हॅसलीनचा पहिला कारखाना सुरू करून मोठय़ा प्रमाणात व्हॅसलीनचे उत्पादन सुरू केले.
विविध सौंदर्यप्रसाधनात, मलमांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जाणारे व्हॅसलीन हे हायड्रोकार्बनचे मिश्रण असून, त्याचा वितलन बिंदू हा मानवाच्या शरीर तापमानाएवढाच म्हणजे ३७ अंश से. इतका आहे. थोड्याशा उष्णतेतूनही या जेलीचे ज्वलन होऊन तिचे वाफेत रूपांतर होते. 
शुद्ध स्वरूपातील जेली ही रंगहीन व गंधहीन असते. हवेच्या किंवा कोणत्याही रसायनाच्या संपर्कात आल्यावर जेलीत कोणतीही प्रक्रिया घडून येत नाही. व्हॅसलीन पाण्यात विरघळत नसले, तरी डायक्लोरो मिथेन, क्लोरोफॉर्म, बेन्झीन, डायइथाईल, इथर, कार्बन डाय सल्फाइड आणि ऑईल ऑफ टर्पेन्टाइनमध्ये मात्र ते विरघळते.
व्हॅसलीन आणि ग्लिसरीन हे दर्शनी सारखे दिसत असले आणि दोन्हींचे कार्य त्वचेचा ओलावा टिकवणे हे असले, तरी त्यांचे मूलभूत गुणधर्म परस्परविरोधी आहेत. व्हॅसलीन हे हायड्रोकार्बन हायड्रोफोबिक असून, ते पाण्यात विरघळत नसून ते ध्रुवीयही नाही.
याउलट ग्लिसरीन मात्र हायड्रोकार्बन नसून, अल्कोहल आहे. तसेच, ते हायड्रोफिलिक म्हणजेच पाण्याला आकर्षित करणारे आहे. व्हॅसलीन हे पृष्ठभागाला घट्ट चिकटणारे असल्याने अजैविक पदार्थांपासून ते वेगळे करता येत नसले, तरी ते पेन्ट थीनर किंवा अँसिटोनमध्ये विरघळते.

भन्नाट गाड्या New Cars Technology

 भन्नाट गाड्या New Cars Technology



एका अनोख्या वाहनाचीदेखील प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती सुरू आहे. या वाहनाला 'म्युझिक कार' असे म्हणतात. गाडीमधील स्टिरिओवर चालक ज्या प्रकारचे संगीत वाजवेल, त्यानुसार या कारचा रंग बदलतो. तसेच, 'स्मार्ट की' च्या मदतीने ही कार सुरू करता येते. आणि 'स्मार्ट फोन' च्या साहाय्याने तिच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. 
याशिवायही आणखी बर्‍याच नवनवीन गोष्टी या कारमध्ये असतील. कार उत्पादक क्षेत्रातील अनेक अभियंते यावर काम करत आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे सध्याच अनेकविध प्रकारच्या गाड्या बाजारात येत आहेत. त्यात आता या प्रकारच्या नव्या गाड्यांची भर पडणार आहे. एका जागतिक कार उत्पादक कंपनीने चीनमधील नागरिकांकडून 'तुमच्या स्वप्नातली भविष्यातली कार कशी असावी आणि दिसावी?' या विषयावर कल्पक सूचना मागवल्या. त्यातील सर्वोत्कृष्ट कल्पनांवर सध्या एक कंपनी काम करत आहे. त्यातून काही नव्या व चमत्कारिक गाड्या लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. शेखर जोशी चाकांविना हवेत पळणारी हॉवर कार
चाके नसलेली ही गाडी हवेत साधारण एक ते दीड फूट उंचीवरून पळते. टायरच नसल्यामुळे रस्त्याशी होणारे घर्षण शून्य होते. त्यामुळे या कारची इंधन कार्यक्षमता खूपच वाढते. ही कार इलेक्ट्रिक मोटरवर चालत असल्यामुळे धुराचा त्रास होणार नाही. पर्यायाने पर्यावरणाची सुरक्षितता राखली जाईल. या कारमध्ये बसवलेल्या संवेदनशील उपकरणांमुळे गर्दीमध्ये धावणार्‍या इतर वाहनांची नोंददेखील ही गाडी घेऊ शकते. आकाराने छोटी असल्याने या गाडीच्या पार्किंगला थोडीशी जागा पुरते.
अशा गाड्यांसाठी विशिष्ट प्रकारचे रस्ते लागतात. रस्त्यांवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पट्टय़ा बसवाव्या लागतात. अन्यथा तांत्रिकदृष्ट्या ही कार पळू शकणार नाही. हे रस्ते कसे असावेत, यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन सुरू आहे. इलेक्ट्रिक हाय वे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर या संशोधनाचा भर आहे. मागील वर्षी बिजींग मोटार शोमध्ये या गाडीचे सादरीकरण केले गेले.
कंपनीने या गाडीला 'पीपल्स कार प्रोजेक्ट' असे नाव दिले आहे. लोकांच्या मनातील सध्या अस्तित्वात असलेल्या कारपेक्षा या कारचा आकार वेगळा आहे. तांत्रिकदृष्ट्या हे वाहन कारच्या व्याख्येत कुठेही कमी पडत नाही.
जगातील बर्‍याच प्रगत देशांत विद्युतचुंबकत्वावर आधारित हॉवरट्रेन म्हणजे जमिनीपासून वर उचललेल्या अवस्थेत हवेत अतिजलद वेगात धावणार्‍या रेल्वेगाड्यांचा अनेक वर्षांपासून लोकांच्या वाहतुकीसाठी वापर होत आहे. चाकांविना पळणारी हॉवर कार हे आज तरी स्वप्न वाटते आहे. तसेच या कारच्या निर्मितीत गुंतलेल्या तंत्रज्ञांना ही कार प्रत्यक्षात आणताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यांमधूनच आणखी नव्या सुधारणा सुचतील. या कारमध्ये नजीकच्या भविष्यात नवनवे बदल होत राहतील. अशा कारचा लोकांच्या वाहतुकीसाठी एक नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. ही गाडी विद्युतचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षणबलविरोधी कार्याच्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहे. विशेष प्रकारच्या पट्टय़ा बसवलेल्या रस्त्यांवरील प्रचंड विद्युतचुंबकीय बलामुळे ही कार हवेत वर ढकलली जाते. कार पुढे अथवा मागे जाण्यासाठी या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसविलेली असते. पूर्वनियोजित मार्गावरच ही कार पळू शकते.

क्लाऊड कॉम्प्युटिंग

क्लाऊड कॉम्प्युटिंग Cloud Computing Details in Marathi

क्लाऊड कॉम्प्युटिंग Cloud Computing Details in Marathi

 संगणकावरची माहिती (डाटा) जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा चांगला पर्याय आहे. तो महागडा वाटत असला, तरी डाटा रिकव्हरीची शाश्‍वती व त्याच्या किमतीपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. त्याचा वापरही सोयीस्कर व सहज करता येण्यासारखा आहे.
 संगणकावरची माहिती (डाटा) जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा चांगला पर्याय आहे. तो महागडा वाटत असला, तरी डाटा रिकव्हरीची शाश्‍वती व त्याच्या किमतीपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. त्याचा वापरही सोयीस्कर व सहज करता येण्यासारखा आहे.

ऊड कॉम्प्युटिंगची व्याख्या अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत करायची झाल्यास ती पुढीलप्रमाणे करता येईल. ' इंटरनेटवर आपली माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.' दिवसेंदिवस क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे सध्या आपण ईमेल तंत्रज्ञानाचा वापर पत्र लिहिणे, फोटो किंवा काही माहिती पाठवण्यासाठी नियमित करायला लागलो आहोत. तसेच, भविष्यात क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापरही नियमित होणार आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग कशासाठी?
पूर्वी विशिष्ट वह्यांमध्ये लिखापढी करून माहितीचे जतन करत असत. उदा. हिशोबासाठी रोजमेळ वापरली जात. पत्ते-फोन नंबर खिशातील वहीत (डायरी) लिहून ठेवत असत. फोटोची प्रिंट काढून ठेवत असत. आता या सर्व पद्धतींना वगळून सर्वसामान्य लोकही अशा गोष्टींसाठी संगणकाचा वापर करू लागले आहेत. अशी महत्त्वाची माहिती खराब किंवा नष्ट होऊ नये म्हणून ती दुसरीकडे जतन करणे महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची माहिती दुसरीकडे सहजरीत्या, खात्रीशीर जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा खूप चांगला पर्याय आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगचे फायदे व तोटे

क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर कसा करावा?
महत्त्वाची माहिती कोणती, हे प्रथम ठरवा.
• त्याची ं१्रं'>र्र९ी /ं१्रं'>(आकार) किती आहे, त्यानुसार ही माहिती जतन करण्यास किती जागा लागेल, ते ठरवा.
• काही ं१्रं'>¬ॅ'ी ऊ१्र५ी / ऊ१स्रु७ / ह्रल्ल६ि२ छ्र५ी र'८१्रि५ी/ं१्रं'> सारख्या कंपन्या ही सेवा मोफत देतात. हा पर्याय आपल्याला योग्य असल्यास त्याचा वापर करावा.
• वेळोवेळी आपण केलेली माहिती जतन होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. • महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या माहितीचे जतन होते. संगणक किंवा हार्डडिस्क खराब झाल्यास माहिती गेल्याने होणारे नुकसान किंवा डाटा रिकव्हरीचा खर्च वाचतो.
• या माहितीचा वापर आपण इंटरनेट असल्यास कुठूनही करू शकतो.
• अनेकांना ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणांहून वारंवार वापरता येऊ शकते.
• अनेकांना माहितीचे संकलन एकाच ठिकाणी करायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे.
• जास्त Size ची किंवा मोठी माहिती जर कोणाला पाठवायची असेल, तर ती ईमेलने पाठवणे शक्य नसते. अशा वेळीही हा पर्याय सोयीस्कर ठरतो.
• माहिती जतन करण्याच्या (ं१्रं'>ऊं३ं इूं'४स्र ऊी५्रूी२/ं१्रं'>) उपकरणाचा खर्च वाचतो.
• जर जतन करायची माहिती (डाटा) खूप जास्त असेल, तर क्लाऊड कॉम्प्युटिंग खूप महाग पर्याय होऊ शकतो.
• क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या बाबतीत सुरक्षितता ही एक महत्त्वाची बाब आहे. सेवा देणारी कंपनी खात्रीशीर असेल, तरी हॅकर्स (ं१्रं'>ूं'ी१२/ं१्रं'>) चा डोळा अशा कंपनीवर नेहमी असतो.

चतुर आणि चटक चांदणी

 चतुर आणि चटक चांदणी 



चतुरांचे संयुक्त डोळे डोक्याच्या वरील भागामध्ये एकमेकांच्या अगदी जवळ चिकटलेले दिसतात. चटक चांदणीचे डोळे एकमेकांपासून दूर असतात. चतुरांचे मागील पंख पुढल्या पंखापेक्षा बरेच रुंद असतात. चटक चांदण्यांचे दोन्ही पंख समान आकाराचे, निरुंद असून, ते देठासारख्या भागाने वक्षास जोडलेले. चतुरांचे पंख लाल, पिवळे आणि काळसर पट्टय़ांनी रंगलेले असतात. चतुर जमिनीवर अथवा झाडाच्या फांदीवर बसला, की त्याचे पंख वक्षाच्या डाव्या-उजव्या बाजूस जमिनीला समांतर पसरलेले असतात. चटक चांदणीचे अरुंद पंख फारसे रंगीत नसतात. चटक चांदणी झाडोर्‍याच्या फांदीवर विसावली, की पंख वक्षावर तिरकस कोनात किंवा पोटाच्या लांबसर बाजूंना समांतर राहतात. चटक चांदण्याच्या तुलनेत चतुर मोठे असल्याने ते डोळ्यांत चांगलेच भरतात. त्यांच्याकडे सहजपणे लक्ष जाते. हे दोन्ही कीटक 'भुईचर' असले, तरी त्यांना भुईवर चालता येत नाही. त्यांची अंडी आणि पिल्ले जलाशयामध्ये आढळतात.
जपानी लोकांमध्ये चतुरांना खूप महत्त्व दिले जाते. एके काळी जपानला चतुरांची बेटे म्हणून ओळखले जात होते. जपानी दागिन्यांमधील कलाकुसरीवर चतुरांची छाया दिसते. जपानी मुले लांबसर केसाच्या दोन्ही टोकांस लहान वजनाचे दगड बांधतात आणि तो केस उडणार्‍या चतुरांच्या थव्यामध्ये भिरकावतात. तो केस चतुरांच्या काटेरी पायांत अडकतो. साहजिकपणे स्वत:ला त्या जाळ्यातून सोडविण्याच्या प्रयत्नांत चतुराला जमिनीवर यावे लागते. जपानी मुलांचा हा खेळ आहे, की खाण्यासाठी चतुर पकडण्याचा तो सापळा आहे? तेच जाणोत. इंडोनेशिया, जपान इत्यादी देशांमध्ये चतुरांचा जेवणामध्ये वापर करतात, असे सांगितले जाते.

बुरशी आणि वनस्पती

बुरशी आणि वनस्पती



पृथ्वीतलावर अगदी प्रथम स्थापित झालेल्या वनस्पतींच्या मुळांची रचना मातीतील पोषकद्रव्ये शोषून घेण्याइतपत विकसित झाली नसावी. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बुरशीकरवी हे काम करवून घेण्यास वनस्पतींनी सुरुवात केली असावी. ही बुरशी वनस्पतींच्या मुळांबरोबरसुद्धा सहजीवन स्थापित करतात. त्यांना 'मायकोरायझा' असे म्हणतात. काही बुरशींच्या कवकजालाचे धागे वनस्पतींच्या मुळाच्या अंतर्भागात जाऊन पेशीमध्ये प्रवेश करतात, तर काही बुरशींचे बाह्यांगावरच आवरण तयार होते. बुरशीच्या कवकजालाचे धागे लांबपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे हे धागे वनस्पतीची मुळे पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणापर्यंत पोहोचून तेथील पोषकद्रव्ये जमिनीतून शोषून घेऊन त्याचा पुरवठा वनस्पतींच्या मुळांना करतात.
वनस्पतींना आवश्यक असणारी काही खनिजद्रव्ये मातीच्या कणांना घट्ट धरून बसल्याने सहज विरघळू शकत नाहीत व मुळांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी बुरशी त्यांच्या मदतीला धावतात. बुरशीद्वारे स्रवल्या जाणार्‍या काही रसायनांमुळे ती विरघळवली जातात. असा खनिजद्रव्यांना सहज शोषून घेऊन त्यांना थेट मुळापर्यंत पोहोचविण्याचे काम बुरशी करते. बुरशीबरोबरच्या या सहजीवनामुळे उपयुक्त गोष्टींचा खजिनाच वनस्पतींना गवसला आहे. बुरशींमुळे वनस्पतींमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा अतिशुष्क जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता वाढते. आम्लवर्षा किंवा प्रदूषणयुक्त प्रतिकूल वातावरणावर या वनस्पती मात करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या रोगाविरुद्धही त्यांची प्रतिकारप्रणाली विकसित होते. या सगळ्यांच्या बदल्यात बुरशींनाही आवश्यक असलेले अन्नघटक मिळतात. काही अभ्यासकांनी हे सहजीवन अस्तित्वास असलेल्या व नसलेल्या रोपांचे निरीक्षण केले असता हे सहजीवन प्रस्थापित झालेली रोपे इतर रोपांपेक्षा जास्त जोमाने वाढत असल्याचे दिसून आले. प्रयोगशाळेत मायकोरायझायुक्त रोपे वाढवून ती शेतकर्‍यांना पुरविण्याचे काम काही व्यावसायिक करतात. गहू, तांदूळ, सोयाबीन व इतर कडधान्ये यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..

 साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..


मानव वगळता बहुतेक प्राणिमात्रांचा साहचर्य हा नैसर्गिक गुणधर्म असल्याचे दिसते. काही जातींचे भुंगे हे बुरशीबरोबर सहजीवन जगत असतात. ते बुरशीला वाढवतात व बुरशीही त्यांच्या कायम उपयोगी पडत असते. गेंरे हा कीटकांचाच प्रकार आहे. त्यांचेही बुरशीबरोबर चांगले सहकार्य असते. किंबहुना काही जातीचे भुंगेरे तर बुरशीशिवाय दिसतच नाहीत. या भुंग्यांनी केलेल्या झाडाच्या खोडात बुरशीची शेतीच केलेली असते.
वाळवी आणि मुंग्यांप्रमाणे काही भुंगेरे किंवा बीटल्ससुद्धा बुरशींबरोबर सहजीवन जगतात. अम्ब्रोशिया नावाचे भुंगेरे त्याला उपयुक्त अशा मृत झाडाच्या खोडामध्येच बोगदा तयार करतात आणि त्यामध्ये बुरशीची शेती करतात. बोगदा तयार झाला, की त्यामधे बुरशीच्या बीजाणूंचे रोपण केले जाते. बुरशी काही विकरे स्रवून झाडांच्या पेशीमधील अन्नघटकांचे विघटन करतात आणि या तयार खाद्याचा आयताच नजराणा अम्ब्रोशिया भुंगेर्‍यांना मिळतो. बुरशींना भुंगेर्‍यांच्या नत्रयुक्त विष्ठेमधून पोषकद्रव्ये मिळतात.
बुरशीच्या वाढलेल्या कवकजालाच्या धाग्यांवर भुंगेर्‍यांची मादी अंडी घालते. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या भुंगेर्‍यांच्या अळीसदृश बाळाचे खाऊ-पिऊ घालून संगोपन व संरक्षण बुरशी करते. यामुळे निसर्गामध्ये अम्ब्रोशिया भुंगेरे आणि बुरशी एकमेकांशिवाय आढळूच शकत नाहीत. अशाच प्रकारचे सहजीवन गांधिलमाशींच्या काही प्रजाती आणि बुरशींमध्ये आढळते. बुरशीच्या अम्ब्रोशियाला या प्रजातीबरोबरच अनेक बुरशी या भुंगेर्‍यांबरोबर सहजीवन स्थापित करतात.
प्राचीन काळामध्ये जगात प्रचलित असलेली 'वस्तुविनिमय पद्धती' बुरशी आणि कीटकांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये दिसून येते. आपल्याकडे उपलब्ध असेल, ते दुसर्‍यास द्यावे व दुसर्‍याकडून आपणास हवे ते घ्यावे हा सरळ-सोपा मार्ग पुन्हा एकदा आपण यांच्याकडून शिकून आचरणात आणायला हवा. उत्क्रांतीच्या वाटेवर या दोन्ही प्रजातींनी एकमेकांना समजून-उमजून केलेली सहकार्याची भावना ही विज्ञान-संशोधनाच्याही पुढची आहे. का ? कसे ? याची उत्तरे मिळत राहतील; परंतु आजही अशा सहजीवनाकडून आपल्याला मात्र बरेच काही शिकण्यासारखे आहे.

व्होल्टा Volta Scientist

व्होल्टा Volta Scientist 

व्होल्टा Volta Scientist


कृत्रिमरीत्या वीजनिर्मितीमध्ये अनेक महान संशोधकांनी अपूर्व योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. या संशोधकांमध्ये व्होल्टा यांचे संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. खरेतर व्होल्टा यांनी आपले संशोधन मिथेन या वायूच्या शोधापासून सुरू केले. त्यांनी मिथेन हा वायू अलग करून त्याच्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना विजेविषयी संशोधन करण्यात रस वाटू लागला. सुरुवातीचे त्यांचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक ल्युॅगी गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्‍या विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्यांना तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्‍चय केला. रासायनिक द्रव्य वापरून वीजनिर्मिती कशी करता येईल, याविषयीचे संशोधन त्यांनी सुरू केले. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. 
हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. त्यामुळे विद्युतघटाच्या संशोधनाचे श्रेय यांना मिळते. पर्शियन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी अशा विद्युतघटाचा वापर केला होता, असे आढळून आले.
विद्युतघटाच्या निर्मितीमुळे कमी प्रमाणात होणार्‍या विजेच्या वापरासाठी एक चांगले साधन उपलब्ध झाले. त्यात साधनांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत गेली. आता रासायनिक द्रव्याच्या ऐवजी घनपदार्थांचा वापर करून विद्युतघट निर्माण करता येतात. मनगटी घड्याळ, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आता घन विद्युतघटाचा वापर आहे. व्होल्टा यांनी प्रथमच कॅपॅसिटरची रचना तयार केली. या रचनेचा वापर करून त्यांनी विद्युतदाब व विद्युतभार यांचा संबंध प्रस्थापित केला. मूलभूत विज्ञानामध्ये दिलेले हे त्यांचे मौलिक योगदान आहे. धातूच्या तारांचा वापर करून कोमो ते मिलान या ५0 कि. मी. अंतरावर असणार्‍या शहरामध्ये त्यांनी संबंध प्रस्थापित केला. त्यांनी एका शहरातून एक कळ दाबून विद्युतप्रवाहाच्या साहाय्याने दुसर्‍या शहरातील पिस्तूल उडवून दाखविले. त्यांच्या या प्रयोगाला खूपच महत्त्व आहे. कारण या प्रयोगामुळे पुढे टेलिग्राफची कल्पना प्रत्यक्षात निर्माण झाली. या कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. नेपालियन बोनापार्ट यांनी त्यांना काउंट ही पदवी दिली. इटालियन सरकारने त्यांच्या 'लिरे' या चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे विद्युतदाबाच्या परिमाणाला 'व्होल्ट' असे नाव देण्यात आले. 

ISON Comet आयसॉन धूमकेतू

ISON Comet आयसॉन धूमकेतू

ISON Comet आयसॉन धूमकेतू

धूमकेतू 'आयसॉन' हा नुकताच सूर्याच्या खूप जवळून गेला. या धूमकेतूचा शोध लागला होता तेव्हा तो खूप प्रखर होईल आणि भरदिवसासुद्धा दिसेल, असे वाटले होते; पण जेव्हा नवीन निरीक्षणे हाती आली तेव्हा हा धूमकेतू खूप प्रखर होणार नाही हे लक्षात आले.
या धूमकेतूबद्दलची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा सूर्याच्या इतक्या जवळून जाणार होता (आता तो गेला आहे), की त्याचे सूर्याच्या गुरुत्वीय बलाच्या लाटांमुळे आणि ऊर्जेमुळे तुकडे होतील का, ही शंका वर्तवण्यात आली होती. आजचे हे चित्र 'सोहो' या अवकाशातील वेधशाळेने घेतले आहे. ही वेधशाळा नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आहे. ही वेधशाळा सूर्याच्या वरच्या वातावरणाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आली आहे. यात सूयार्चा भाग एका काळ्या चकतीने झाकला आहे, जेणेकरून सूर्याच्या प्रखर तीव्रतेचा या कॅमेर्‍याला धोका पोहोचणार नाही.
या चित्रात डावीकडचा भाग आयसॉन स्रू्याच्या दिशेने जात असतानाचा आहे. यात आपण धूमकेतूची लांब शेपटी बघतो, तर चित्राच्या उजव्या भागात तो सूर्याच्या खूप जवळून गेल्यानंतर त्यावर झालेले परिणाम दिसून येत आहेत. धूमकेतूची तीव्रता मंद झाली आहे. काही शास्त्रज्ञांनी या चित्रांवरून धूमकेतू कदाचित नष्ट झाला असावा असे सांगितले, तर काहींचा कयास आहे, की सूर्याजवळून गेल्यानंतरही धूमकेतूचा गाभा अजून टिकून आहे. या चित्राच्या दोन्ही भागांची तुलना करून बघा. आपल्याला सूर्याभोवतीचे बदलते वातवरणही चांगल्या प्रकारे दिसत आहे. तसेच, या चित्रात काही तारेही आहेत. 

चहाच्या पेल्यातील वादळ

 चहाच्या पेल्यातील वादळ

चहाच्या पेल्यातील वादळ' या साध्या वाक्प्रचारावरून शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं व त्यातून निष्कर्ष काढले. विज्ञानात कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही, असं म्हणतात ते खरंच आहे. ल्लक गोष्टीसाठी विनाकारण झालेला वाद म्हणजे 'चहाच्या पेल्यातील वादळ' असं आपण म्हणतो. काही वैज्ञानिकांनी खरोखरच बंद किटलीत चहा उकळत असताना काय घडतं, याचा अभ्यास करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी 'टेंपेस्ट' (म्हणजे वादळ) नावाचा संगणकी कार्यक्रम वापरून चहाच्या किटलीत काय घडतं, ते बघायचा घाट घातला. त्यांना या प्रयोगासाठी बृहद्संगणकाची मदत घ्यावी लागली. किटलीत थंड पाणी ओतून ती तापविली की त्या पाण्यात प्रवाह सुरू होतात. बाष्प साठतं, त्याचा दाब वाढतो. इतरही काही घटक कार्यक्षम होतात, असे या प्रयोगात शास्त्रज्ञांना आढळलं. 
हा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मते या अभ्यासामुळे एखाद्या बंद प्रणालीमध्ये ट्रायू (फ्लूईड्स) कसे वागतात, हे सांगणं शक्य होणार आहे. आपलं शरीर अशीच एक ट्रायूयुक्त बंद प्रणाली आहे, त्यामुळे वैद्यकीय अभ्यासात या वादळी कार्यक्रमाची मदत होईल. विशेषत: शरीरांतर्गत अवयवांच्या कार्यप्रणालीचे बारकावे या प्रकारे अभ्यासता येतील आणि त्यामुळे काही नव्या उपाययोजनाही अमलात आणता येतील. भूशास्त्रज्ञांना भूजल आणि खनिज तेलाचे भूपृष्ठांतर्गत प्रवाह कसे वाहतात, याची माहिती यामुळे मिळू शकेल. त्याचबरोबर मान्सूनबाबतचे अंदाजही यातून काढता येणे शक्य होणार आहे.

हेलिक्स तेजोमेघातील गाठी

 हेलिक्स तेजोमेघातील गाठी


तेजोमेघ व त्याच्या केंद्रस्थानी असलेला तारा यांच्या पृष्ठभागावरून वायू फेकला जात असतो. या वायूंची एकमेकांबरोबर टक्कर झाल्यानंतर त्यातून निर्माण होणार्‍या दाबामुळे तेजोमेघात गाठी तयार होतात. वकाशात परिक्रमा करणार्‍या हबल दुर्बिणीतून कुंभ तारकासमूहातील हेलिक्स तेजोमेघाची चित्रे घेण्यात आली तेव्हा त्या या तेजोमेघात धूमकेतूसारख्या गाठी दिसून आल्या, त्यांना 'कॉमेटरी नॉट्स' म्हटले गेले. अशा प्रकारच्या गाठी प्रथमच दिसल्या होत्या. प्लॅनेटरी तेजोमेघांसंदर्भात हा नवीन शोध होता.
या तेजोमेघात शास्त्रज्ञांनी हजारो गाठींची नोंद केली. या गाठींचा आकार आपल्या सूर्यमालेच्या दुप्पट आहे आणि त्यांचे शेपूट सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरासरी अंतराच्या हजारपट लांब आहे. या गाठींचे वस्तुमान पृथ्वीइतके आहे. या गाठींची दिशा या तेजोमेघाच्या केंद्राच्या दिशेने आहे, जशा सायकलीच्या तारा असतात, पण तुटलेल्या.
नंतर अशा गाठी इतर प्लॅनेटरी तेजोमेघातही दिसून आल्या. या गाठींचे कोडे पूर्णपणे सुटलेलं नसलं तरी काही शास्त्रज्ञांचे मत आहे की, या तेजोमेघांच्या केंद्रस्थानी असलेल्या तार्‍यातून मोठय़ा प्रमाणात वायू बाहेर फेकला जातो. जेव्हा या वायूची टक्कर तेजोमेघातील वायूशी होते तेव्हा तार्‍यातील वायूच्या दाबामुळे तिथे अशा प्रकारच्या गाठी तयार होत असाव्यात.
असा वायू सूर्यातूनही फेकला जातो. हा वायू प्रकाशासारखा सतत फेकला जात नसतो तर तार्‍याच्या पृष्ठभागावर होणार्‍या बदलातून तो बाहेर फेकला जातो. या वायूची घनता खूपच कमी असते; पण त्याला वेग असतो, त्यामुळे त्यांची ऊर्जाही खूप जास्त असते.
या गाठींचा शोध अचानक लागला होता. २00२ मध्ये सिंहतारका समूहातील उल्कावर्षावावेळी हबल दुर्बिणीला उल्कावर्षावाच्या उगमस्थानाच्या बरोबर विरुद्ध दिशेला वळविण्यात आले होते. हा तेजोमेघ त्याच दिशेला होता. तेव्हा याची काही चित्रे घेऊन त्यांना जोडल्यावर त्यांचे हे स्वरूप पहिल्यांदा लक्षात आले होते.

ध्वनीचा वेग, Speed of Sound

 ध्वनीचा वेग, Speed of Sound

 ध्वनीचा वेग, Speed of Sound



आदिमानवाला स्वत:च्या संरक्षणासाठी आणि भक्ष्याचा शोध घेण्यासाठी ऐकू येणार्‍या आवाजाचा वेध घेत त्यावर आवश्यक ती कृती करणे भाग होते. त्यामुळे मानवाच्या कर्णेंद्रियांच्या गुणवत्तेत सुधारणा होत गेली. आदिमानवाला त्याच्या शोधक वृत्तीमुळे, त्या काळातील दैनंदिन वापरातील साधनांमुळे वेगवेगळ्या ध्वनींचा परिचय झाला असावा. नाला ऐकू येऊ शकतो तो आविष्कार म्हणजे 'ध्वनी' किंवा 'आवाज.' आवाज नेहमी एखाद्या वायू, द्रव किंवा घन माध्यमातील भौतिक प्रेरणांमुळे निर्माण होणार्‍या तरंगाच्या स्वरूपात असतो. हे तरंग स्थितीस्थापकतेमुळेच प्रस्थापित होतात म्हणूनच त्यांना 'ध्वनितरंग' असे म्हणतात. मानव श्रवणेंद्रियाला सुमारे १0 ते २0,000 हर्टस् या र्मयादांच्या तरंगांचाच बोध होऊ शकतो. या प्रकारच्या तरंगांना 'श्राव्यध्वनी' असे म्हणतात. 
त्यापेक्षा, म्हणजे १0 हर्टस्पेक्षा कमी कंप्रतेच्या तरंगांना अवश्राव्य ध्वनी तर २0,000 हर्टस्पेक्षा जास्त कंप्रतेच्या तरंगांना 'श्राव्यध्वनी' असे म्हणतात. प्रकाशतरंग निर्वातातून प्रसारित होतात. ध्वनितरंगाच्या प्रसारणासाठी मात्र कोणते तरी वास्तव किंवा पदार्थीय माध्यम आवश्यक असते. या माध्यमाच्या कणांमध्ये असलेल्या जडत्व आणि स्थितिस्थापकता या दोन गुणांमुळेच त्यातून ध्वनितरंगाचे प्रसारण होऊ शकते. निर्वातात ध्वनितरंग प्रस्थापित होऊ शकत नाहीत. सामान्यत: ध्वनीच्या प्रसारणाचे माध्यम 'हवा' हे आहे.
इ. स. १६३५ मध्ये पी गॉसदी यांनी दूरवर उडविलेल्या तोफेचा जाळ दिसणे आणि बार ऐकू येणे या दोन घटनांमधील कालखंड मोजून, त्यावरून ध्वनीच्या हवेतील वेगाचे मूल्य काढले. १७ व्या शतकात आयझ्ॉक न्यूटन यांनी ध्वनी हा तरंगमय आहे, हे गृहीत धरून ध्वनीच्या हवेतील वेगाचे समीकरण शोधून काढले. त्यातील त्रुटी लापलास यांनी दुरुस्त केल्या. कालांतराने पी गॉसदी यांच्या प्रयोगाच्या आधारावर पॅरिस अँकॅडमीच्या सभासदांनी १७३८ मध्ये ध्वनीचा वेग उघड्यावर मोजण्याचा प्रयोग केला.
या प्रयोगात एकमेकांपासून २८.८ कि. मी. अंतरावर असलेल्या दोन टेकड्यांवर निरीक्षक बसविण्यात आले होते. दोन्ही टेकड्यांवर आळीपाळीने तोफ डागण्यात आल्या. तोफ उडाल्यानंतर दिसणारा प्रकाश आणि आवाज निरीक्षकांनी अचूकपणे मोजला. त्यावरून ध्वनीचा वेग गणित मांडून काढला. या प्रयोगात प्रकाशवेग अर्मयाद आहे, असे गृहित धरले होते.
एच. रेनॉल्ट या शास्त्रज्ञाने या पद्धतीत वेळ मोजण्यासाठी विद्युत साधनांचा उपयोग करून सुधारणा केली. ई. एस. स्कलंगन यांनी रेनॉल्ट यांच्या पद्धतीत सुधारणा केली. त्यांनी १९१८ मध्ये वार्‍याच्या आणि हवेतील आद्र्रतेच्या प्रमाणात ध्वनीचा वेग निरनिराळा असतो, असा निष्कर्ष काढला. र्मयादित अंतर वापरून ध्वनीवेगाचे मापन या आधुनिक पद्धतीने केले आहे. या पद्धतीत ध्वनीला विशिष्ट अंतर तोडण्यासाठी किती वेळ लागला तो मोजून, त्यावरून ध्वनीवेग काढल्याने त्याला 'प्रत्यक्ष पद्धत' म्हणतात.
अप्रत्यक्ष पद्धतीचाही अवलंब शास्त्रज्ञांनी ध्वनीवेग काढण्यासाठी केला आहे. कोलॅडन आणि स्थ्यूर्न यांनी जिनिव्हा सरोवरात प्रयोग करून ध्वनीचा पाण्यातील वेग मोजला. १९१९ मध्ये मार्टी यांनी समुद्राच्या पाण्यात १३ कि. मी. खोल अंतरावर प्रयोग करून ध्वनीचा वेग निश्‍चित केला. 'नॅशनल ब्युरो स्टँडर्ड'ने जास्त विश्‍वासार्हता असलेल्या सामान्य खोलीच्या तापमानाला आवाजाचा वेग ३४४ मी/से. किंवा ७५८ मैल/से. ला मान्यता दिली आहे. आवाजाचा वेग हा तापमानावर अवलंबून असल्याने हिवाळय़ात दिवसा आवाजाचा वेग कमी असतो. म्हणजेच ३३0 मी/से. ला तर उन्हाळ्यात दिवसा आवाजाचा वेग जास्त असतो म्हणजे ३३५ मी/सें. एवढा असतो.

बुरशी आणि मुंग्या

 बुरशी आणि मुंग्या

 बुरशी आणि मुंग्या
मुंग्यांच्या वारूळात बुरशीची शेती असते व ती मुंग्यांनीच जाणीवपूर्वक केलेली असते. वनस्पतींच्या पानांचे विघटन करून बुरशी कामकरी मुंग्यांना खाद्य पुरवत असते. त्या बदल्यात मुंग्या बुरशीला सुरक्षित आश्रय देतात. ष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळणार्‍या अटाईन नावाच्या मुंग्यांच्या प्रजातीसुद्धा स्वत:चे खाद्य तयार करण्यासाठी बुरशींचा वापर करून घेतात. या विशिष्ट मुंग्यांच्या प्रजाती प्रदेशनिष्ठ, म्हणजे ठराविक प्रदेशात सिमीत असून दक्षिण, मध्य अमेरिका व मेक्सिकोतील काही जंगलांमध्येच आढळतात. 
मुंग्यांमधील पंख असलेली मादी तिच्या तोंडाच्या मागे असणार्‍या छोटयाशा खिशामध्ये (इन्फ्राबकल पाऊच) तिला हव्या असलेल्या बुरशींचे बिजाणू साठवते. आपली वसाहत स्थापन करण्याआधी ती सर्वात अगोदर तिला पोषकद्रव्ये पुरवू शकेल अशी वनस्पती शोधून काढते. निवडलेल्या वनस्पतींपासून, बुरशीसाठी काही धोका तर नाही ना हेही तपासून घेते. त्यानंतर मग मुंगीराणी जमिनीखाली तिचे घर बांधायला सुरुवात करते. या घरातील एक खोली तयार झाली की कामकरी मुंग्यांनी आणलेले
वनस्पतींच्या पानांचे तुकडे त्यामध्ये पसरते. मग त्यावर होते बुरशीच्या बिजाणुंचे रोपण. नको असलेल्या बुरशांना अटकाव करण्यासाठी या मुंग्या स्ट्रिप्टोमायसिस नावाचा प्रतिजैविके निर्माण करणारा बेक्टेरियाही पदरी बाळगत असल्याची नोंद सापडते. बिजाणुंचे कवकजालामधे रुपांतर व्हायला लागले की त्यावर मुंगी राणी रोज हजारो अंडी घालते. यातूनच कामकरी मुंग्यांची पुरेशी सेना तयार होते. काही अंडी ती स्वत: खातेही. मुंग्या त्यांनी तयार केलेल्या बुरशीच्या शेतीमध्ये वनस्पतींच्या पानांचे तुकडे ठेवतात. आणि या तुकडयांचे विघटन करून सुरक्षित आश्रयस्थानाच्या बदल्यात बुरश्या मुंग्यांना तयार खाद्य पुरवतात.
लेपिओटा, झायलेरिया, ऑरिक्युलारीया या बुरशांचे अटाईन मुंग्यांबरोबर सहजीवन आढळते. मुंग्या या मुळातच कष्टाळू, शिस्तबद्ध आणि सहकार्याची भावना ठेवून असणार्‍या समाजशील प्रजाती आहेत. परंतु बुरशांकडे मात्र प्रथमदर्शनी अपायकारक म्हणूनच पहिले जाते. एकमेकांना सहाय्य करून प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहाण्याचे शहाणपण निसर्गत: या दोन सजीवांना मिळत असावे. आणि यामुळे त्यांचे संवर्धन होण्यास आपोआपच मदत होते.

लहानग्यांना दमा Asthma in Children

लहानग्यांना दमा Asthma in Children 



शहरांच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर, कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच अँलर्जी व दमा असणार्‍या बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्‍चितच त्यांचा आजार आटोक्यात राहू शकतो. कमकुवत प्रतिकारशक्ती
हल्ली फास्टफूडच्या जमान्यात मुलांना पोषक व परिपूर्ण आहार मिळत नाही. मैदानी खेळ, नियमित व्यायाम यांचा अभाव यांमुळे त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवतच असते. याचाच दृश्य परिणाम म्हणजे लहान मुलांमध्ये अँलर्जी व दम्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते. आपल्या अवती- भवती नजर टाकल्यास हल्ली कितीतरी बालके इनहेलर, स्पेसर व नेब्युलायझर दिसतात. शहरांच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर, कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच अँलर्जी व दमा असणार्‍या बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्‍चितच त्यांचा आजार आटोक्यात राहू शकतो. ह/ल्ली दमा व अँलर्जीचे (त्वचेची अँलर्जीक र्‍हाइनाइट्स (सर्दी) नियंत्रण करणारी उत्तम औषधे, श्‍वसनावाटे औषधे घेण्याची उपकरणे उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ही औषधे नियमित द्यावीत. औषधे घेणे अचानक बंद केल्यास अँलर्जी व दमा बळावतो.
ज्य/ा घटकांमुळे अँलर्जी दमा बळावतात, त्यांना ळ१्रॅgor AÀfे म्हणतात. धूर, धूळ, परागकण, बुरशी, रासायनिक पदार्थ, आहारातील ठरावीक पदार्थ, थंड पदार्थ, जंतुसंसर्ग या कारणांनी दमा अथवा अँलर्जी उद्भवू किंवा वाढू शकतो. दमा अचानक बळावल्यास तातडीने वापरण्यासाठी उत्तम औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी फवारा सतत जवळ बाळगावा.
स्ांब/धित साधने वापरण्याचे योग्य तंत्र आपल्या डॉक्टरांकडून शिकून घ्यावे. अन्यथा त्यातील औषध फुफ्फुसांपर्यंत पोहचणार नाही. औषध घेण्याचे उपकरण आठवड्यातून एकदा धुवून कोरडे करून घ्यावे. नेब्यूलायझेशन करताना प्रत्येक रुग्णासाठी वेगळा मास्क व ट्यूब वापरावी.
झाेपण्/याची खोली, अंथरूण व उशा यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता गालिचे, केसाळ खेळणी, पांघरुणे वापरू नयेत. त्यात धूळ अडकते. त्याऐवजी सुती (धुता येण्याजोगी) पांघरुणे व चादरी वापराव्यात. आवश्यक तेवढय़ाच चादरी व उशा अंथरुणात ठेवाव्यात. फारशी धूळ बसणार नाही अशा कापडाच्या खोळी (१ी२्र२३r) Uf´fSXf½यात. 
घरात प्/ाळीव प्राणी ठेवणे टाळावे. हे शक्य नसल्यास त्यांचा बिछाने, सोफा इत्यादींशी संपर्क येऊ देऊ नये.
अगरबत्ती /अथवा रूम फ्रेशनर वापरू नये.
धूळ झटकण/े, रंगकाम, जंतुनाशक फवारणी (ढी२३ उल्ल३१'), °fT¯fZ B°¹ffदी गोष्टी करताना लहान मुलांना दूर ठेवावे.
मुलांना सक/स व चौरस आहार द्यावा. दिवसातून ४ वेळा विभागून द्यावा. भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. अँलर्जी वाढवणारे पदार्थ मात्र टाळावेत. दही, चॉकलेट, मैदा, अतिसाखर इत्यादी पदार्थ कफाचे प्रमाण (चिकट स्राव) वाढवतात. तेव्हा वरील पदार्थ टाळावेत.


मोकळय़ा हवेत /मैदानी खेळ खेळण्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. ऑक्सिजन भरपूर मिळतो. प्रतिकारशक्तीही वाढते. तेव्हा आपल्या मुलांना नियमित खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. 
घरातील दम्याची/ औषधे पूर्ण संपण्याच्या आधीच विकत घेऊन ठेवावीत म्हणजे उपचारात खंड पडणार नाही.
सर्दी, पडसे झाल्य/ास दमा बळावू शकतो. अशा वेळी बर्‍याच रुग्णांना अल्ल३्र्रु३्रू२ देऊन जंत्fbÀfaÀf¦fÊ लवकरात लवकर बरा करावा लागतो. तेव्हा सर्दी पडशाकडे दुर्लक्ष करू नये.
सर्दी व स्वाईन फ्लू ट/ाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. दमा व अँलर्जीक सर्दी असणार्‍या बालकांनी ही लस दर वर्षी घ्यावी. 
तीव्र गारठय़ापासून ब्/ाळांना जपावे तसेच अंघोळीनंतर केस त्वरित पुसून कोरडे करावेत.
पालकांच्या धूम्रपानाम्/ाुळेही मुलांना त्रास उद्भवतो. तेव्हा मुलांसमोर धूम्रपान टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या बालकास दमा आहे, हे स्वीकारून त्यावर नियमित उपचार करणे आवश्यक आहे.


विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist

विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist 


विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist
'सि व्हिल इंजिनियरिंग' हे एक मोठं शास्त्र आहे. 'बांधकामाशी संबंधित' एवढीच या शास्त्राची र्मयादा नाही, त्या मध्ये अनेक छोट्या-मोठय़ा विषयांचा, कला-कौशल्यांचा अंतर्भाव आहे. मूलभूतशास्त्रात स्वत:ला पूर्ण झोकून नवभारत घडविण्यात ज्यांचा मोठा सहभाग होता, त्यात डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरैया यांचं नाव अग्रणी आहे. ते मूळचे कर्नाटकातील मदनहळ्ळी गावचे होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असूनही ते पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून १८८३ मध्ये सर्वप्रथम येऊन पदवीधर झाले. मुंबई प्रांताच्या पाटबंधारे खात्यात मुख्य अभियंता म्हणून त्यांनी अभिनव कल्पनांचा उपयोग करून रचनात्मक कार्य सुरूकेले. त्यांनी केलेले काम 'ब्लॉक सिस्टीम' आणि 'ऑटोमॅटिक गेट्स' म्हणून आजही परिचित आहे, कारण त्यामुळे पाणी-साठवण करण्याची धरणांची क्षमता वाढली. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा पाणीपुरवठा त्यांनी सुधारला. पुण्याच्या खडकवासला धरणाचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

म्हैसूरचे राजे कृष्णराज ओडेयार (१८९३-१९४0) यांच्या कारकिर्दीत ते दिवाण होते. इंग्रज सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला होता. विश्‍वेश्‍वरैया यांनी जेव्हा जोग धबधबा पाहिला तेव्हा ते निसर्गसौंदर्य पाहून स्तिमित झाले; पण पाणी वाया जातंय हे पाहून व्यथितही झाले. त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.
अनेक प्रकल्पांसाठी पंडित नेहरू त्यांचा सल्ला घेत असत. समृध्द भारताचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न करणार्‍या सर विश्‍वेश्‍वरैया यांना १९५५ मध्ये 'भारतरत्न'चा सन्मान प्राप्त झाला. 


होमी भाभा Homi Bhabha

होमी भाभा Homi Bhabha 

होमी भाभा Homi Bhabha



होमी भाभा Homi Bhabha  : - (१८0९ - १९६६) अणुशक्तीमुळे आपल्या देशाची उन्नती होत राहील, असं पंडित नेहरुंना वाटत होतं. डॉ. होमी भाभा हेच या प्रकल्पाची जबाबदारी घेऊ शकतील याची पंडितजींना खात्री होती. भाभांचं शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेज आणि बंगलोरला इंडियन इंन्स्टीटयूट ऑफ सायन्स येथे झाले. त्यांना पॉल डि-याक, एन्रिको फर्मी, जेम्स श्याडविक, अर्नेस्ट रुदरफोर्ड, निल्स बोहर अशा दिग्गज शास्त्रज्ञांबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघानं १९५५ मध्ये 'शांततेसाठी अणुशक्ती'वर एक (पहिलाच) परिसंवाद जिनिव्हा येथे आयोजित केला होता. त्याचे अध्यक्ष होमी भाभा होते. भारतातील पहिली अणुभट्टी १९५६ साली भाभांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. त्यावेळी आशियात फक्त रशियाकडे अणुभट्टी होती. अणुविद्येत भाभा जगात आघाडीवर होते. सर्व दिशांकडून पृथ्वीवर अदृश्य वैश्‍विक किरणांचा वर्षाव होत असतो. त्यातील अनेक गूढगोष्टी त्यांनी उकलून दाखवल्या. त्यांनी मेसॉन या एका अतिसूक्ष्मकणाचे सखोल संशोधन केले. त्यांच्या प्रायोगिक पुराव्यामुळं अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताला बळकटी आली. मूलभूत विज्ञानाचं महत्व ओळखून त्यांनी मुंबईला 'टाटा इंस्टीटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' या संस्थेची स्थापना करण्यात सक्रीय भाग घेतला. 
होमी भाभांमुळे कृषी, वैद्यक आणि अभियांत्रिकी क्षेत्रांना उपयुक्त असणारी किरणोत्सर्गी मूलद्रव्यं तयार होऊ लागली. अणुऊर्जा तयार करताना 'जड पाणी' लागते. त्यात भारत स्वयंपूर्ण झाला. पंडित नेहरुंचं स्वप्न साकारण्यात होमी भाभा यांना यश मिळत असताना एक दुर्घटना घडली. २४ जानेवारी १९६६ रोजी युरोपकडे भाभांना घेऊन जाणारे विमान आल्प्स पर्वतराजींमध्ये कोसळून त्यांचा अंत झाला. होमी भाभा हे उत्तम कवी, चित्रकार, पर्यावरणप्रेमी आणि व्हायोलिनवादक होते. निर्घृण काळानं घात केला नसता तर त्यांनी निश्‍चितच अणुविज्ञानशास्त्रात खूप मोलाची भर घातली असती.  

अदृश्य शाई, Invisible Ink

 अदृश्य शाई, Invisible Ink, Making Invisible Ink using Lemon


करून पहा प्रयोग उद्देश : लिंबाच्या रसाचे वैज्ञानिक उपयोग तपासणे
साहित्य : अर्धे लिंबू, कापसाचा बोळा गुंडाळलेली काडी, विजेचा दिवा, कागद, पाणी व पेला.
कृती : पेल्यामधील पाण्यात लिंबू पिळा. हे रसायन चांगले ढवळा, त्यामध्ये काडीला लावलेल्या कापसाच्या बोळ्याचे टोक बुडवा व याच रसाने कागदावर मजकूर लिहा. हा मजकूर डोळ्यास दिसणार नाही. हा कागद सुकू द्या. सुकल्यानंतर विजेचा दिवा चालू करा. या गरम दिव्याजवळ हा धरा. हळूहळू लिंबाच्या रसाने लिहिलेला सर्व मजकूर दृश्य होईल.

निष्कर्ष:लिंबाच्या रसातील कबरेदके ही रंगहीन असतात. परंतु ती सुकवून, तापवल्यावर त्या संयुगाचे विघटन होते व त्यातील कार्बन काळा पडतो व दृश्य होतो कारण लिंबामधील अँस्कॉर्बिक आम्लाची रासायनिक क्रिया उष्णतेमुळे कबरेदिकांवर होते.

धूमकेतू आकाशातला पाहुणा Comet in the Sky

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky 

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky


पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे इतर ग्रहसुद्धा वेगवेगळ्या लंबगोलाकार कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असतात, हे तुम्हाला माहीत आहे. सूर्यमालेतल्या ग्रह आणि उपग्रहांप्रमाणेच धूमकेतूसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. फरक इतकाच की धूमकेतू हे खूप मोठय़ा कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असल्याने ते क्वचितच सूर्याजवळ येतात. धूमकेतू सूर्याजवळ येतात, तेव्हा ते आपल्याला दिसण्याची शक्यता असते.
धूमकेतू म्हणजे गोठलेला कार्बन डायऑक्साईड वायू, बर्फ आणि धूलिकण यांचा गोळा असतो. जसजसा धूमकेतू सूर्याजवळ यायला लागतो, तसंतसं सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं तापमान वाढायला लागतं. तापमान वाढल्यामुळे धूमकेतूमधले वायू प्रसरण पावतात आणि धूमकेतूला लांबच लांब शेपूट फुटते.
असाच एक धूमकेतू सध्या आपल्या भेटीला आला आहे. या धूमकेतूचं नाव आहे 'आयसॉन.' सध्या आयसॉन धूमकेतू दुर्बिणीच्या किंवा बायनॅक्युलरच्या मदतीने पाहता येतो. साधारणपणे १८ नोव्हेंबरपासून हा धूमकेतू सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व दिशेला कन्या तारकासमूहातल्या चित्रा तार्‍याजवळ पाहता येईल. २८ नोव्हेंबरच्या सुमारास तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल असा अंदाज आहे. काही वेळा सूर्याच्या उष्णतेने धूमकेतूचे तुकडे होतात. आयसॉन धूमकेतू जर सूर्याच्या उष्णतेने फुटला नाही, तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यंत तेजस्वी अशा आयसॉन धूमकेतूचं दर्शन आपल्याला होईल.
आयसॉन धूमकेतूचा शोध विताली नेवेस्की आणि आर्टिअम नोविचोनोक या दोन रशियन खगोलशास्त्रज्ञांनी २४ सप्टेंबर २0१२ या दिवशी दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करताना लावला. या धूमकेतूचं शास्त्रीय नाव आहे - ू/2012 २1. या नावातल्या ह्यू चा अर्थ असा आहे, की हा धूमकेतू ठरावीक कालावधीनंतर सूर्याच्या जवळ येणार्‍या धूमकेतूंसारखा नाही. आयसॉन धूमकेतू एकदाच सूर्याच्या जवळ येणार असल्याने हा धूमकेतू परत आपल्याला दिसणार नाही. म्हणूनच आपल्या भेटीला एकदाच येऊ शकणार्‍या या आकाशातल्या पाहुण्याचं आपण जोरदार स्वागत करायला हवं! पण या धूमकेतूच्या दर्शनासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला मात्र लागेल. मग काय, आहे ना तयारी तुमची?

Birbal Sahani प्रो. बिरबल साहनी

Birbal Sahani प्रो. बिरबल साहनी : १८९१-१९४९- प्राचीन काळातील वनस्पती काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या खर्‍या; पण जाताना काही वनस्पतींनी आपला ठसा जणू शिलालेखात कोरावा तसा कोरला होता. संशोधक त्याला 'जीवाश्म' म्हणतात. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर प्राचीन काळच्या जीवसृष्टीचा मागोवा घेता येतो. या संशोधनाकरिता बुद्धी, चिकाटी आणि कौशल्याची गरज असते. या तिन्हीचा त्रिवेणी संगम लाभलेली महान व्यक्ती म्हणजे प्रो. बिरबल साहनी! त्यांना लहानपणापासूनच वृक्ष-वेली, झाडे-झुडपं याचं सखोल निरीक्षण करण्याचा छंद होता. शालेय जीवनात त्यांनी पाने-फुले आणि चित्र-विचित्र दगडांचे नमुने जमवून त्यांचा एक आकर्षक संग्रह तयार केला होता. त्यांचे वडील रुचीराम साहनी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. ते विज्ञान-प्रसारक आणि पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बिरबल यांना सतत प्रोत्साहन दिलं. उत्कृष्ट संशोधनामुळं त्यांना इंग्लंडमध्ये 'एफ आर एस' होण्याचा मान मिळाला. बिरबल साहनी हे पंडित नेहरू यांचे स्नेहांकित होते. दोघांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर होती! पंडितजींनाही जीवाश्मांमध्ये विलक्षण आकर्षण वाटत असल्यामुळं त्यांनी या विषयाचं एक जागतिक दर्जाचं संशोधन करणारी संस्था स्थापन करण्यासाठी डॉ. बिरबल यांना उद्युक्त केलं. लखनौ येथे ही संस्था स्थापन व्हावी म्हणून अखंड परिश्रम करून डॉ. साहनी यांनी एक आदर्श आराखडा तयार केला. या प्रयोगशाळेच्या पायाभरणी समारंभाला ३ एप्रिल १९४९ रोजी पंतप्रधान नेहरू आले होते. दुर्दैवानं एक आठवड्यानंतर (१0 एप्रिलला) अतिश्रमामुळं बिरबल साहनी यांचं निधन झालं. त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची पत्नी सावित्री साहनी यांनी हिकमतीनं 'बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पालीओबॉटनी'ची उभारणी केली. पंडितजी पुन्हा त्या संस्थेत (२-१-१९५३) उद््घाटनासाठी आले. आज ती संस्था खरोखरीच जगन्मान्य झाली आहे.   

कासवांची कहानी Development of Tortoise

कासवांची कहानी Development of Tortoise 



सागरी कासवं भरपूर पोहतात. ते साहजिकच आहे. ते दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. साधारणपणे १0 कोटी वर्षांपूर्वी कासवांनी सागर प्रवासास सुरुवात केली. त्या वेळी ही कासवं इतकं चांगलं पोहू शकत नसावीत, असे पुरावे काही वर्षांपूर्वी हाती आले आहेत. ब्राझीलच्या जागी एकेकाळी जो सागर होता; त्या सागरात ११ कोटी वर्षांपूर्वी वावरणार्‍या कासवाचे अवशेष काही जपानी पुराजीव शास्त्रज्ञांना सापडले. ११ कोटी वर्षांपूर्वीचे हे अवशेष अभ्यासून या शास्त्रज्ञांनी अनेक तर्क केले; त्यानुसार हे कासव २२ ते २५ सें.मी. लांब असावं. या कासवाच्या हातापायातली हाडं सुटीसुटी होती. त्यामुळे वल्ही म्हणून या हातापायांचा काही उपयोग नव्हता. जी कासवं दीर्घकाळ पाण्यात राहतात, त्यांच्या हातापायातली हाडं एकमेकांत पक्की बसून ती एकसंध हाडासारखी होतात. अशा हाडांचा वल्ही म्हणून उपयोग होतो. गोड्या पाण्यात राहणार्‍या आणिवारंवार जमिनीवर येणार्‍या कासवांची हाडं अशी एकजीव नसतात. कारण जमिनीवर चालताना ती सांध्यात वाकवावी लागतात, पणजेव्हा या कासवाची कवटी तपासली तेव्हा हे कासव खार्‍या पाण्यात वावरणारं असावं, असं दिसून आलं. त्याच्या डोळ्यातील अश्रूग्रंथी प्रचंडमोठय़ा होत्या. जमिनीवरचे प्राणी सागरवासी बनतात तेव्हा त्यांना शरीरातील खारं पाणी बाहेर टाकण्यासाठी अश्रूंचा उपयोग होतो. त्यांचे अश्रूबिंदू खूप मोठे असतात. त्यातून मोठय़ा प्रमाणावर शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात. त्यावरून हे कासव सागरात वावरणारे होते. पण, त्या काळात त्यांनी नुकताच सागरात प्रवेश केला असावा, असं त्यांच्या अवयवांवरून सिद्ध होतं.

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे.  

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे. प्रवाळांबरोबरच कोमट पाण्यात आढळणारे रंगीत मासे, विविध वनस्पती, सहसा पाहण्यास न मिळणारे समुद्रजीवी प्राणी यांचीही इथे रेलचेल आहे. हा समुद्र अतिशय उथळ आणि नितळ असल्याने सूर्याचे किरण पडल्यानंतर सागरी सौंदर्याचा खजिनाच तुमच्या समोर खुला होतो. साध्या डोळ्यांनीही खोल पाण्यातील खजिन्याचे दृश्य स्वच्छ पाहता येते.
हा खडक निर्माण होण्यामागचे शास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे. भूशास्त्रानुसार नैसर्गिक जैविक पध्दतीने तयार झालेला कॉरल हा लाइमस्टोन किंवा चुनखडीचा दगड होय. तो समुद्रातील प्रवाळासारखे लाखो जलचर कीटक किंवा छोट्या प्राण्यामुळे तयार होतो. हे समुद्रप्राणी जेलिफिश, हाइड्रा, सी अँनीमोन इत्यादी. या जलचर प्राण्यांचा आकार पोकळ गोल नळीसारखा असून ती जणू काय त्याची अन्ननलीकाच असते. त्यांच्या शरीराचे एक टोक समुद्राच्या तळातील खडकाला चिकटलेले असते तर दुसरे टोक म्हणजे त्याचे तोंड होय. या तोंडाभोवती ६ ते १0 सें.मी. लांब-वळवळणारा, बारीक अस्थिविरहीत, सोंडेसारखाअवयव असतो. त्याचा उपयोग सूक्ष्म जीव, वनस्पती पकडून अन्न म्हणून तोंडात टाकण्यासाठी होतो. हे सर्व जलचर प्राणी एकमेकावर रचले जाऊन पुढे ते एकमेकांना चिकटून राहतात. नंतर त्यांची एक मोठी वसाहत तयार होते. जोडलेल्या स्थितीत ते समुद्रातील कॅल्शियम काबरेनेट घेतात. त्याचे थर हळूहळू शरीराच्या खालच्या बाजूला जमा होतात. मग त्याची विशिष्ट रचना तयार होते. प्रजोत्पादन सतत चालू असल्याने त्यांची संख्या वाढत जाते.

त्यातले काहीं प्रवाळ (कॉरल) वेगळे होऊन आपली वेगळी वसाहत तयार करतात. तर मोठे जलचर प्राणी कॉरलची अंडी किंवा कॉरल चक्क खातात. मात्र त्यांची तितकीच झपाट्याने वाढ होऊन समातोलपणा किंवा बॅलन्स राखला जातो.
प्रवाळांच्या विविध रंगात, निरनिराळ्या आकाराच्या वसाहती तयार होतात. जेंव्हा पहिला जलचर प्राणीसमूह मरतो तेंव्हा त्याच्यावर दुसरा त्याच जातीचा प्राणी समूह तयार होऊन वसाहतीची वाढ सतत चालू ठेवतो. तो समुद्रात ५0 मीटरपेक्षा कमी खोलीवर चुनखडी किंवा लाइमस्टोन स्वरुपात आढळतो. हाच ऑस्ट्रेलियाच्या पूर्व समुद्रकिनार्‍यावरील उथळ पाण्यातील, जेमतेम बुडालेला, लांबलचक कॉरलरुपी 'द ग्रेट बॅरिअर रीफ' (Great Barrier Reef)  खडक होय.
असा खडक समुद्रात निर्माण होण्यास अनेक वर्षे लागतात. कॉरल जिवंत असतो तेव्हा ही निसर्ग किमया चालू असते. अनेक वर्षानंतर जेंव्हा तो मृत होतो तेंव्हा किनार्‍याच्या दिशेने वाहून येतो. तोड-मोड करुन त्याचा नाश केला तर मात्र तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत 'द ग्रेट बॅरिअर रीफ' चा समावेश आहे. आज तो 'द ग्रेट बॅरिअर रीफ मरीन पार्क' म्हणून ओळखला जातो.
भारतात अंदमान-निकोबार द्वीप समूहाच्या जॉजलीबॉय बेटाच्या समुद्रकिनार्‍यावर अशा प्रकारचा सागरी सौंदर्याचा खजिना आहे. तो पाहण्यासाठी ग्लासबॉटम बोटीतून समुद्रावर चक्कर मारावी लागते. बोटीच्या काचेतून खाली पाहताना पांढरा, निळा, गुलाबी रंगाच्या कॉरल्स विविध आकारांत (उदा. निवडूंग, मश्रूम, पक्ष्याचा पंख) पाहण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला पाहिजे. त्या शिवाय तर्‍हेतर्‍हेने रंगीबेरंगी मासे, समुद्री वनस्पती, जलचर प्राणी स्वच्छ पाण्यात सहज पाहू शकता. किनार्‍यावर सापडणारी पांढरी रेती ही कॉरल्सची नैसर्गिकरीत्या झीज होताना तयार होते.
कॉरल किंवा प्रवाळपासून, पोवळी, खडे, मणी व इतर वस्तू बनवितात. आज सगळीकडे पोवळ्याला चांगली मागणी आहे कारण ते नवरत्नापैकी एक रत्न आहे.
(लेखक विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.) ग्रेट बॅरिअर रीफ या नैसर्गिक खडकांत अनेक लहान बेटांचासुध्दा समावेश होतो. हा खडक म्हणजे सुमारे २५00 छोट्यामोठय़ा प्रवाळ कीटकांमुळे पाण्याखाली निर्माण झालेली विशिष्ट प्रकारची वस्तुस्थिती आहे. प्रवाळांच्या रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या सुमारे ४00 जाती त्यात पाहण्यास मिळतात. ते पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे. त्यावर लाल-पिवळा-नारंगी-जांभळा-पांढरा-निळा-गुलाबी-हिरवा अशा मनोहर रंगांचे दर्शन होते.
प्रवाळांचे विविध आकार म्हणजे, निवडूंगाचे झाड, मश्रुम किेंवा लोटस वनस्पती, झाडाच्या पसरलेल्या फांद्या, पक्ष्याचे पसरलेले पंख, सांबराचे शिंग, गोलघुमट किंवा डोम, चर्चमधील ऑरगनच्या पाइप्सचा एक गट पाहायला मिळतात.


कीटका द्वारे कीटकांचा नाश पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटका द्वारे कीटकांचा नाश  पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटकांचा नाश करायचा असेल तर त्यांना मारणार्‍या दुसर्‍या कीटकांचा त्यासाठी उपयोग केला जातो. ही पद्धती अभ्यासाने विकसित केली आहे व त्याचा उपयोग पिकांचे संरक्षण करण्यासाठी होतो. कीटक परजीवी कीटकांच्या अंडी अथवा अळी किंवा कोश या अवस्थांवर अथवा त्या अवस्थांच्या आत स्वत:ची अंडी घालतात किंवा अळ्या सोडतात त्यांना 'परउपजीवी' (पॅरासायटॉइड) म्हटले जाते. हे परउपजीवी कीटक आपल्या अळ्यांद्वारा त्या त्या परजीवी कीटकांचा पूर्णपणे नाश करतात. अळ्यांची खाबूगिरी हे त्याचे कारण होय. या कीटकांमध्ये मुख्यत: विविध प्रकारच्या गांधीलमाशा आणिमांसभक्षी द्विपंखी माशा यांचा भरणा आहे. त्यांची देण्यासारखी असंख्य उदाहरणे आहेत. परंतु नमुन्यादाखल काही प्रमुख कीटकांचा उल्लेख करता येणे शक्य आहे.
भाताच्या रोपांवर फडका नाकतोडा उपजीविका करतो आणि पिकाचे नुकसान करतो. त्याच्या अंड्यांमध्ये स्केलिओ नावाची गांधीलमाशी अंडी घालते. त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या नाकतोड्याच्या अंड्यांचा, अंड्यातील अन्नांश खाऊन नाश करतात. नाकतोड्याची पिल्ले जन्मासच येत नाहीत. भाताचे पीक वाचू शकते. भाताच्या पानांवर मेलॅन्टिस लिडा या फुलपाखरांच्या अळ्या भूक भागवण्यासाठी हल्ला करतात. या अळ्यांच्या शरीरांत टेलोनोमस, अपानटेलस या गांधीलमाशा अंडी घालतात. या अंड्यातून गांधीलमाशांच्या अळ्या बाहेर आल्यावर फुलपाखराच्या अळ्या फस्त करतात. फुलपाखराच्या पुढील अवस्था तयार होत नाहीत.
गव्हाच्या पानांवर लष्करी अळ्या चरत असतात. या अळ्यांचे जीवन, अपानटेलस गांधीलमाशा आणिसारकोफॅगा माशा त्याच प्रकारे संपवतात. उसाच्या शेंड्याचा भाग स्किरपोफॅगा पतंगाच्या अळ्या पोखरतात. या अळ्यांवर ट्रायकोग्रामा ही मांसभक्षी माशी स्वत:ची अंडी घालते. पतंग अळीचा नाश होतो. शेतकी प्रशालांच्या अथवा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोग्रामाच्या लाखो अळ्यांची पैदास केली जाते. नंतर लाखो कोशावस्था व प्रौढ माशा उसाच्या वावरात सोडतात. पोखर किडीचे नियंत्रणहोते. झुरळाची मादी आपली अंडी अंडी धारिकेमध्ये संरक्षित करते. परंतु, निशाणमाशी त्या अंडीधारकेचे संरक्षक कवच भेदून आपली अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या अंड्यांचा नाश करतात. आपल्या घरातील झुरळांचे अशा प्रकारे नियंत्रणहोत असते, ही बाब अनेकांना ठाऊक नसल्याचे दिसते. ही उदाहरणे अभ्यासली की, पीडक कीटकांचे नियंत्रणनिसर्ग कशा प्रकारे करतो हे लक्षात येते आणिनिसर्गाचे कौतुक करावे तितकडे थोडे असल्याचे जाणवते. कीड नियंत्रणासाठी साधने शोधणारे संशोधक अशा परजीवींच्या आणि परउपजीवींचा सतत मागोवा घेत असतात. त्यातील काहींची ट्रायकोग्रामाशीसारखी मोठय़ा प्रमाणात पैदास करून त्यांच्याद्वारे कीडनियंत्रणकरण्याची शक्यता अजमावून पाहत असतात. प्रत्येक वेळेस यश येतेच असे नाही; पण प्रयत्न थांबत नाहीत.

इंटरनेट रेडिओ Internet Radion India

इंटरनेट रेडिओ Internet Radio India



रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. पूर्वी रेडिओ असलेले घर श्रीमंतच समजले जायचे. काही मोजक्याच घरात रेडिओ असायचा. आता तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण आपल्या मोबाईलमधूनही रेडिओ ऐकू शकतो. इतकेच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्रमात फोनवरून सहभागीही होऊ शकतो. इंटरनेट रेडिओने हे सर्व शक्य केले आहे. गीताच्या विश्‍वामध्ये रेडिओचे महत्त्व किती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आजचे आणि कालचेही अनेक दिग्गज कलाकार – ते नामवंत नसण्याच्या त्यांच्या काळामध्ये - जगापुढे आले, ते फक्त याच माध्यमातून! आजच्या अतिप्रगत, तंत्नशुद्ध, बहुविध आणि बहुगुणी इलेक्ट्रॉनिक साधनांपुढेही रेडिओ टिकून आहे! 
अर्थात, काळाप्रमाणे आणि वापरकर्त्यांच्या गरजेनुसार रेडिओनेही नवे रूप धारण केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तो संगणक आणि सेलफोनवरही वाजू लागला आहे. इंटरनेट रेडिओला वेब रेडिओ, नेट रेडिओ, स्ट्रीमिंग रेडिओ किंवा ई-रेडिओ वेबकास्ट अशी बरीच नावे असली, तरी त्यामागचे मूळ तंत्न एकच असते. 
इंटरनेटवरील संगीताला वेबकास्ट म्हणतात. कारण, पारंपरिक अर्थाने ते बिनतारी प्रक्षेपण म्हणजे 'ब्रॉडकास्ट' वा 'टेलिकास्ट' नसते. अर्थात, इंटरनेट रेडिओचे कार्यक्रम 'स्ट्रीमिंग मीडिया' पद्धतीने प्रसारित होत असल्याने रिप्ले वगैरे करता येत नाहीत. बर्‍याचशा इंटरनेट रेडिओ सेवा पारंपरिक रेडिओ केंद्रांशी निगडित असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील कोणतेही स्टेशन कोठेही बसून ऐकता येते. 
इंटरनेटमार्फत TCP किंवा UDP 'पॅकेज' पद्धतीने श्राव्य आशय सतत प्रसारित केला जातो (स्ट्रीमिंग प्रवाही ऑडिओ) व ही माहिती वापरकर्त्याने स्टेशन निवडल्यावर त्याला पुन्हा ऐकवली जाते. या प्रक्रियेत लहरींची उचलफेक करण्यात एखादा सेकंद जाऊ शकतो. या उशिरास 'रेडिओ लॅग' असे म्हणतात. २000 सालानंतरच्या बदलत्या तंत्नज्ञानामुळे बँड विड्थ्स परवडणार्‍या दरात मिळू लागल्याने अशा रेडिओच्या स्ट्रीमिंगचा दर्जा वाढला आहे.
साधारण ६४ केबी ते १२८ केबी प्रतिसेकंद वेगाने हे स्ट्रीमिंग केले जाते आणि आवाजाचा दर्जा जवळजवळ ऑडिओ सीडीइतका असतो. online radio असा सर्वसाधारण सर्च दिल्यावरही अनेक वेब-पृष्ठे उघडतात. आता तर रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. मोबाईल हँडसेटमध्ये एफएम रेडिओ असेल, तर हे आणखीनच सोपे होते.

सुई न टोचता इंजेक्शन Injection

सुई न टोचता इंजेक्शन Injection 

खाद्या सिरींजसारखीच याची रचना असते, मात्र नेहमीच्या दट्ट्याऐवजी धातूच्या तारेने गुंडाळलेले एक शक्तिमान लोहचुंबक असते. याला लॉरेंट्झ फोर्स अँुएटर म्हणतात. या दट्ट्याच्या पुढे द्रव स्वरूपातल्या औषधाने भरलेली एक कॅप्सूल असते आणि दर्शनी भागात एखाद्या डासाच्या सोंडेइतकी सूक्ष्म आकाराची एक नलिका असते. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक फायदे होतील

रुग्णांच्या मनातील इंजेक्शनची भीती दूर होईल.
हे इंजेक्शन टोचायचे नसल्याने इंजेक्शनद्वारे पसरणारे एड्स, हेपॅटायटिस बी अशांसारखे आजार उद्भवणार नाहीत.
इंजेक्शन देताना परिचारिका किंवा डॉक्टरांना सुई लागून होणारे आजार टळतील.
इंजेक्शनची सिरींज जंतुविरहित करण्याची गरज उरणार नाही.
द्रव स्वरूपातील पोलिओ, बीसीजी, कावीळ अशांसारख्या प्रतिबंधक लसींसाठी त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये सतत ठेवून 'शीतसाखळी' सांभाळावी लागते. अन्यथा त्या लसी कुचकामी ठरतात. पावडर स्वरूपात असलेली लस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नसल्याने हा धोका तर टळेलच. पण, शीतसाखळीसाठी येणारा मोठय़ा स्वरूपातला खर्चही वाचेल. जेक्शन घ्यायला सर्व जण का घाबरतात? कारण, इंजेक्शनची ती धारदार सुई त्वचेत टोचताना आणि मांसात घुसताना खूप दुखते. नंतर खूप दिवस त्या वेदना होत राहतात. पण, या भीतीवर आता तोडगा निघालाय...कसलीही सुई न वापरता दिले जाणारे इंजेक्शन!
अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) या विख्यात तंत्र विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 'मॅग्नेटिक जेट इंजेक्शन डिव्हाईस' नावाचे एक छोटे सिरींजवजा उपकरण तयार केले आहे. यामध्ये लोखंडी सुई तुमच्या शरीरात टोचण्याऐवजी जे औषध टोचायचे आहे, त्याचा एक गतिमान फवारा ध्वनीच्या वेगाने तुम्हाला वेदना न करता तुमच्या त्वचेत घुसतो. 
विजेवर चालणार्‍या या उपकरणातून जेव्हा विजेचा प्रवाह सोडला जातो, तेव्हा या विजेच्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र एक प्रचंड ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेद्वारे उपकरणातील दट्टय़ा वेगाने पुढे सरकतो आणि कॅप्सूलवर आदळतो. त्यानंतर त्या कॅप्सूलमधील औषध ध्वनीच्या वेगाने म्हणजे सेकंदाला ३४0.२९ मीटरने, या उपकरणाच्या दर्शनी भागी असलेल्या नलिकेतून बाहेर पडते. औषधाचा हा वेग विद्युतप्रवाहाद्वारे कमी-जास्त करता येतो. 
एम.आय.टी.चे शास्त्रज्ञ इयान हंटर आणि कॅथेराईन होगन यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणात खूप वेगाने आणि थोड्या कमी वेगाने औषधाचा फवारा बाहेर पडण्याची सोय आहे. कमरेच्या किंवा दंडाच्या स्नायूमध्ये इंजेक्शन देताना वेगवान फवारा वापरला जातो. पण, जर इन्सुलिनसारखे एखादे इंजेक्शन त्वचेखाली द्यायचे असेल, तर जरा सौम्य गतीचा फवारा वापरता येतो.
वेगवेगळ्या वयाच्या आणि त्वचेच्या वेगवेगळ्या जाडीप्रमाणे वेग कमी-जास्त करता येतो. म्हणजे एखाद्या छोट्या बाळाला एखादी लस किंवा इंजेक्शन देताना खूपच कमी गती लागेल, तर एखाद्या जाड कातडीच्या मजुराला जास्त वेग वापरावा लागेल. त्याचप्रमाणे एखाद्याच्या स्नायूमध्ये ते इंजेक्शन किती खोलवर द्यायचेय, हेदेखील नियंत्रित करता येते.
या तंत्रज्ञानात यापुढे अजून सुधारणा करून पावडर स्वरूपात असलेली इंजेक्शन्स आणि लसी देता येतील, अशी सोय करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार | Driverless Cars In Britain

ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार | Driver-less Cars In Britain

ब्रिटनमध्ये 'ड्रायव्हरलेस' कारच्या प्रकल्पावर काम सुरू असून २०१५च्या सुरुवातीला विजेवर चालणाऱ्या अशा शंभर गाड्या रस्त्यांवर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात बकिंगहॅमशायरमधील मिल्टन किनेस भागातील पदपथांवर हा प्रयोग होणार आहे.
ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार, Driver-less Cars In Britain

'ड्रायव्हरलेस' कारमध्ये दोन प्रवासी, तसेच त्यांच्याकडील लगेजसह बसता येईल. स्वतंत्र मार्गिकेवरून १९ किलोमीटर प्रतितास या वेगाने या गाड्या धावणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च ६ कोटी ५० लाख पौंड असून त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कारमधील 'सेन्सर'मुळे मार्गात आलेले अडथळे समजणार आहेत. 'जीपीएस', तसेच ३६० डिग्री सेन्सर्स या गाड्यांना दिशादर्शन करतील.

'स्मार्टफोन अॅप'च्या माध्यामातून प्रवाशांना या कारच्या तिकिटांची नोंदणी करता येईल. २०१७मध्ये या कारच्या चाचण्या पूर्ण होतील. मिल्टन किनेसचे रेल्वे स्टेशन, शॉपिंग सेंटरपर्यंत जाण्यासाठी या कार उपलब्ध असतील. ब्रिटन सरकार आणि वाहन उद्योगातील प्रतिनिधींचा समावेश असलेली 'ऑटोमोटिव्ह कौन्सिल', 'अरूप' ही इंजिनीअरिंग फर्म या प्रकल्पावर केंब्रिज विद्यापीठासोबत काम करत आहे. 

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह 


मोनोसोरस तारकासमूह हा मृगतारका समूहाच्या पूर्वेला आहे. सहसा आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात याची चर्चा होत नाही, कारण एकतर हा चटकन लक्षात न येणारा तारकासमूह आहे आणि याच्या आजूबाजूला अनेक इतर प्रखर तारकासमूह आहेत. तसेच हा तेजोमेघ लहान दुर्बिणीतून फारसा सुंदर दिसत नाही.
पण रोसेट तेजोमेघ खगोलभौतिक शास्त्राच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे ५000 प्रकाशवर्षं अंतरावर आहे, आणि एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा याचा विस्तार १३0 प्रकाशवर्षांचा आहे.
एकेकाळी हा एक प्रचंड मोठा वायूचा मेघ होता. या तेजोमेघात पोकळी निर्माण होण्याचे कारण असे की, कालांतराने याच्या मध्यभागात अनेक तार्‍यांची निर्मिती झाली. खगोलीयसंदर्भात हे तारे तसे तरुण आहेत. त्यांच्या पृष्ठभागावर तापमान ३0,000 केल्विन इतके आहे. या तार्‍यातून निघालेल्या प्रकाशाच्या किरणाच्या दाबामुळे आणि या तार्‍यातून निघालेल्या वायूमुळे या मेघातील कण (प्रामुख्याने हायड्रोजनचे अणू आणि काही इतर अणू आणि रेणू) मध्यभागापासून दूर ढकलले गेले आहेत. तसेच याच्या मध्य भागातील तार्‍यांच्या प्रचंड प्रारणांमुळे हायड्रोजन वायू विद्युतभारीत होतो आणि आणि तो आपल्याला प्रकाशही देतो (अशा प्रकाशाची तुलना घरातील ट्यूब लाईटच्या प्रकाशाबरोबर करता येईल.) या तेजोमेघाचे वस्तुमान इतके आहे की, या पासून अजून दहा हजार सूर्यासारखे तारे बनविता येतील.

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्


पूजेच्या विधीत 'हरिद्राकुंकुम् सर्मपयामि' असे म्हणत वाहण्यात येणारे हळद आणि कुंकू हे पूजा साहित्याचे महत्त्वाचे घटक आहेत व व्यापारी दृष्टीनेही महत्त्वाचे पदार्थ आहेत. रंगाने भिन्न असे हे दोन पदार्थ असले, तरी हळदीपासूनच रासायनिक प्रक्रियेने कुंकू बनते. हळदीला औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्व आहे. वप्रकाश या संस्कृत ग्रंथातील पुढील श्लोकात हळदीचे गुणधर्म दिले आहेत.

'हरिद्रा कटुकातिक्ता रुक्ष्णोष्णा कफपित्तनुत्।
वण्र्या त्वग्दोषमेहास्र शोथपाण्डुव्रणापहा ॥'

हळद ही कडवट, तिखट असून, कफघ्न व पित्तनाशक आहे. तिच्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो व जखम बरी करण्याचेही सार्मथ्य तिच्यात आहे. हळदीवर बरेच आधुनिक संशोधन होत आहे व मधुमेह, कर्करोग, अल्झायमर अशा रोगांवरही ती गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. हळदीला भारतात तर चांगली मागणी आहेच; पण रंगासाठी तिची निर्यातही होते. हळदीची आंबेहळद ही जात रक्तविकार व त्वचाविकार यांवर औषधी आहे. हळद प्रयोगशाळेत दर्शक म्हणून उपयुक्त आहे. कारण, आम्लामुळे तिला लाल रंग येतो.
हळदीचे रोप साधारणपणे कमरेइतके उंच, कर्दळीसारखी लांबट पाने असणारे असते. पानांनाही हळदीचा छान वास येतो. या पानांमध्ये वाफवून पातोळे नावाचा गोड पदार्थ किंवा इडल्या मुद्दाम बनवितात. ओल्या हळदीचे लोणचे बनवितात. पण, केवळ मीठ, आले व लिंबू यांसह ओल्या हळदीचा कीस जेवताना खाल्ल्यास मुखाचे आरोग्य सुधारते व पचनही सुधारते. भारतातील स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक पदार्थ म्हणून हळदीचे स्थान आहे. हळदीमुळे पदार्थाला सुंदर रंग, चव व स्वाद प्राप्त होतातच; पण आहारात हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिबंधकही आहे. हळदीची लागवड भारतात सर्वत्र होते. महाराष्ट्रात सांगली-मिरज परिसर हळदीचे उत्पादन व व्यापार यांसाठी प्रसिद्ध आहे. मध्यम काळी जमीन हळदीला मानवते. पावसाळ्यापूर्वी तिची लागवड केली जाते. म्हणूनच सप्टेंबरमध्ये हळदीची पाने बाजारात मिळतात व डिसेंबरच्या सुमारास ओली हळद मिळू लागते. पुढे दोन महिन्यांनी हळकुंडे तयार होतात. ती जमीन खणून बाहेर काढतात व स्वच्छ करून पाण्यात शिजवितात. शिजून मऊ झाली, की आठवडाभर उन्हात चांगली वाळवतात. मग रंग येण्यासाठी चोळून, घासून घेतात व कुटून, दळून पावडर करतात. हळदपूड बाजारातून घेताना भेसळीचा धोका असतो. पूर्वी हळकुंडांपासून घरीच पूड केली जात असे. त्यामुळे हा धोका नसे. हळकुंडे विरल सल्फ्यूरिक आम्लात किंवा लिंबाच्या रसात भिजवली, की त्यांना लाल रंग येतो. नंतर पापडखाराच्या पाण्यात शिजवली, की रंग पक्का होतो. अशी हळकुंडे वाळवून, कुटून, दळून कुंकू तयार होते. अजूनही काही गावांमध्ये घरगुती पद्धतीने असे कुंकू तयार करतात. असे कुंकू घातक नाही; पण स्वस्त कृत्रिम रंग कुंकू म्हणून वापरणे अपायकारक आहे.

पारिजातक फुलराणीची कहाणी

पारिजातक  फुलराणी ची कहाणी 


पारिजातकाची फुले अत्यंत सुंदर असतात. त्याचे कारण हा वृक्ष देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक. या वृक्षाच्या नावामागे एक शोकांतिका आहे. बहुधा सुंदर गोष्टींमागे काहीतरी दु:ख असतेच, या समजुतीतून ती निर्माण झाली असावीत. रिजातक एक स्वर्गीय वृक्ष. कारण, अगदी स्पष्ट आहे. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं बाहेर पडली त्यात सुरा आणि हलाहल मिळालं. तसंच लक्ष्मी कौत्सुभ आणि पारिजातकही. हा वृक्ष जन्मला त्या वेळी त्याला सुवर्णकांती होती. त्याच्या पानांना पोवळ्यांचा रंग होता. देवेंद्र या सौंदर्यावर भाळला नसता तरच नवल. देवेंद्राने या वृक्षाला नंदनवनात स्थान दिले.
पारिजातकाची इतरही नाव आहेत - मंदार, रागपुष्पी, नालकुंकूमक, हरिशृंगार आणि शेफालिका, रागपुष्पी आणि नालकुंकूमल या संज्ञा अर्थातच त्याच्या गुलाबी, लाल देठांच्या फुलांमुळे. सौंदर्यवतीला जसं 'बिंबाधरा' असं संबोधलं जातं. त्याप्रमाणे खालच्या ओठाला या फुलाच्या लाल देठाची उपमाही दिली जाते. शेफाली किंवा शेफालिकाचा उल्लेख ऋतुसंहाराच्या तिसर्‍या
सर्गात 'शेफालिका कुसुमगंध मनोहराणि' असा आहे. तो अगदी यथार्थ आहे. कारण, पारिजातकाच्या गंधाचा मोह कुणाला पडणार नाही? मात्र शेफाली किंवा शेफालिका हे नाव बंगालमध्येच अधिक परिचित आहे. पारिजातकाचे एक नाव खरपत्रही आहे. कारण उघड आहे, याची पानं पॉलिश पेपरसारखी खरखरीत असतात. पारिजातक मुख्यत: लागवडीखालीच आहे. फक्त सातपुड्याच्या काही भागात तो वन्यस्थितीत आढळतो, असं म्हणतात. अगदी खडकाळ, रूक्ष जमिनीत वाढणार्‍या, मध्यम उंचीच्या या वृक्षाच्या कोवळ्या फांद्या चौकोनी आणि लवयुक्त असतात. या फांद्यांवर साध्या पानांच्या जोड्या स्वस्तिकार पद्धतीनं मांडलेल्या, पर्णपाते अंडाकृती, दंतुर कडांचे व आधी सांगितल्याप्रमाणे खरखरीत असते.
पारिजातकाचा बहर पावसाळ्यात. रात्री उमलणार्‍या जाई-जुई या फुलांच्या कुळातच पारिजातकाची नोंद आहे. ही सर्वच फुलं पांढरी आणि सुवासिक. निशाचर कीटकांना आनंद यज्ञाचं आमंत्रण गंधाद्वारे मिळतं. अंधारात ही फुलं चांदण्यासारखी उठून दिसतात. पारिजातकाचं वानसशास्त्रीय नाव फारच अगडबंब आहे. निक्टँथस आरबोर ट्रिस्टिस. निक्टँथस म्हणजे चंद्रविकासी, खरं तर निशाविकासी. आरबोर म्हणजे वृक्ष, तर ट्रिस्टीस म्हणजे अश्रू गाळणारा. पारिजातकाची गळणारी फुलं म्हणजे त्याचे अश्रूच. अशी ही कविकल्पना.
फुलांचे गुच्छ फांद्यांच्या टोकाशी येतात. पाकळ्यांची नलिका लाल रंगाची, तर सुट्या भागाचा रंग पांढरा शुभ्र. नलिकेत दडलेले दोन नगण्य पुकेसर आणि लक्षात न येण्याजोगे स्त्रीकेसर. पारिजातकाची फळे पैसा म्हणूनच ओळखली जातात. याचं कारण त्याचे गोलाकार चपटं रूप. पारिजातकाचं फूल अतिशय नाजूक. अगदी थोडा वेळ हातात धरलं तरी कोमेजणारं, उन्हात तर ताबडतोब मलुल होणार. त्याचं कारणही तसंच आहे. 'पारिजाता' नावाची कुण्या एका देशाची राजकन्या होती. सुकुमार आणि नाजुका. ही फुलराणी सूर्यदेवावर भाळली. बालकवींच्या फुलराणीप्रमाणे तिचं सूर्यदेवाशी लग्न लागलं. राजपाट त्यागून ती सूर्यदेवाची सहचारिणी होऊन त्याच्या बरोबर गेली. पण, एकेदिवशी घात झाला. सूर्यदेवानं तिला सोडून दिलं. पारिजातानं दु:खानं जगाचा निरोप घेतला. तिचं दहन केलं त्या ठिकाणी राखेतून एक वृक्ष जन्माला आला. त्याची फुलं म्हणजेच पारिजाताची फुलं. पारिजाता राज कन्येसारखीच अतिशय नाजूक. पण, सूर्यानं केलेला विश्‍वासघात पारिजाता अजूनही विसरलेली नाही. ही फुलं सूर्य मावळल्यावर उमलतात आणि सूर्य उगवल्यावर गळून पडतात, उन्हानं कोमेजून जातात.

विजया दशमी आणि आपटाची पानं

विजया दशमी आणि आपटाची  पानं



भारतीय संस्कतीचे वैशिष्ट्य आहे, की त्यात पक्षी प्राणी यांच्याबरोबरच नदीनाले, डोंगरदर्‍या व वृक्षवनस्पती यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्याशी संबधित कथांमधून बोधामृतच दिले गेले आहे. आपट्याचा वृक्षही याला अपवाद नाही. पट्याच्या शेंगा जशा खाण्याजोग्या, तशाच रक्तकांचनाच्या शेंगाही. उत्तर भारतात याच्या ओल्या बिया आमटीत आणि दह्यातही घालतात. त्यामुळे दोन्ही पदार्थांची लज्जत वाढते, असं खुशवंत सिंगांनी आपल्या एका लेखात म्हटलं आहे.
विजया दशमीला सोनं लुटण्याच्या परंपरेला पार्श्‍वभूमी आहे ती अशी, वरतंतू नावाच्या मुनींचा कौत्स नावाचा शिष्य होता. गुरूगृही राहून त्यानं विद्याभ्यास पूर्ण केला आणि गुरूजींना दक्षिणे विषयी विचारलं. शिष्यावर गुरूजी खूष होते. त्यांनी 'दक्षिणा नको' असं कौत्साला सांगितलं. कौत्साने वारंवार विनंती केल्यावर वरतंतू मुनींनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा दक्षिणा सांगितली. कौत्स सुवर्णमुद्रा मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुनं नुकताच एक मोठा यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान केली होती. कौत्साला भेटण्यासाठी तो आला तो मृत्तिकापात्रे घेऊन कौत्साची पूजा करण्यासाठी.
कौत्साला आता प्रश्न पडला की रघुराजा चौदा कोटी सुवर्णमुद्रा कशा देणार? पण राजाने पुन: पुन्हा विनंती केल्यावर कौत्साने त्याच्याकडे सुवर्णमुद्रा मागण्याचं धाडसं केलं. राजानं त्याला दुसर्‍या दिवशी येण्याचं सांगितलं. कौत्स गेल्यावर रघुराजानं सेनापतीला बोलावून कुबेर म्हणजे संपत्तीचा स्वामी त्यावर चढाई करण्याची आज्ञा केली. ही चढाई दुसर्‍या दिवशी करायची होती. हे वृत्त ऐकताच कुबेर घाबरला. त्यानं रघुराजाच्या कोषावर रात्रीच सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला,
दुसर्‍या दिवशी कौत्स आला. राजानं त्याला कुबेराकडून आलेल्या सर्व मुद्रा दान केल्या. त्या चौदाकोटी पेक्षा जास्त होत्या. कौत्स म्हणाला, मला चौदा कोटीपेक्षा अधिक मुद्रा नकोत. तुम्ही जास्तीच्या मुद्रा परत घ्या. रघुराजा म्हणाला, एकदा दिलेलं दान मी परत घेत नाही.
अखेर जास्तीच्या मुद्रा एका वृक्षाखाली ठेवल्या आणि प्रजाजनांनी त्या लुटल्या. ज्या दिवशी हे घडलं तो दिवस होता विजया दशमी आणि वृक्ष होता आपटा.
आताच्या काळात आपट्याखाली सुवर्णमुद्रा कोण ठेवणार? मग लोकं आपट्याचं पानंच घेतात आणि एकमेकांना देतात प्राचीन भारतात सोन्याच्या धूर निघत असे, अशी वदंता होती. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे यांचे या सोन्याच्या धुरांवर सुरेख विनोदी भाष्य आहे. 
आपट्याची पानं विड्या वळण्यासाठी वापरतात. आदल्या दिवशी म्हणजे दुसर्‍याला वाटलेली सोन्याची पानं दुसर्‍या दिवशी विड्या वळण्यासाठी वापरायची, म्हणजे झाला सोन्याचा धूर !

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia 

काही शतकांमध्ये शल्यक्रियाशास्त्राची प्रगती विलक्षण झपाट्याने झाली. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. शस्त्रक्रियेत आणि शस्त्रक्रियेनंतर होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे विविध उपाय अमलात आणले जाऊ लागले. शरीरक्रियाशास्त्रासारख्या पायाभूत वैद्यकीय शास्त्रशाखांमधील प्रगतीमुळे शरीरातील विविध क्रियांमधील शास्त्रीय तत्त्वे, कारणमीमांसा, आपापसांतील ताळमेळ, होणारे बदल अशा विविध बाबींचे अधिकाधिक सूक्ष्म आकलन होऊ लागले. केवळ शरीररचना पहिल्यासारखी सामान्य करणे हे शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट नसून, शारीरिक क्रिया शक्य तितकी सामान्य आणि नैसर्गिक करणे, हे शस्त्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट असते. विविध तंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास, विविध उपकरणांची मदत ही बाब या प्रगतीला साहाय्यभूत ठरली. पण, या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण ठरले बधिरीकरणशास्त्र वा अँनेस्थेशियालॉजीतील प्रगती. सर्जरीच्या सुरुवातीची एबीसीच मुळी 'ए फॉर अँनेस्थेशिया'ने होते म्हणा ना.
कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे काही विशिष्ट विकार बरा करण्यासाठी, विशिष्ट व्याधींवर उपचार करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तंत्राने केलेली जखम. ही जखम बाहेरून दिसणारी असेल अथवा न दिसणारीही असू शकेल. अेंडोस्कोपच्या मदतीने केल्या जाणार्‍या अनेक शस्त्रक्रियांमध्ये बाहेरून कोणतीच जखम नसते वा आत केलेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत बाहेरील जखम नगण्य असते. पण, जखम लहान असो वा मोठी, बाहेरून दिसो वा न दिसो, जखम म्हटली की वेदना आलीच. शुद्धीवर असलेला आणि वेदनेची जाणीव न गमावलेला सामान्य माणूस शस्त्रक्रियेची वेदना कशी सहन करणार? म्हणूनच शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू नयेत, यासाठी विविध पद्धती अँनेस्थेशियाच्या शास्त्रात विकसित होत गेल्या.
आधुनिक वैद्यकाच्या विकासापूर्वी रुग्णाच्या मस्तकावर प्रहार करून त्याला बेशुद्ध करणे, रुग्णाला विविध मादक द्रव्ये देणे, त्याला बांधून अथवा इतरांनी आवळून धरून निपचित पाडणे अशा उपायांचा उल्लेख होतो. आधुनिक वैद्यकाच्या विकासात वेदनेच्या मार्गाचे जसजसे अधिकाधिक आकलन होत गेले, तसतसा विविध औषधांचा बधिरीकरणासाठी उपयोग करण्यात येऊ लागला.
शस्त्रक्रिया ही त्वचेलगतच्या भागामध्ये असेल, तुलनेने त्यात कमी आकाराचा छेद घ्यावा लागणार असेल, कमी काळाची असेल, तर तेवढय़ाच भागातील मज्जातंतूच्या शाखा इंजेक्शनद्वारे औषध त्या भागात टोकून बधिर करण्यात येतात. काही वेळा तर अतिशीत पदार्थांच्या फवार्‍याने फक्त मज्जातंतूची टोके तात्पुरती बधिर करूनही शस्त्रक्रिया केली जाते. यापुढचा भाग म्हणजे काही ठळक मज्जातंतूचे शरीरातील स्थान लक्षात घेऊन अथवा मज्जारजूच्या पातळीप्रमाणे शरीरातील विशिष्ट पातळीवरील रचना लक्षात घेऊन, त्यानुसार तो भाग वा त्या पातळीपर्यंतचा शरीराचा भाग बधिर केला जातो.
यानंतरचा भाग अर्थातच रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध करणे, यासाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात. या प्रकारात अधिकाधिक सुरक्षा आणण्यासाठी सतत नव्या औषधांसाठी, नव्या तंत्रासाठी संशोधन चालूच असते.
र्मयादित काळासाठी वेदनेपासून मुक्ती देणारे अँनेस्थेशियाचे शास्त्र आधुनिक वैद्यकातील आणि शस्त्रक्रियाशास्त्रातील एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे.

Japanese Encephalitis एनसिफलायटिस

Japanese Encephalitis एनसिफलायटिस 

Japanese Encephalitis एनसिफलायटिस
दिवसेंदिवस नवनवीन आजारांमध्ये भर पडत असून, त्यांची व्याप्ती वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये एनसिफलायटिस या आजाराने थैमान घातले असून, या आजारामुळे नुकतेच आणखी १0 बळी गेले आहेत.. • भारताच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बातमी अशी, की पूर्णपणे स्वदेशी बनावटीची, भारतात आढळणार्‍या विषाणूंच्या वापराने बनवलेली लस तयार करण्यात आली आहे. तिला नुकतीच सरकारी पातळीवर मान्यता मिळाली असून ती सुरक्षित आहे. त्यामुळे JEV चे उच्चाटन आता दूर नाही! रखपूर जिल्ह्यामध्ये ज्या आजाराच्या साथीने सध्या जोर धरला आहे आणि रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळवले आहे, तो आजार म्हणजे ज्ॉपनीज एनसिफलायटिस (Japanese Encephaltis) यालाच पूर्वी Japanese B Encephalitis असे म्हणत असत.
यामधील विषाणुजन्य मेंदूदाहाच्या कारणांमध्ये JEV हा एक महत्त्वाचा विषाणू आहे. कारण, दर वर्षी ३0 ते ५0 हजार लोक याची शिकार होतात. आजारी व्यक्तीचे वय, भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार ३ ते ६0 टक्के पर्यंत लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात.
सहसा शहरी भागांमध्ये हा आजार होत नाही. भातशेतीची खाचरे पाण्याने भरली, की डासांची उत्पत्ती वाढते. अशा वेळी डास त्यांचे नेहमीचे खाद्य (डुक्कर, पक्षी) बदलतात आणि माणसांना चावायला सुरुवात करतात. डुकरांना हा जंतुसंसर्ग झाला, तरी ते सहसा दगावत नाहीत.
JEV चा विषाणू डासामार्फत मनुष्याच्या शरीरात शिरल्यावर सुरुवातीला ५ ते १५ दिवसांपर्यंत कोणत्याच स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत नाहीत. यामध्ये साधारण २५0 लोकांना या विषाणूची लागण झाली, तरी फक्त एकालाच आजार होतो.
थंडी वाजून हुडहुडी भरणे ही पहिली अवस्था असते. कालांतराने प्रचंड प्रमाणात ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि इतर अनेक तक्रारींची सुरुवात होते. त्यानंतर १ ते ६ दिवसांत मानेचा कणा कडक होणे, लकवा भरणे, भूक न लागणे, फिट्स येणे, परिस्थितीचे भान जाणे, बेशुद्धावस्था अशा तक्रारी वाढतात. साथीच्या तीव्रतेनुसार मृत्यूचे प्रमाण कमी- अधिक होते. पण, मुलांमध्ये ते खूपच अधिक प्रमाणात असते. जे रोगी यातून बचावतात, त्यांमध्येसुद्धा मेंदू व चेतासंस्थेशी निगडित बहिरेपणा, भावनिक असंतुलन, लकवा अशा तक्रारी दीर्घकाळ राहतात. काही जणांत ताप, उलट्या, डोकेदुखी, वृषणाला सूजही दीर्घकाळ राहते.
श्‍वसनाला त्रास होणे टाळणे, फिट्स येऊ न देणे व आहाराची काळजी घेणे यांबरोबरच योग्य ती शुश्रुषा इतकेच करता येते. शरीरात विषाणूंची संख्या रोखण्यासाठी वेगवेगळी प्रतिजैविके वापरून पाहिली असली, तरी त्यास अद्याप फारसे यश आलेले नाही. एका रोग्याकडून दुसर्‍यास हा आजार होऊ शकत नसल्याने रोग्यास वेगळे काढण्याची आवश्यकता नाही.
पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालणे, डासांना पळवून लावणारी मलमे अंगावर लावणे, मच्छरदाण्यांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
JEV मुळे प्रतिकारशक्ती जन्मभरासाठी येते. म्हणजे JEV चा एकदा संसर्ग झाला, तर पुन्हा आजार सहसा होत नाही. त्यामुळेच लसीकरण हा त्यावरचा १00 टक्के उपाय आहे; परंतु ती मोठय़ा प्रमाणात परवडण्यासारखी नाही.चीन, कोरिया, जपान, तैवान, थायलंड येथे मोठमोठय़ा प्रमाणात साथी आल्या. पण, लसीकरणामुळे तेथे लवकरच आवर घालता आला. भारत, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम येथेही अधूनमधून साथी उफाळून येतात आणि मनुष्यहानी होते.
(लेखक पुणे इंडियन मेडिकल असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, बालरोगतज्ज्ञ आहेत.) • हा आजार हेरॉनसारख्या पक्ष्यांमध्ये व डुकरामध्ये असलेल्या विषाणूंमधून क्युलेक्स जातीच्या डासांमार्फत पसरतो. दक्षिणपूर्व आशिया आणि अतिपूर्वेच्या देशांमध्ये हा आजार पसरला आहे.